Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedचारा, पाणीटंचाईच्या झळा

चारा, पाणीटंचाईच्या झळा

म्हाळसाकोरे । कृष्णा अष्टेकर | Ambasan

मागील वर्षी कमी पर्जन्यमान (Low rainfall) झाल्याने तसेच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने एप्रिल महिन्यातच गोदाकाठ परिसरात पाणीटंचाईचा (Water scarcity) प्रश्न गंभीर बनला आहे. गोदावरीचे (godavari) पाणी पाणवेलींमुळे दूषित झाल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरत असून डासांच्या वाढत्या प्रादूर्भावाने गोदाकाठचे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे शुद्ध पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र गोदाकाठ परिसरात दिसू लागले आहे.

- Advertisement -

तालुक्याचा गोदाकाठ भाग हा पाण्याचा भाग म्हणून ओळखला जातो. शिवाय इतर तालुक्याच्या तुलनेत बागायतदार तालुका म्हणून निफाडची (niphad) ओळख आहे. परंतु आता पर्जन्यमान (rainfall) घटल्याने कुपनलिका, विहिरी, पाझर तलाव, वळण बंधारे यांची पाणी पातळी खालावली आहे.

गोदाकाठचा शिंगवे, करंजगाव, चापडगाव, भुसे, मांजरगाव, खानगाव थडी हा नदीकाठी असलेला व सतत पाण्याखाली असलेला भाग सध्या पक्ष्यांसाठी राखीव पाणी असल्याकारणाने पाण्यासाठी दाहीदिशा टाहो फोडत आहे. तर म्हाळसाकोरे, बागलवाडी, भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर, तळवाडे, निपाणी पिंपळगाव, बेरवाडी या भागामध्ये विहिरी आटल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (drinking water issue) गंभीर बनला आहे.

पाण्याअभावी अनेक शेतकर्‍यांनी (farmers) उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे. सध्या चारा पिकासाठी देखील पाणी मिळत नाही. सध्या दुधाला चांगला भाव मिळत असला तरी शेतकर्‍यांकडे चारा शिल्लक नसल्याने विकत चारा घेऊन दुभती जनावरे सांभाळावी लागत आहे. गोदाकाठच्या अनेक शेतकर्‍यांनी पाणी व चाराटंचाई अभावी आपली जनावरे विकली आहे. दिवसागणिक पाणीटंचाईचे संकट (Crisis of water scarcity) गडद होत असतांना शेतकरी आपल्या मुलाबाळांसह पाण्याची शोधमोहीम राबवित आहे. त्यातच ज्या विहिरीला थोडेफार पाणी आहे तेथेही वीजभारनियमनामुळे विहिरीतील पाणी काढता येत नाही. गोदाकाठ परिसरातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहे.

वीजभारनियमनामुळे 1 लाख लिटर क्षमता पाणी असलेला जलकुंभ 10 ते 20 हजार लिटर देखील भरू शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना मृतावस्थेत आल्या आहेत. यावर्षी दारणा धरणातून पंधरा ते वीस दिवसांपूर्वी एक आवर्तन गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले होते. मात्र पिण्याच्या नावाखाली नांदूरमध्यमेश्वर धरणात आलेले हे पाणी कोपरगाव, नगर साठी दहा दिवस कालव्याद्वारे सोडण्यात आले. त्यामुळे डोळ्यादेखत पाणी वाहत असतांना आणि पाणीटंचाईचा सामना करतांनाही हे पाणी उचलण्याचे धाडस येथील शेतकर्‍यात आले नाही.

बंदोबस्तात पाणी पाठविण्याची व्यवस्था झाल्याने जवळून कालवा वाहत असतांनाही आपली पिके मात्र जळतांना पाहण्याचे भाग्य येथल्या शेतकर्‍याच्या नशिबी आले आहे. सध्या परिसरात जनावरांच्या चार्‍यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विजभारनियमनामुळे पाणीटंचाईला अधिक हातभार लागला आहे. अशातच ज्या शेतकर्‍यांनी रात्रीचा दिवस करून मका, सोयाबीन, कांदा, भाजीपाला आदी पीके घेतली त्यांनाही आता बाजारभावाने अखेरचा दणका दिला आहे. त्यामुळे या अस्मानी व सुलतानी संकटापुढे शेतकरी हतबल ठरला आहे.

फार्म भरून पाणी मिळेना परिसरात असलेल्या कडवा कालव्यावरील लाभक्षेत्रात म्हाळसाकोरे, भुसे परिसरात 5 ते 6 मेन चार्‍या आहे. या भागातील शेतकर्‍यांसाठी कडवा कालव्याचे दरवर्षी 2 रोटेशन येतात. परंतु मागील वर्षापासून एकच रोटेशन मिळते. पाणी मिळावे म्हणून शेतकरी फॉर्म भरतो. मात्र कालव्याला येणार्‍या 28 दिवसांच्या पाण्यामध्ये चार्‍यांना फक्त दोन दिवस पाणी सोडले जाते. त्यामुळे हे पाणी शेवटपर्यंत पोहचत नाही. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत वारंवार सांगून देखील त्यांचेकडून उलटसुलट उत्तरे दिली जातात. जर कालव्याचे पाणीच मिळणार नसेल तर पाणी मागणी अर्ज का भरून घेतले जातात असा प्रश्नही शेतकर्‍यांना सतावू लागला आहे.

– रघुनाथ ढोबळे, चेअरमन सप्तशृंगी पाणी वापर संस्था

- Advertisment -

ताज्या बातम्या