Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedबदली हा पर्याय असू शकतो का?

बदली हा पर्याय असू शकतो का?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

अंंबड पोलीस ठाण्यातील (Ambad Police Station) उपनिरीक्षक व एका अंमलदाराला लाचलुचपत विभागाने (Bribery department) लाच घेतल्याप्रकरणी अटक (Arrested) करून कारवाई केल्यानंतर पोलीस आयुक्त दिपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांची तात्काळ बदली केली. मात्र वरिष्ठ अधिकार्‍याची बदली करणे म्हणजे त्याच्या कार्यक्षमतेवर संशय वाटणे व झाला प्रकार शांत करण्याची भूमिका आयुक्तांची नव्हे ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

अंबड पोलीस ठाण्यात लाचखोरीचा प्रकार घडण्या अगोदर एक दोन दिवसांपूर्वी वपोनी कुमार चौधरी यांनी रात्रीच्या वेळी गस्त करत असतांना दोन संशयितांना पकडले. त्यांच्याकडून जिल्ह्याभरात चोरी केलेल्या 25 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. मात्र त्यानंतर अवघ्या एक ते दोन दिवसांत अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व एका अंमलदाराला लाचलुचपत विभागाने एका महिलेकडून 10 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करून कारवाई केली.

त्यावर माध्यमांना शांत करण्यासाठी आपण काहीतरी ठोस कारवाई केली असा आव आणत पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांनाच दोषीच्या पिंजर्‍यात ठेवत तडकाफडकी त्यांची बदली केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. मात्र चौधरी यांची बदली करणे हा पर्याय होता का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. लाचखोरीसारखा प्रकार दुसर्‍याने केला मात्र त्याची शिक्षा वरिष्ठ अधिकार्‍याने भोगायची हे असं झालं कि चोर सोडून संन्याशाला शिक्षा देणे.

अंबड पोलीस ठाण्याची हद्द व येथील लोकसंख्या बघता पोलीस बळ अपुरे असतांना चौधरी यांच्या काळात झालेले कार्य नाव ठेवण्यासारखे नव्हते. अंबड औद्योगिक वसाहत (Industrial estate), चुंचाळे घरकुल योजना (Chunchale Gharkul Yojana), अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार (Scrap market) सारखे संवेदनशील परिसर अंबड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर (Petrol pump) एक पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता. फक्त एका अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 12 पेट्रोलपंप असून 12 पोलीस तेथे बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले होते.

अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस मिळुन दोन पाळीत सुमारे 138 इतके आहे. शहरात सध्या पोलीस फक्त हेल्मेट सक्तीच्या (Helmet) कारवाईत व्यस्त आहेत तर दुसरीकडे गुन्हेगारीचा आलेख चढता आहे. गेल्या महिनाभरात 26 नोव्हेंबरला सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला सहावा खून आहे. यामध्ये 31 ऑक्टोबर रोजी एकलहरारोडवर चरणजीत ग्राय यांचा खून,3 नोव्हेंबर रोजी रिपाई महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांचा खून, 21 नोव्हेंबर रोजी पोलीसपुत्र प्रवीण काकड याचा म्हसरूळ परिसरात खून त्यानंतर लगेचच 23 नोव्हेंबरला डाळिंब विक्रेता राजेश शिंदे याचा खून, तर 26 नोव्हेंबरला अमोल ईघे यांचा खून (murder) अशी खुनाची शृंखलाच सुरु आहे.

आणि दुसरीकडे पोलीस समुपदेशन (Police counseling) व काढे तयार करण्यात व्यस्त आहेत. पोलिसांचे मनोबल वाढवण्याऐवजी वरिष्ठ अधिकार्‍याची बदली करणे म्हणजे पोलिसांचे मनोबलाचे खच्चीकरण करणे आहे. पोलीस खात्यात बदली होणे हा अधिकार्‍यांचा सवयीचा भाग आहे मात्र अशा प्रकारे बदली झाल्यास अधिकार्‍यांसह अंमलदारांचे मनोबल कमी होईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आत्मपरीक्षण गरजेचे

कार्यक्षम अधिकारी व कायद्याचा ज्ञान असलेला अधिकारी म्हणून पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीत केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत त्यांनी ठेवली. पोलीस अधीक्षकांचे अधिकार न वापरता पोलीस आयुक्तांचे अधिकार ते वापरत आहेत. मात्र हे करत असताना त्यांच्या कामाची दिशा कुठे चुकत आहे का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. यामुळे काही पक्षांनी थेट पांडे यांच्या बदलीची मागणी केली. याबाबत स्वतः आयुक्तांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या