करोना तिसरी लाट! आपलीच लढाई

करोना तिसरी लाट! आपलीच लढाई

नाशिक | राजेंद्र सूर्यवंशी | Nashik

करोनाची (corona) तिसरी लाट आली खरी. पण मिळमिळीत, दवाखाने (hospitals) भरलेले नाहीत, ऑक्सिजन (Oxygen) नाही, रिमेडीसीवर नाही, नागरिकांत भीती नाही. काय कारण असावे, याचे,तर मुख्य थंडी (cold) संपली व उन्हाळ्याची (summer) चाहूल लागली आहे.

लोकांना थंड वारे (Cold winds), धुके (fog), कडक ऊन हे बाधणारच. सर्दी, पडसे, थंडी, ताप येणारच. टेस्ट केल्यावर माणूस पॉझिटिव्ह येणारच. त्यामुळे दुसर्‍या लाटेत जो आजाराचा बाजार झाला तो पुन्हा होऊ द्यायचा नसेल तर करोनाची ही लढाई आता स्वत:च लढावी लागणार आहे. आता दुसर्‍या लाटेतून लोक शहाणे झाले आहेत. दवाखाने विसरू नका.

दवाखान्यांमध्ये बेड लावून ठेवले आहेत, ऑक्सिजन (Oxygen) भरून ठेवले आहेत, भरपूर भरती केली आहे, पण. लोक ढुंकून पाहत नाहीत. दुसर्‍या लाटेचा अनुभव फार चांगला नाहीच. लाखोंची बिले भरूनही रुग्ण तर हातात नाहीच, मात्र मनस्ताप, दुःखच सगळ्यांचे वाट्याला आले. जे रुग्णालयात दाखल होते, तेथे नातेवाईक नाही, मित्र- मैत्रिणी नाही, कोणीच जीवा भावाचे नाही. मग ते लोक सुन्नपने वर पाहत बसणार. व शेवटी राम नाम सत्य म्हणनार. भरपूर दुकानदारी झाली. मोठा कार्यक्रम झाला. पण हा प्रयोग दरवेळेस यशस्वी होत नाही. लोक दवाखान्यात जाऊन औषधे घेतात व घरातच बसतात. दरवेळेस त्याच तिकिटावर तोच खेळ कसा चालेल.

सध्या एकही घर असे नाही की जिथे आजारी माणूस नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक घरात किमान एक माणूस आजारी आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यापैकी एकतरी लक्षण कोणाला न कोणाला आहेच. एका बाजूला रुग्णांची ही अवस्था असताना दवाखाने, खासकरून खाजगी कोविड स्पेशल दवाखाने (Covid Special Dispensary) ओस पडून आहेत. ही कोविडची तिसरी लाटच आहे, पण अत्यंत सौम्य स्वरूपात आहे. लोकांना जाणीव होतेय की आपल्याला करोना (corona) झाला आहे पण त्याची खात्री कोणाला करून घ्यायची नाही. चाराण्याच्या कोंबडीसाठी बाराण्याचा मसाला विकत घ्यायची आता कोणाची इच्छा नाही आहे.

खरं सांंगायचं म्हणजे करोना व्हायरसची (corona virus) ताकद फार कमी झाली आहे. या विषाणूने मानवी शरीराशी जुळवून घेण्यात जवळपास यश मिळवलं आहे. व्हायरस माणसाळला आहे, असे म्हणण्यातही काही वावगे ठरणार नाही. गेल्यावर्षी एवढे रुग्ण पॉझिटिव्ह (positive paitent) असताना एकाही दवाखान्यात बेड शिल्लक नव्हता. ऑक्सिजन तुटवडा सुरू झाला होता, नजरेसमोर वृद्ध, तरुण लोक मरत होते.

आज संख्येने तेवढेच रुग्ण आहेत पण कोणतीही वाईट परिस्थिती सध्या नाहीये. ही एक चांगलीच गोष्ट आहे.सध्या जी घराघरात ताप, खोकला आलेली, नाक गळत असलेली माणसं दिसत आहेत ती चार-पाच दिवसांत उपचार घेऊन ठणठणीत बरी होतील. न घाबरता, पॅनिक न होता जवळच्या डॉक्टरांना दाखवा! आपल्याला साधी सर्दी-ताप आहे म्हणून आजार लपवूनही ठेवायचं नाही आणि घाबरूनही जायचे नाही.

कोरोनाचा मध्य साधायचा आहे.जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे दाखवा, त्यांनी पूर्ण तपासून तसा सल्ला दिलाच तर कोविड टेस्ट करा. पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह विचार करा, निसर्गाप्रमाणे बदला. आता ही लढाई आपल्यालाच लढायची आहे, हे विसरू नका.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com