Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकरोनामुळे रासायनिक खत पुरवठ्यावर परिणाम

करोनामुळे रासायनिक खत पुरवठ्यावर परिणाम

वार्तापत्रअरूण पाटील

यावल – Yaval

- Advertisement -

गेल्या एप्रिल महिन्यापासून करोनाविषाणू बाहेरच्या आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने त्या लॉकडाऊनचा फटका रासायनिक खते विक्रेते, उत्पादक आणि शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. त्यात शासनाची चुक म्हणता येणार नाही हे मात्र निश्चित झालेले आहे. जगामध्ये कोरोना विषाणू व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. चीनमधून हा व्हायरस उदयास आला आणि जगातील दोनशे देशांना त्याचा फटका बसलेला सर्वत्र दिसत आहे.

दिवसेंदिवस पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे त्याच सोबत मरण पावलेल्यांचाही आकडा मोठा वाढला आहे. शासन-प्रशासन या आजाराला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून विरोधकांना मात्र सत्ताधार्‍यांच्या विरोधात बोलण्यासाठी खाद्य जरी निर्माण झाले असले तरी देशात व जगात कोरोनाची परिस्थिती आहे त्याचा अंदाज घेऊनच राजकारण्यांनी त्यावर भाकीत केले तरच जनतेला दिलासा मिळू शकेल. जर कोरोना मध्ये राजकारण केलं तर सर्वत्र मानव सृष्टी भूतलावर आणि जगाच्या पाठीवर कमी होण्यास वेळ लागणार नाही. जगाच्या पाठीवर असलेल्या देशांमध्ये सर्वत्र हा रोग पसरलेला आहे. शासन-प्रशासन आरोग्य विभाग लोकप्रतिनिधी रात्रंदिवस त्याचा नायनाट कसा होईल यासाठी मेहनत घेत आहे. त्यातल्या त्यात सर्व फॅक्टर्‍या लॉक डाऊनमुळे मार्च महिन्यापासून बंद होत्या. त्यात सर्वच उत्पादन थांबली होती. त्यात रासायनिक खतांचा सुद्धा समावेश आहे.

मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रासायनिक खताची मोठे उत्पादन फॅक्टरीमध्ये होत असते याच कालखंडात या आधी मोठ्या शेतकर्‍यांनी व कृषी खते बी-बियाण विक्रेत्यांनी जो स्टॉक करून ठेवलेला होता तो संपला आणि आणि मालक उत्पादनाला शासनाने प्रायोगिक तत्त्वावर अटी-शर्ती घालून उत्पादन सुरू केले असले तरी बहुतांश ठिकाणी हमाल बंधूंना सुद्धा रिपोर्ट आल्याने रेल्वेचे धक्के बंद होते त्यामुळे धक्क्यांवर मालउतरवणे कामासाठी मजूर लोक उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. ज्या शेतकर्‍यांकडे पैसा होता त्यांनी मार्च-एप्रिल महिन्यांमध्येच युरियाचा उचल करून ठेवलेला होता.

मोठ्या शेतकर्‍यांकडे या कालखंडात बँकांकडून आर्थिक पत पुरवठा न झाल्याने छोट्या शेतकर्‍यांना खतांची वाट पहावी लागली. पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच पडल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी शेतीमध्ये पेरणी करून टाकली मात्र दीड ते दोन महिन्यापर्यंत रासायनिक खते उपलब्ध न झाल्याने छोट्या शेतकर्‍यांना मटेरियलसाठी आज वणवण भटकावे लागत असून ज्या सहकारी पतसंस्थांकडे मटेरियल उपलब्ध झाले त्या ठिकाणी समांतर वाट्याप्रमाणे प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न या सोसायट्यांनी केलेला आहे तर काही खासगी दुकानदार मात्र चढ्या भावाने विक्री करत असताना दिसत असून त्यांनी या तुटवड्याच्या संधीचा फायदा घेतल्याचे दिसत आहे.

जे शेतकरी अशा खाजगी दुकानदारांकडून रासायनिक खते घेतात त्यांना पावती दिली जात नाही. दिलीच तर शासकीय रेटने पावती देऊन वरतून पैसे घेतले जातात, असा आरोप मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.

कृषी खात्याचे व यावल पंचायत समिती कृषी अधिकारी हे सर्वत्र फिरतात मात्र कोणी शेतकरीसुद्धा तक्रार देण्यास पुढे येत नाही त्यामुळे कारवाई करण्यास त्यांनाही अडचणीचे ठरते. खर्‍या अर्थाने शेतकरी आज लॉकडाऊन मुळे व कोरोनाच्या विषाणू व्हायरसमुळे प्रोटेक्शन न झाल्याने व पुरवठा वेळेवर न झाल्यामुळेच अडचणीत सापडला असला तरी बँकांकडून वित्तीय पतपुरवठा हा सुद्धा तेवढाच त्याला कारणीभूत आहे. हा कोरोना कधी जाणार व काळा मातीची सेवा करणार्‍या या बळीराजाला आता सुगीचे दिवस कधी येणार याकडेच आता बळीराजा नजर ठेवून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या