Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकरोना अन् भाऊबीज

करोना अन् भाऊबीज

नाशिक । Nashik | दाखल | विजय गिते

इंंग्रजी वर्षातला अखेरचा आणि भारतीय महिन्यातला सगळ्यांत मोठा असा दिवाळीचा सण (diwali festival) करोनाचे (corona) सावट काहीसे कमी झाल्याने दबकत दबकत साजरा झाला असला तरी करोनाचे धक्के अजूनही पुसले गेलेले नाही.

- Advertisement -

दिवाळीत प्रत्येकाने आकाशदिवे लावले, पणत्या पेटविल्या, दीपमाळा तेजाळून निघाल्या. ही अंधकारावरच्या विजयाची प्रतिके. मात्र,आज अजुनही खरा अंधार आहे तो करोनाचा. तो अंधार दूर करणे, हीच खरी दिवाळी. करोनाने उच्च मध्यम व मध्यम वर्गाच्याही पोटाला चांगलेच चिमटे घेतले; मग कष्टकरी, श्रमिक आणि बांधकाम व इतर मजुरांचे हाल काय सांगायचे? करोनाचा झटका पचवून भारतीय समाज सावरत असला तरी त्याच्या फटक्यांचे व्रण अजूनही मनातून पुसले जात नाहीये.

दिवाळीच्या उत्सवातील भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा एक क्षण म्हणजे भाऊबीज (bhaubeej). हा क्षण म्हणजे… सण प्रेमाचा. सण मायेचा. सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा. त्या अतूट विश्वासाचा.माझ्या बहिणीला उदंड आयुष्य मिळो आणि ती कायम सुखी राहो! हीच प्रार्थना करण्याचा. मग बहीण कोणाचीही असो तिचा आदर आणि सन्मान (Respect and honor) जर झाला तर सध्या होत असलेल्या क्रूर कृत्याचा बिमोड होण्यास वेळ लागणार नाही.

आईनंतर जर कोणी जपले असेल किंवा कोण काळजी करत असेल तर ती फक्त बहीण. तिच्या प्रेमाला उपमा नाही. असा हा भाऊबीजेचा सण यंदाही साजरा झाला असला तरी त्यावर सलग दुसर्‍या वर्षीही सावट राहिले ते करोनारुपी क्रुर राक्षसाचे.या राक्षसाचे सावट कसे आणि किती गडद या सणावर राहिले, याचा एक प्रसंग.

… यावर्षी माहेरी जायला जमलं नाही म्हणुन..घरी आलेल्या भावाला हॉलमध्ये पाट रांगोळी घालून नवर्‍यासमोरच औक्षण करुन तिने त्याला ओवाळलं, तसा तो उठून उभा राहिला. शर्टच्या खिशातून ओवाळणीचं पाकीट काढून हळूच ओवाळण्याच्या ताटात ठेवत..खाली वाकून चरणस्पर्श करत त्यानं बहिणीला नमस्कार केला,अरे असू दे! तू बस! मी फराळाचं आणते! म्हणत तिनं औक्षणाचं तबक उचललं,तसा तो घाईघाईत म्हणाला, ताई फराळाचं राहू दे! तेव्हढा वेळ नाहीये! कामावर जायला उशीर होईल! पुन्हा येईल मी! असं बोलून तो दारापर्यंत गेला सुद्धा..अरे! थांब जाऊ नकोस तसा..थोडं फराळाचं देते!ते तरी घेऊन जा! आलेच

मी… बहिणीनं त्याला थांबवलं होतं…..

बहिणीनं दिलेली फराळाची पिशवी घेऊन तो निघाला होता.. काही अंतर गेल्यावर बहिणीच्या मोबाईलची रींग खणखणली..त्यानं पाहिलं..तो फोन होता ताईचा…बहिणीचा फोन येईल,याची जणू त्याने अपेक्षा केली असावी..रस्त्याच्या कडेला थांबून त्यानं..मोबाईल कानाला लावला…गळ्याशी दाटलेला हुंदका कसातरी थोपवून..बहिणीनं तिकडून काही बोलायच्या आतच कंठ दाटलेल्या स्वरात त्यानं बोलायला सुरवात केली…

ताई! माफ कर मला!तुला ओवाळणी घालायला माझ्याजवळ पैसे नव्हते..ताटात ठेवलेल्या पाकिटात काहीच नव्हतं रिकामच होतं ते ! पुढचं बोलणं त्याला अवघड जातं होतं..मोबाईल कानाला लावून तो तसाच उभा होता… अरे वेड्या! पलिकडून गहिवरून आलेल्या बहिणीचे स्वर कानी येत होते…. खिशातलं पाकीट काढतांना थरथरणारा तुझा हात!तुझ्या चेहर्‍यावर दिसणारे ते भाव! निघण्याची केलेली तीघाई पाहूनच! तू काहीतरी लपवतो आहेस..

हे मला वाटलंच होतं! आत जाऊन मी फक्त खात्री केलीअरे! आता अनलॉक झालं असलं तरी तुझा गेलेला जॉब अजुनही तुला मिळालेला नाहीये ! माहिताय मला ! कामावर जायला उशीर होईल! हा बहाणा सुद्धा ओळखला होता! कितीही झाले तरी तुझी बहीण आहे रे मी… ताई तू समजुन घेतलंस! पण तिथं बाजुला भाऊजी बसलेले! त्यांच्या लक्षात आलं असतं तर? नोकरी अभावी फार बिकट परिस्थिती झालीय गं आमची! कामावर परत बोलावण्याच्या आशाही मावळल्या सारख्याच झाल्याय!बायको मुलांसह संपवावं सगळं ! असं कधीकधी वाटतं!नको असं जगणं…

शू! चूप बस्स! असं अभद्र बोलू नकोस! सगळं चांगलं होईल! असा धीर सोडू नकोस! अरे माझ्याकडे बघ! आम्ही सुद्धा कसबसं तोंड देतोय आल्या दिवसाला! नोकरी आहे, पण अर्धाच पगार मिळतोय यांना! तुला एक सांगू! भाऊबीजेला येण्याचं मुद्दाम टाळलं मी ! उधार उसनवार करुन तुम्ही केलंही असतं रे माझं सगळं! पण नाही पटलं ते मनाला! यांनी सुद्धा माझाच निर्णय योग्य ठरवला!

उलट आपल्याकडून होता होईल तितकी मदत करूया! असं ठरवलं यांनी! तुला संकोच वाटेल,म्हणुन तुझ्याशी नाही बोलले हे! आता सुद्धा फराळाबरोबर तुझ्या ओवाळणीच्या रिकाम्या पाकिटात थोडे पैसे ठेवलेत,ते नीट सांभाळ!आणि असा खचून जाऊ नको रे!आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी!सगळे दिवस सारखेच नसतात!आणि हो!या भाऊबीजेची ओवाळणी म्हणुन एक वचन दे मला! इथून पुढं कुठलाही वाईट विचार आणणार नाहीस मनांत! शांतपणे घरी जा! तुझे

भाऊजी नेहमी म्हणतात ना! तसं म्हणते मी बहिणीचं बंधूप्रेम आणि भ्रमणध्वनीच्या सूक्ष्म लहरींनी खूप चांगलं काम केलं होतं आज..खचलेल्या एका भावाला नव्यानं उभारी देण्याचं! अशा कोणत्याच सावटाखालची भाऊबीज यापुढे येऊ नये हीच अपेक्षा. आणि हो भावा बहिणीच असे अतूट नातं असलेल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा!!!

- Advertisment -

ताज्या बातम्या