भोंग्याचा वाद; पोलिसांना ताण

भोंग्याचा वाद; पोलिसांना ताण

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी 4 मेपर्यंत राज्यातील मशिदींवरील (Mosques) भोंगे (loudspeaker) उतरविण्यासाठी अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. मात्र तसे न झाल्याने मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचे आदेशित केल्यावर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर (Police administration on alert mode) आले.

त्यांनी तत्काळ मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा बजावणे सुरु केले. यानंतर ईदपासूनच (eid) पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्यात आल्या. पहाटेच्या अजानच्या वेळी मनसैनिकांनी काही करू नये व त्यामुळे कायदा व सुव्यवस्था (Law and order) सुरळीत राहावी, याकरिता पोलिसांचा फौज फाटा मशिदीच्या बाहेर तसेच मुख्य चौकांत तैनात झाला. दिवसभरात 5 वेळा होणार्‍या नमाज पठणाच्या (Namaz Pathan) वेळेच्या सुमारे तासभर अगोदर पोलिसांना आपल्या पॉईंटवर हजार राहावे लागत आहे. पहाटे तर 4 वाजताच नेमून दिलेल्या ठिकाणी जावे लागते.

सर्वजण जेंव्हा आपापला सण साजरा करत असतो तेंव्हा पोलीस (police) आपल्या कुटुंबाला सोडून बंदोबस्तावर तैनात असतात. सध्या देखील कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची अर्जित रजा पुढील आदेश येईपर्यंत बंद आहेत. सुदैवाने पोलिसांची साप्ताहिक सुट्टी सुरु झाली.

या आनंदात काही अधिकारी व कर्मचार्‍यांनी तर एकमेकांचे अभिनंदन केले. पोलीस प्रशासनाचा (Police administration) तणाव कसा कमी करता येईल, यावर अद्यापपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने वक्तव्य केले नाही. मात्र त्यांचा त्रास सदैव कसा वाढेल, या दृष्टीने सुरु असलेले राजकारण (politics) बंद होणे गरजेचे आहे. असे झाल्यास पोलीस निदान दुसर्‍या विषयांकडे लक्ष देऊ शकतात, हे मात्र निश्चित.

असा असेल बंदोबस्त

ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामध्ये 2 उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्त, 45 पोलीस निरीक्षक, 79सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 956 पुरुष व महिला अंमलदार, 600 पुरुष व महिला होमगार्ड, 52 वाहने, 2 स्ट्रायकिंग फोर्स, 1 एसआरपीएफ तुकडी, तसेच नियंत्रण कक्षात राखीव जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक व इतर शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार, बी. डी. डी. एस. , दहशदवाद कक्षातील व सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी असा बंदोबस्त पुढील आदेश येईपर्यंत ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.