Monday, April 29, 2024
HomeUncategorizedबांधकाम साहित्य महागले; व्यावसायिकांवर संकट

बांधकाम साहित्य महागले; व्यावसायिकांवर संकट

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

करोना (corona) काळातील आर्थिक कोंडीपाठोपाठ इंधन दरवाढीचा (Fuel price hike) उच्चांक गाठला गेल्याने व्यवसायीक (Professional) त्रस्त झालेले होते.

- Advertisement -

त्यापाठोपाठ स्टिल दरवाढीमुळे (Steel price hike) बांधकाम व्यवसाय (Construction business) अडचणीत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यायाने तयार घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधिच निम्म्यावर आलेला व्यवसायात दरवाढीमुळे गृहप्रकल्पावर (Housing project) होणार्‍या विपरित परिणामामूळे बांधकाम व्यवसायाचे कंबरडे मोडले जाण्याची शक्यता आहे.

करोनामुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असून, याला बांधकाम उद्योगही अपवाद नाही, कोरोना, लॉकडाऊन (Lockdown) या सगळ्यामुळे जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असल्याने त्याचा विपरीत परिणाम बांधकामाच्या दरावरही होणार आहे.

व्यावसायिकांची तारेवरची कसरत झाले असून सुरू आहेत, आर्थिक गणित स्थिरावत असताना सिमेंट (Cement), लोखंड (Iron) या कच्चा मालाच्या (Raw material) दरवाढीमुळे प्रकल्प अव्यवहार्य ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहेे. केंद्र शासनाने (central government) या किंमती नियंत्रित करण्याची वेळ देऊन ठेपली आहे, कोरोनामुळे बांधकाम उद्योगाला मोठा फटका बसला असल्याने बांधकाम व्यवसायीकांना प्रोतसाहन मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने (maharashtra government) मुद्रांक शुल्कापात (Stamp duty) व प्रमियम शुल्कात 50 टक्के कपात योजना लागू केलेली होती.

अशा सवलतींमुळे घर खरेदीदारांना प्रोत्साहन मिळाले होते. मात्र मार्च महिन्यानंतर ही सवलत बंद करण्यात आली. दुसरीकडे गत दिड वर्षापासून सिमेंट व लोखडाचे दर अवास्तव वाढलेले आहेत. कोळश्याचा तुटवडा (Shortage of coal), नॅचरल गॅस (Natural gas) यांच्या सोबतच इंधन दरवाढीमुळे (Fuel price hike) मालवाहतूकीवर झालेली दरवाढ यामुळे बांधकामाचे मूल्य प्रचंड वाढले आहे.

कोरोना पूर्वी जी सिमेंटची गोणी 270 रुपये होती ती आज 380-385 रूपयांवर पोहोचली असून 38 रुपये किलोचे स्टील थेट 66 रूपयांवर गेले आहे. एक क्यूबिक मीटर ब्लॉकसाठी (Cubic meter block) चार महिन्यांपूर्वी 2600 रुपये मोजावे लागत होते. आज हेच दर 3100 रुपयांवर गेले आहे. यामुळे दरवाढीच्या कचाट्यात बांधकाम उद्योग अडकला आहे.

कोरोना नंतर आतापर्यंत बांधकामातील महत्वाच्या साहित्यांची मोठी दरवाढ झालेली आहे. त्यात प्रामुख्यांने सिमेंट व स्टिलमध्ये 60 ते 80 टक्के पीव्हीसी 90 टक्के, सॅनिटरी बेअर 35 टक्के दरवोढ झाल्याचे चित्र आहे. यासोबतच फिटींगची मजुरी 40 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे बांधकामाचे दर आपोआपच चौरस फुटावर महागण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर बांधकाम व्यवसायीक तितकीच दरवाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे घरांच्या किंमती भडकणार असून, घर महागण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीत घराच्या बुकिंगला मोठा प्रतिसाद लाभण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्यावसायिक कोंडीत

महारेरा कडे नोंंदवलेल्या दरांमध्ये या नव्या कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे बदल करणे कठीण होणार असल्याने एक तर घाट्यात घरे विकावी लागतील अन्यथा विक्री दरवाढ होईपर्यंत ‘होल्ड’ करावी लागण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.अनेक व्यवसायीकांनी करोना नंतर प्रकल्पाला प्रारंभ केला असल्याने बाजारमुल्याच्या तूलनेत लागणार्‍या भांडवलाचा मेल बसत नसल्याने व्यवसायीक चिंतीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या