नदीपात्रात बांधकाम; कोणाला घेऊन बुडणार

नदीपात्रात बांधकाम; कोणाला घेऊन बुडणार

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक महापालिकेचा (Nashik Municipal Corporation) कारभार काही सुधारण्याचे नाव घेतांना दिसत नाही. कधी टीडीआर घोटाळा (TDR scam) तर कधी बीओटी तत्वावर विकसित होणारे शहरातील 22 भूखंडचा वाद (Land dispute), अशा विविध कारणांंनी नाशिक मनपाच्या कारभाराचा पंचनामा होतांना दिसतो.

आता ताजे उदाहरण देण्याचे झाले तर मनपाच्या नगररचना विभागाच्या (Town Planning Department) गोंधळी कारभारामुळे थेट नदीपात्रात (river basin) इमारत बांधकामाला (Building construction) परवागी देण्यावरुन सुरू झालेला वाद आहे. तर हा वाद देखील संपण्याचा नाव घेतांना दिसत नाही. दुसरीकडे हा विषय खोदून आणणार्या मनसेना (MNS) ज्येष्ठ नगरसेवक सलिम शेख (Corporator Salim Sheikh) यांनी हा मुद्दा राज्यस्तीय केल्याने ऐन निवडणुकीच्या (election) तोंडावर सत्ताधारी भाजपला (bjp) हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक मनपात भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) एकहाती सत्ता आहे. तर 2017 च्या निवडणूक प्रचार सभेत (Election campaign meetings) त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकला दत्तक (Adoption) घेण्याचे विधान केले होते. यामुळे त्यांना विकास करुन दाखवणे हे अनिवार्य झालेले आहे. मात्र दुसरीकडे विरोध पक्ष सत्ताधार्‍यांच्या चुका समोर आणूक आरोपांच्या फैरी झाडतांना दिसतो. मागील दोन स्थायी समितीच्या बैठकीत (Standing Committee Meetings) मनसेना नगरसेवक सलिम शेख हे सतत नगररचना विभागाच्या गाांधळी कारभाराचा पंचनामा करीत आहे.

सुमारे 75 हजार कुटुंब नाशिकच्या नदीतीरी राहतात. त्याप्रमाणे रेड (red) व ब्ल्यू लाइनप्रमाणे (Blue line) बांधकाम परवाने देण्याचे कायदे असून सुद्धा आनंदवली शिवारातील काही बिल्डरांना थेट नदी पात्रात इमारती बांधकामसाठी परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक शहराची स्मार्ट सिटीच्या (smart city) दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात विशिष्ठ बिल्डर्सकडून अनधिकृत बांधकामे उभारण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातूनच अलीकडे गोदावरी नदीपात्रामध्ये (Godavari river basin) पूररेषेत अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रकार उघड झाले आहेत.

नगरचना विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने नदीपात्रालगत पूररेषेत बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्याचे आरोप होत आहे. पाहणी न करता, विकास आराखड्यातील नियमांचे उल्लंघन करून गोदापार्कसाठी संपादित झालेल्या जागेवर ऑनलाइन बांधकाम परवानगी दिली जात आहे. 6 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांची पोलखोल करण्यास सुरुवात केली होती,

फोटो पुरावे सादर करून आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक 65 मध्ये सुरू असलेल्या कामाची व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर आनंदवली शिवारातील सर्वे क्रमांक 65 मध्ये गोदावरी नदीपात्रातील कथित अनधिकृत बांधकामा-विरोधात नगरसेवक शेख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करून हा मुद्दा राज्यस्तरीय करून दिला आहे.

अग्रवाल यांची आयुक्तांकडे तक्रार

नाशिकच्या आनंदवली शिवारात गोदावरी नदीपात्रात (Godavari river basin) अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) केल्याप्रकरणी नगररचना विभागातील उपअभियंता संजय अग्रवाल यांच्याविरोधात मनसेेचे नगरसेवक शेख यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शहरातील अनेक भागात अग्रवाल यांच्याच मार्फत अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप करत नगररचना विभागात ते अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. उपअभियंता संजय अग्रवाल यांची भुमिका संशयास्पद असून पॅकेज स्वरूपात प्रकरण दिल्यास मी मंजूर करून देतो, सर्व अधिकार्‍यांच्या सह्या घेऊन देतो अशा त्यांच्याबाबतीत तक्रारी असल्याचे शेख यांनी निवेदनात म्हटले आहे. शहरातील बहुतांशी बिल्डर नगररचना नियमांचे पालन करून बांधकाम करत आहे ही बाब चांगली असली तरी गत काही दिवसांमध्ये काही विशिष्ट बिल्डरांकडून शहरात अनधिकृत बांधकाम करण्याचे प्रकार वाढत आहे.

गोदापात्रात अनाधिकृत बांधकामे होत असून गेल्या काही दिवसांमध्ये नगररचना विभागातील विशिष्ट अधिकाजयांच्या कामकाजाविषयी तक्रारी देखील वाढल्या आहेत. यामुळे नाशिक महापालिकेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आहे याबाबत वेळीच योग्य दखल घेऊन कारवाई केल्यास पुढील होणारी बदनामी टाळता येऊ शकेल. दरम्यान नगर लग्नाच्या निघालेला हा गोधडी कारभार कोणाला घेऊन बुलढाणा बुडवणार याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com