Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदिलासा निर्यातवृद्धीचा

दिलासा निर्यातवृद्धीचा

– जान्हवी शिरोडकर

आधारावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी असे म्हटले आहे की, यावर्षी एकंदर निर्यातीचा आकडा 400 अब्ज डॉलरवर पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- Advertisement -

पहिल्या तिमाहीतील यशाच्या पार्श्वभूमीवर हे लक्ष्य गाठणे हे फार मोठे आव्हान असणार नाही. महामारीची दुसरी लाट कमकुवत झाली आहे आणि लसीकरणही वेगाने सुरू आहे. देशाच्या बहुतांश भागांमधून निर्बंध हटविण्यात आले आहेत आणि औद्योगिक तसेच व्यावसायिक घडामोडींनी वेग पकडला आहे.

कोरोनाच्या महामारीच्या नकारात्मक प्रभावा

मुळे भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे हे खरे; परंतु काही ठोस आधारांमुळे गुंतवणूक आणि निर्यातीत उत्साहवर्धक वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 95.36 अब्ज डॉलर किमतीची निर्यात झाली आहे आणि हे एक अभूतपूर्व यश आहे. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यांत झालेल्या निर्यातीत 85 टक्क्यांची उसळी दिसून येत आहे.

एप्रिल ते जून 2020 मध्ये हाच आकडा 51.44 अब्ज डॉलर होता. उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही अर्थव्यवस्थेला कोरोना महामारीचा भयावह प्रकोप सहन करावा लागला. महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता आयातीत वाढ होणेही स्वाभाविक आहे. त्यामुळे व्यापारी तूटही वाढत राहिली. परंतु देशांतर्गत उद्योगांत आणि बाजारपेठेत मागणी वाढत आहे, हेही वाढलेल्या आयातीतून सूचित होते.

यामुळे उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल आणि आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळातही निर्यातीच्या बाबतीत उत्साहवर्धक परिणाम दिसून येतील. गेल्या वर्षी जूनमध्ये सर्वाकाही ठप्प असल्यामुळे आयात जवळजवळ बंदच होती. त्यामुळे आपल्याला व्यापार अधिशेष मिळाला होता, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. याच विश्वासाच्या आधारावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी असे म्हटले आहे की, यावर्षी एकंदर निर्यातीचा आकडा 400 अब्ज डॉलरवर पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातील. पहिल्या तिमाहीतील यशाच्या पार्श्वभूमीवर हे लक्ष्य गाठणे हे फार मोठे आव्हान असणार नाही.

महामारीची दुसरी लाट आता बरीच कमकुवत झाली आहे आणि लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे. सुमारे दीड वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर तिसर्‍या लाटेची शक्यता गृहित धरून तयारीही केली जात आहे. देशाच्या बहुतांश भागांमधून निर्बंध हटविण्यात आले आहेत आणि औद्योगिक तसेच व्यावसायिक घडामोडींनी वेग पकडला आहे. निर्यातीत झालेल्या वाढीतून असेही दिसून येते की, गेल्या वर्षी महामारीचा जोर सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आत्मनिर्भर भारत मोहिमेचा प्रारंभ केला होता, त्याचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान भक्कम करणे हा या मोहिमेचा हेतू आहे.

या मोहिमेअंतर्गत भारतीय उद्योग आणि उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्यात आला आहेच; शिवाय नियमनाच्या प्रक्रियेत बदल करून व्यवसाय सुगमता वाढीस लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. नागरिकांना दिलासा देणार्‍या आर्थिक पॅकेजव्यतिरिक्त अर्थसंकल्पात तसेच काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नवीन घोषणांमध्ये अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यास प्राधान्य देणार्‍या उपायांचा समावेश आहे.

या उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेच्या भविष्यावरील विश्वासही वृद्धिंगत झाला आहे. मेकॅनिकल मशीनरी, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, क्रीडा क्षेत्रातील वस्तू, खेळणी आणि शेतीशी निगडीत काही वस्तूंची निर्यात वाढण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांना वाटते. तंत्रज्ञान, विशेषतः डिजिटल तंत्रज्ञान आणि वित्तीय उपलब्धतेच्या विस्ताराने निर्यातीला मोठा आधार दिला आहे. या घटकांना प्राधान्य देऊन आणि धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करून निर्यातीचे लक्ष्य गाठता येऊ शकते, असे तज्ज्ञ मानतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या