Monday, April 29, 2024
HomeUncategorizedउद्योग विभागासह एमआयडीसीने कंबर कसली

उद्योग विभागासह एमआयडीसीने कंबर कसली

नाशिक | रवींद्र केडीया | Nashik

जिल्ह्यातील उद्योग विकासाला गती (Accelerate industry development) मिळत असून येणार्‍या काळात नाशिक (nashik) ‘नेक्स डेस्टिनेशन’ (Next destination) म्हणून ठळकपणे पुढे येताना दिसून येत आहे. यासाठी केवळ उद्योजकांचाच रेटा आहे असे नाही तर राज्य शासन (state government) व प्रशासनही मोठ्या जोमाने कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

उद्योग जिल्ह्यात यावे, यासांठी त्यांना लागणार्‍या सेवा सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योग विभागासह एमआयडीसीने (MIDC) कंबर कसली आहे. उद्योगांच्या जागेची पूर्तता करण्यासाठी मागे रखडलेला राजूर बहूला जागा अधिग्रहणाला हिरवा कंदील मिळाला आहे. नाशिक घोटीदरम्यान जागेचा शोध सुरू असून, या परिसरात एमआयडीसीचा औद्योगिक वसाहत (Industrial estate) उभारणी करण्याचा मानस आहे.

जिल्ह्यात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यासोबतच त्यावर प्राथमिक सुविधा उभारणीचे (Primary facility erection) कामही गतिमान झालेले आहेत. जिल्ह्यात आज आक्राळे (दिंडोरी), अंजंग (मालेगाव), राजूर बहुला, सिन्नर (sinnar) येथे मालपाणी इस्टेट (Malpani Estate) या माध्यमातून एक हजार ते बाराशे हेक्टर जागा उपलब्ध आहे. पाण्याच्या दृष्टीने जिल्हा सक्षम असल्याने येणार्‍या काळात उद्योग विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. उद्योगांच्या विकासासाठी लागणारी इको सिस्टीम (Ecosystem) या जिल्ह्यात वेगाने विकसित होत आहे.

त्यात प्रामुख्याने अंबड औद्योगिक वसाहतीत उभारणी करण्यात आलेली व सक्षमपणे काम कारणारे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर (Nashik Engineering Cluster), शिलापूर परिसरात 100 एकरावर इलेक्ट्रीकल साधनांच्या तपासणीसाठी ‘सिपीआरआय’ प्रयोगशाळा (CPRI’s laboratory) उभारणी अंतिम टप्पात आहे. गोवर्धन गावालगत ‘सिपेट’ची उभारणी लवकरच सुरू केली जाणार आहे. मध्यंतरी रिलायन्स उद्योग समुहाने सुमारे 2100 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. इंडियन ऑइल कंपनीनेही 300 कोटींची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे.

नुकत्याच झालेल्या आयमा इंडेक्सच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजकांनी गुंतवणुकीचे सुमारे 2 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केलेले आहेत. त्या माध्यमातून उद्योग विस्तारीकरणाला गती मिळण्याची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीने ही उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचे धोरण अंगिकारले आहे. एकेकाळी उद्योग कामगारांच्या गर्दीने गजबजलेला रुषीरुप रस्ता गेल्या काही वर्षांपासून ओस पडलेला होता. याठिकाणी असलेल्या सात्विक उद्योग, नेटेल्को, शालिमार वायर, रषिरुप या उद्योगांच्या विविध कारणांने बंद पडले होते. प्रत्येक कारखान्यात हजारो कामगार रोजगार मिळवत होते. या सर्व कामगारांचा रोजगार बुडाला. कारखाने ओस पडल्याने या परिसराची रयाच गेली होती.

बंद कारखान्यांच्या जागेवर छोटे उद्योग

गेल्या काही वर्षांत आजारी पडलेल्या व कालांतराने बंद असलेल्या या कारखान्यांच्या जागा खासगी उद्योजकांनी खरेदी करुन उद्योगांना छोट्या प्लॉटमध्ये विभागून दिल्या. यामुळे लघू उद्योगांना विस्तारीकरणात शहरांतर्गत जागा उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. बंद पडलेल्या बिसीएल फोर्जिंग व बिझनेस कंबाईन या उद्योगांच्या जागी आता छोटे छोटे उद्योग उभे राहत आहेत.

या उद्योगांसोबतच अग्निशमन कार्यालयाच्या मागे असलेल्या कांदा फॅक्टरीच्या मोठ्या जागेवर उद्योग उभारणीची लगबग पहायला मिळत आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या रिक्त भूखंडांवरही मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात नव्या उद्योग उभारणीतून चैतन्य असल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या