कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव

राजु श्रीवास्तव हे एक प्रसिद्ध काँमेडीयन चित्रपट अभिनेता होते. त्यांना सर्व जण हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेता म्हणुन ओळखत. राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव असून ते गजोधर भैया या नावानेही ओळखले जातात. एक प्रसिद्ध काँमेडियन अभिनेता व काँमेडीचा किंग मिमिक्रीकार असण्यासोबत राजु श्रीवास्तव हे एक प्रसिद्ध राजनेता व उत्तर प्रदेश येथील चित्रपट विकास परिषद ह्या संघटनेचे अध्यक्ष सुद्धा होते.

राजु श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये कानपुर येथे झाला होता. राजु श्रीवास्तव हे लहान होते तेव्हापासुनच त्यांना काँमेडी करायला आवड होती.राजु श्रीवास्तव यांनी आपल्या करिअरची सुरूवात ही स्टेज शो पासुन केली होती.यानंतर ते लोकांमध्ये अधिक प्रसिद्ध होऊ लागले. ते आपल्या विनोदी कौशल्याने लोकांच्या चेहर्‍यावर हसू आणत.

राजु श्रीवास्तव यांनी अनेक टिव्ही शो मध्ये काम केले आहे जसे कि जसे बिग बाँस थ्री, ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेंज, शक्तीमान, राजु श्रीवास्तव यांनी काम केलेल्या काही प्रसिदध हिंदी चित्रपटांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - तेजाब,मैने प्यार किया, मै प्रेम की दिवानी हुँ, बाँम्बे टु गोवा, बाजीगर, मिस्टर आझाद आदी.

राजू श्रीवास्तव हे स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रचंड लोकप्रिय होते. विशेषतः उत्तर भारतीय लहेज्यातील त्यांची विनोद सादर करण्याची धाटणी प्रचंड लोकप्रिय होते. गजोधर हे त्यांनी साकारलेले पात्र लोकांच्या मनात अजूनही घर करून आहेत. अमिताभ बच्चन यांची नक्कलही करूनही त्यांनी शाबासकी मिळविली होती. राजू यांचा प्रवास सहजसोपा वाटत असला तरी त्यात बर्‍याच अडचणी आल्या. राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव एक प्रसिद्ध कवी होते, त्यांना बलई काका या नावानं ओळखलं जायचं. त्यांनाही कलेच्या क्षेत्रात नाव कमवायचं होतं. त्यामुळं त्यांनी मुंबईची वाट पकडली.

मुंबई आल्यानंतर त्यांनी चांगल्या कामाच्या शोधात अनेक वर्षे संघर्ष केला. कॉमेडीची आवड होती, पण हव तसं काम मिळत नव्हतं तेव्हा पोटापाण्यासाठी त्यांनी ऑटोरिक्षाही चालवली होती. काही काळ त्यांनी अशी अनेक छोटी मोठी कामं करत दिवस काढले. पण कॉमेडीची आवड आणि काही तरी मोठं करण्याची जिद्द याच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत कायमचे स्थान मिळवलंच. . मात्र, लोकांना हसवणारा राजू श्रीवास्तव मृत्यूशी झुंज देताना सर्वांना रडवून गेला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com