Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedदांडी यात्रेची शतकी वर्षाकडे वाटचाल...

दांडी यात्रेची शतकी वर्षाकडे वाटचाल…

डॉ. अश्विन झाला

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अनेक सत्याग्रह केले, पण त्यातील मिठाचा किंवा दांडीयात्रा सत्याग्रह विशेष ठरला. महात्मा गांधीजींनी 91 वर्षांपूर्वी 78 लोकांनी मिळून केलेला हा सत्याग्रह आज देखील जगातील दहा मोठ्या सत्याग्रहांमध्ये गणला जातो.

- Advertisement -

2021 मध्ये या मिठाच्या सत्याग्रहाला 91 वर्ष होत आहेत, या सत्याग्रहाच्या शतकी वाटचालीबाबत गांधी रिसर्च फाउंडेशनचे डॉ. अश्विन झाला यांनी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख खास वाचकांसाठी…

18 जानेवारी 1930 रोजी प्रथमच मीठाबाबत आंदोलन करण्याची संकल्पना गांधीजींच्या मनात आली. या विचाराबाबत गांधीजींच्या अवतीभवती असलेल्यांनी फारसे महत्त्व दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू या सगळ्यांनी सत्याग्रहाबाबतच्या विचार विनिमय बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला. असे सत्याग्रह करून स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकणार नाही असे मत व्यक्त केले. त्यात व्हाईसरॉय लॉर्ड इरविन ने म्हटले कि, “भारतात गांधींनी जी दांडीयात्रा जाहीर केली आहे त्यामुळे मला काहीच फरक पडणार नाही. 61 वर्ष वयाच्या व्यक्तिने एवढी दीर्घ यात्रा करणे आणि ती यशस्वी करणे हे ब्रिटीश शासनकाळात केवळ असंभवच!” त्यांच्या या भाष्याला गांधीजींनी अधिक विचार करून त्याला कृतीतून परखड उत्तर दिलं. त्यांनी लॉर्ड इरविनला एक पत्र लिहून पाठविले परंतु त्या पत्राचे त्यांना प्रत्युत्तर मिळाले नाही. म्हणूनच गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेस सुरूवात करण्याची घोषणा केली. 12 मार्च रोजी गांधीजी नेहमीप्रमाणे सकाळी 4 वाजता उठले, नित्यकर्म केले. 6 वाजता प्रार्थना, साडे सहा वाजता यात्रेकरिता प्रस्थान करण्यासाठी काकासाहेब कालेलकर यांनी गांधीजींच्या हातामध्ये लाठी दिली, चप्पल सरकविली, कस्तुरबांनी त्यांच्या कपाळी टिळा लावला अन सुरू झाला दांडी यात्रेचा प्रवास!

या दरम्यान एक वेगळी घटना घडली. महात्मा गांधीजींचे द्वितीय सुपुत्र मणिलाल यांच्या पत्नी रडत होत्या. तेव्हा कस्तुरबा त्यांना म्हणाल्या की, या अश्रूंनी भरलेल्या चेहर्‍याने या योद्धांना निरोप देशील? हे योद्धा आहेत आणि आपण या योद्धांच्या अर्धांगिनी आहोत, जर आपण भक्कम राहू तरच ते पण प्रखर बनतील. 78 सत्याग्रहींचा समूह एका ओळीत उभे राहिले. ओळीत उभे सत्याग्रही भारताच्या 16 राज्यांचे प्रतिनिधित्व करीत होते.

12 मार्च ते 5 एप्रिल पर्यंतच्या या यात्रे दरम्यान गांधीजींनी 11 नद्या पार केल्या. दांडी यात्रेत महात्मा गांधीजींना भारतातील 11 नद्यांना पार करावे लागले. गांधीजींनी किमान 50 पत्रे लिहीली, 46 भाषणे व 6 वेळा राष्ट्राला उद्देशून भाषण केले. 78 लोकांचा समूह अहमदाबादहून दांडी येथे पोहोचता-पोहोचता लाखोंच्या संख्येने भर पडली होती. त्याच दिवशी त्यांच्या एका सहकार्याने म्हटले, ङ्गबापू, माझा एक मित्र अमेरिकेत राहतो त्याच्याकरिता तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता?फ तेव्हा गांधीजींनी ऐतिहासिक संदेश देत लिहिले – 6 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता गांधीजींनी समुद्रात स्नान केले आणि मुठभर मीठ उचलले तेव्हा एक गगनभेदी आवाज आला की ‘मिठाचा कायदा मोडला’. त्यांचा तो गगनभेदी आवाज दांडीपर्यंतच सीमित नव्हता तो तर संपूर्ण विश्वात पसरला. बापूंच्या संदेशानंतर लोक जागृत झाले आणि ठिकठिकाणी मिठाची निर्मिती करू लागले. कित्येक प्रदेशात सत्याग्रहाचा आरंभ झाला होता.

ज्याप्रमाणे लोकांमध्ये योद्धत्वाची भावना येते त्या तर्‍हेने लोकं मीठ तयार करण्यासाठी बाहेर निघून जायचे. त्यावेळी भारतात जवळपास पाच हजाराहून अधिक सत्याग्रह झालेत. मुठभर मिठाच्या आधाराने गांधीजींनी ब्रिटिशांचे साम्राज्याला हादरून टाकले.

गांधीजींद्वारे सुरू करण्यात आलेले हे आंदोलन यशस्वी झाले होते. आधी जी लोकं या आंदोलनाचा विरोध करीत होती किंवा मिठाबाबत गांधीजींशी सहमत नव्हते त्यांना गांधीजीं जेव्हा दांडी येथे पोहोचले आणि त्यानंतर तीव्र झालेल्या आंदोलनाने त्यांना प्रत्युत्तर दिले. जे आधी विरोध करत होते त्यांनीच या आंदोलनाची प्रशंसा केली.

मिठाच्या सत्याग्रहाचा आरंभ झाला त्यावेळी व्हाइसरॉय लार्ड इरविन ने व्यंगपूर्ण रूपाने म्हटले होते की मुठभर मिठाने ब्रिटीश शासनाला हादरून सोडण्याची ही एक विभ्रांत योजना आहे. मात्र याच दांडीयात्रेने ते लक्ष्य साध्य करून दाखविले. जवाहरलाल नेहरूंनी म्हटले की, आम्हाला गांधीजींच्या या दक्षतेचे फार आश्चर्य झाले पुढे ते म्हणाले की आपल्या जादुई स्पर्शाने तुम्ही नवीन भारत निर्माण केला आहे, या महान कार्यासाठी मी आपले मन:पूर्वक अभिनंदन करतो. भविष्यात काय होईल याची मला काहीच कल्पना नाही, परंतु भूतकाळाने (दांडी यात्रेने) आमच जीवन समृद्ध केले आहे, आमचं साधारण ते नीरस जीवनाला महाकाव्य समान महानता प्राप्त झाली आहे.

दांडीयात्रेनंतर देशभरात चरखा चालवण्याच्या संख्येत कमाली वाढ झाली. लोकं खादीचे कपडे वापरू लागले, रचनात्मक कार्य करणार्‍या लोकांचीही संख्या वाढली. अशी अनेक गावे होती ज्यांनी स्वावलंबनाच्या आधारावर उपक्रम सुरू करू केले. सन 1942 च्या ‘भारत छोड़ों’ आंदोलनामध्ये ते अहिंसक तत्वाच्या आधारे यशस्वी झाले परंतु त्याचे पूर्ण श्रेय दांडी सत्याग्रहालाच जाते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले पण यासाठी मूळ पाया 12 मार्च 1930 लाच रचना गेला होता. सत्तेच्या विरूद्ध संघर्ष आणि अधिकाराच्या लढ़ाईत राष्ट्रपिता महात्मा गांधी आज ही प्रेरणा स्थानी आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या