सीमांकनावरून अडले बाह्यवळणाचे घोडे

jalgaon-digital
3 Min Read

लासलगाव । हारूण शेख | Lasalgaon

लासलगाव (lasalgaon) बाह्यवळण रस्त्याचे यापूर्वी झालेले सीमांकन बदलून नवीन सीमांकनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने शेतकरी (farmers) संतप्त झाले आहेत. लासलगावातील रहदारीची समस्या व अपघात टाळण्यासाठी गेल्या सोळा ते सतरा वर्षांपासून लासलगाव बाह्यवळण रस्त्याचे काम (road work) सुरू आहे.

सदर प्रकल्पाच्या भूसंपादनाचे (Land acquisition) तीन टप्पे करण्यात आले होते. यापैकी दोन टप्प्यांचे भूसंपादन व रस्त्याचे काम (raod work) पूर्ण झाले आहे. सध्या तिसर्‍या टप्प्यातील भूसंपादनाची मोजणी, सीमांकन, शोध अहवाल, मूल्यांकन आदी प्रकारच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. भूसंपादन करून रस्त्याच्या कामास सुरुवात करणे एवढेच काम बाकी असताना भूसंपादन (Land acquisition) अधिकार्‍यांनी अचानक यूटर्न घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला मान्य नसल्याचे कारण देत नवीन सीमांकनाची प्रक्रिया (process of demarcation) भूसंपादन अधिकारी (Land Acquisition Officer) व सार्वजनिक बांधकाम अधिकारी (Public Works Officer) यांच्या समन्वयाने सुरू करणार अशा आशयाचे वृत्त निफाडच्या (niphad) प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे (Prantadhikari Dr. Archana Plateau) यांच्या नावाने वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे शेेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

शेतकर्‍यांनी आजवर कधीही प्रकल्पास विरोध केलेला नाही. अधिकारी व शेतकर्‍यांची अधिकृत बैठकच झालेली नाही. शेतकर्‍यांना दरच माहीत नसल्याने मोबदला मान्य नसल्याचा प्रश्नच येत नाही. याच प्रकल्पातील मागील शेतकर्‍यांवर झालेला अन्याय लक्षात घेता पुन्हा तसा प्रकार होऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी भुजबळांना साकडे घातले होते. तेव्हा भुजबळांनी शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले होते, सीमांकन बदलण्याचे नाही. तसेच जिल्हाधिकारी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकर्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात येऊन न्यायाच्या मागण्याबाबत त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा झाली होती. याव्यतिरिक्त शेतकर्‍यांच्या वतीने कधीही तीव्र विरोध झालेला नाही.

बरेच शेतकरी (farmres) खरेदी देण्याच्या मानसिकतेत आहेत. उर्वरित शेतकर्‍यांचे भूसंपादन (Land acquisition) करण्याचा अधिकार भूसंपादन अधिकार्‍यांना आहे. तरीदेखील हा सीमांकन बदलण्याचा अट्टाहास कशासाठी? सीमांकन बदलले तरी तेथील शेतकरी योग्य दर मागणार नाहीत का? तसेच तांत्रिक अडचणी येऊन अपघात वाढणार नाहीत का? अवघ्या एक कि.मी.च्या कामात या अगोदरदेखील दोन वेळेस तांत्रिक अडचणीचे कारण देत सीमांकन बदलण्यात आले होते. आता अजून किती वेळेस सीमांकन बदलणार आणि रस्ता अस्तित्वात येणार तरी कधी? असा प्रश्न शेतकरी व नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. येवला-लासलगाव मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ हे शेतकर्‍यांचे कैवारी आहेत. शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले होते, सीमांकन बदलण्याचे नाही.

सीमांकन बदलल्यास लासलगाव बाह्यवळण रस्ता अपघात प्रणव क्षेत्र होईल. त्यामुळे सीमांकन जैसे थे ठेवावे. त्यात कुठलाही बदल करू नये, असे लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली पण प्रत्यक्ष लाभार्थी शेतकर्‍यांशी याबाबत चर्चा केली नाही. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी संमती दर्शवली असताना अधिकारी स्तरावर नवीन सीमांकन का होत आहे, हे लक्षात येत नाही. सर्व शेतकरीवर्गाची संमती पत्रावर यापूर्वी स्वाक्षरी घेतलेली आहे. केवळ एक-दोन व्यक्तींसाठी यास हरकत आहे. पालकमंत्री भुजबळ यांनी विश्वासात घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिलेले असतानाही नवीन सीमांकनाचा अट्टाहास का, असा सवाल शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *