Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपुलाची सोय: तिकिटासाठी गैरसोय

पुलाची सोय: तिकिटासाठी गैरसोय

नांदगाव । संजय मोरे | Nandgaon

भारतातील पादचारी पुलांनी (Pedestrian bridges) एवढी वर्षे विनाकुरण सेवा दिली. आता मात्र त्यातील अनेक पादचारी पूल जरा जर्जर झाले आहेत. ब्रिटिशांच्या (British) कारभारात एवढी व्यावसायिकता की पुलाचे आयुर्मान संपल्याचे त्यांच्याकडून नांदगाव रेल्वेस्थानकात (Nandgaon Railway Station) असलेल्या पादचारी पुला संदर्भात ब्रिटिश सरकारने (British government) पत्र पाठवले आहे की, रेल्वेस्थानकावरील (Railway station) पादचारी पुलाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याची मुदत संपली आहे.

- Advertisement -

नवीन पूल उभारण्यात यावा, असे आशयाचे पत्र भुसावळ डिव्हिजनला (Bhusawal Division) प्राप्त झाले होते. या अनुषंगाने रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र, नांदगाव शहरात ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता अधिक आहे. त्या भागाऐवजी रेल्वेने तिकीट खिडकीची (Train ticket window) व्यवस्था विरळ लोकवस्तीच्या भागात केल्याने पूल उभारणीने सोय होणार असली तरी तिकीट काढण्यासाठी नागरिक, प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही बाब रेल्वे प्रशासन (Railway Administration) लक्षात घेईल का, हा सवाल आहे.

नांदगाव रेल्वेस्थानकावर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पुल लवकरच इतिहास जमा होणार आहे पादचारी पुलाला 100 वर्षे पूर्ण झाले असल्याचे पत्र ब्रिटिश सरकारने पाठवले आहे. या पादचारी पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, पादचारी पुल दिमाखात उभा आहे. त्याची सध्याची स्थिती योग्य असल्याने या शंभरी गाठलेला पुल वाटत नाही. नव्या पादचारी पुला काम युध्दपातळीवर सुरू आहे. नांदगाव रेल्वेस्थानकावर प्लॉटफार्मची लांबी, रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक कात टाकतेय असे वाटते.

प्रवाशांना तारेवरची कसरत

नांदगाव रेल्वेस्थानकावर साकोरा रोडवरील सहा बंगल्यासमोर या ठिकाणी रेल्वेचे टिकीट काढण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याने पूर्व भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे .सदर पादचारी पुल हा स्थानकावरील प्लाटफार्म क्रमांक-2 पादचारी पूल उतरविण्यात येत आहे.हा पुल रेल्वेच्या विश्रामगृह जवळ उतरता आला असता प्रवाशांना सोयीचे झाले असते.

नांदगाव शहरातून रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी जावे लागणार आहे.पूर्व भागातील कैलासनगर, आनंंद नगर, नवीनवस्ती न्यायडोंगरी, बोलठाणसह ग्रामीण भागातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेचे तिकीट घेण्यासाठी पुढील काळात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.नांदगाव रेल्वे स्थानकावरील नवीन पादचारी पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मात्र तो पुल होऊनही प्रवाशांची गैरसोय आहे, तशीच राहणार आहे.

नांदगाव रेल्वेस्थानकावर नवीन पादचारी पुलाचे काम सुरू आहे. हा पादचारी पुल थेट रेल्वेच्या विश्रामगृहजवळ उतरता आला असता तर योग्य होता. मात्र, मुले, महिला,वृद्धांना रेल्वेस्थानकावरुन रेल्वेचे टिकीट काढण्यासाठी जावे लागणार असल्याने मोठी समस्या निर्माण होणार आहे..

संदीप पांडे, प्रवासी

- Advertisment -

ताज्या बातम्या