Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपितळी भांडी हद्दपार

पितळी भांडी हद्दपार

सुरगाणा । वाजीद शेख | Surgana

‘जूंन ते सोन’ असे म्हणतात ते जपून ठेवले जाते मग त्यामध्ये जुने सोन्यांचे अंलकार (Gold ornaments) असो किंवा पितळी भांड्याच्या (Brass vessels) वस्तू पण सध्या हेच जुन पितळी सोन कवडीमोल भावाने विकले जात असुन एकेकाळी स्वयंपाक गृहाचा (kitchen) कणा असलेले तांब्या आणि पितळेची भांडी (Brass vessels) आज स्वयंपाक गृहातुनच नव्हे तर अगदी घरातून हद्दपार होत आहेत.

- Advertisement -

पितळाची जागा आता स्टीलने घेतली आहे टिकाऊ पेशा दिखाऊ पणाला महत्त्व आल्याने जुनी पितळी भांडी नामशेष होण्याच्या मार्गावर आली याच बरोबर पितळेच्या भांड्याची हि ओळख देखील काळानुसार कालबाह्य होऊ लागली. पारंपारीक अशा वस्तू फार कमी लोकांकडुनच जपल्या जात आहेत काही वेळा त्यांना उजाळाही दिला जातो सध्या बदलत्या काळानुसार स्टीलची भाडी (Steel utensils) मोठ्या प्रमाणात वापरत असताना दिसुन येत आहे.

परंतु बदलत्या काळानुसार पितळी भांड्याची मागणी घटली अन् स्टीलची मागणी वाढली त्यामुळे येणार्‍या पिढीला पितळेच्या भांड्याची ओळख राहते का नाही हा प्रश्न या निमीत्ताने उपस्थीत होत आहे. काळाच्या ओघात हा जुना ठेवा असलेल्या पितळी ताट, तांबे, वाटी, चमचा, हंडा, कळशी, घागर, परात, बादली, आदी भांडी घरातुन अलिकडच्या काळात घरातुन कालबाह्य झाली आहेत.

जुन्या परंपरेनुसार वापरात असलेल्या या भांड्याचे दरही जास्त असल्याने त्याचा परीणाम मागणी व खरेदी व्यवहारावर कमी झाला आहे त्यामुळे आजच्या काळात या भांड्यांना खरेदी मागणीकडे लोकांनी या दुर्लक्ष केले आहे आजच्या काळात नव्या पिढीला जुन्या काळातील भांडी जास्त न ठेवता ती मोडीत काढली जात आहेत अशा मोडीत निघालेल्या पितळी भांड्यांना आजही बाजारपेठेत जास्त प्रमाणात मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या