Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedरामेश्वरच्या कुशीत फुलले बॉटनिकल उद्यान

रामेश्वरच्या कुशीत फुलले बॉटनिकल उद्यान

नाशिक | सोमनाथ ताकवाले | Nashik

देवळा तालुक्याचा (deola taluka) पूर्वीचा उल्लेख रामेश्वर देवळा (Rameshwar Deola) असा केला जात होता. पण देवळा गावठाण रामेश्वरपासून थोडे दूर अंतरावर वसल्याने रामेश्वर (Rameshwar) हे गाव वेगळे आणि देवळा (deola) हे तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले.

- Advertisement -

पण रामेश्वर गावाचा परिचर प्राचीन रामेश्वर मंदिर, नदीपात्रातील कुंड, त्यात असलेले प्राचीन गोमुख आणि किशोरसागर हे धरण (dam) हे या गावाची वैशिष्ट्ये सांगणारे नैसगिक घटक होय. येथूनच पुढे धोडप किल्ल्याकडेही (Dhodap fort) पर्यटक (Tourist) जातात, त्यामुळे मार्गावर रामेश्वर धरणावर (Rameshwar Dam) थांबले नाही तर नवलच. मात्र या सर्वांच्या वैभवात भर टाकणारे अजून एक खास काम रामेश्वरच्या कुशीत झाले आहे. ते म्हणजे येथे जाणीवपूर्वक उभारण्यात आलेले बॉटनिकल उद्यान (Botanical garden).

माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर (Former Minister Dr. Daulatrao Aher) यांच्या स्मरणार्थ या उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (MLA Dr. Rahul Aher) यांनी या प्रकल्पात महत्त्वाचे योगदान दिल्याने रामेश्वर ग्रामपंचायतीच्या जागेवर उद्यान फुलले असून येथे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संत तुकारामांच्या (Sant Tukaram) वनवैभव सांगणार्‍या अभंगाची महती पटते. एवढा हा परिसर हिरव्या वनराजीने भरून गेला आहे.

समोर किशोर सागर हे धरण, त्याचबरोबर डोंगर-टेकड्यांचा लागून असलेला परिसर आणि उद्यान रस्त्याला लागूनच असल्याने येथे थांबून तेथे फेरफटका मारणार्‍यांची संख्या वाढत आहे. उद्यानात अनेक प्रकारच्या वनौषधींची लागवड (Cultivation of herbs) केलेली आहे. त्याचबरोबर लिंब, चिंच अशा डेरेदार वृक्षांसह शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. सुमारे 15 ते 20 एकर परिसरात उद्यानाचा पसारा आहे. त्याचबरोबर लगतच अजून पाच ते सात एकरात बांबूच्या विविध प्रजातींच्या रोपांची लागवड ग्रामपंचायतीने प्रस्तावित केलेली आहे.

बॉटनिकल गार्डनमध्ये ((Botanical garden) पोलीस (police), सैन्यात भरती (Recruitment) होण्याची तयारी करणार्‍या युवकांची गर्दी असते. कारण येथील सुमारे दीड किलोमीटर लांबीचा टॅ्रक चढ-उतार आणि अडथळांंची शर्यत असणार्‍या पद्धतीचा असल्याने भरतीपूर्व तयारीसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे रामेश्वर परिसरातील गावांसह देवळा शहरातील युवकांचा येथे राबता असतो.

त्याचबरोबर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा सुविधा असल्याने त्यांचीही सकाळ-सायंकाळ गर्दी होते. पाणीटंचाईवर मात करत येथे लावलेल्या वृक्षांना ठिबकद्वारे पाणी देऊन संगोपन केले गेले आहे. त्यामुळे परिसर हिरवाईने नटलेला आहे. समोरच डोंगररांगांचे मनोहारी दृश्य असल्याने उद्यानात बसून निसर्गाचे सुंदर चित्र डोळ्यात साठवून घेणारेही येथे रमतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या