Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमनपा निवडणुकीत भाजप-सेना युती?

मनपा निवडणुकीत भाजप-सेना युती?

नाशिक । फारूक पठाण | Nashik

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) वेळी लाव रे तो व्हिडिओ’ (video) या पद्धतीने प्रचार करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तसेच गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती तर निवडणुका (election) संपल्यानंतर मतदान यंत्रणेत (Voting systems) शंका उपस्थित थेट निवडणूक आयोगाकडे (Election Commission) देखील धाव घेतली होती.

- Advertisement -

तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) यांची भेटही घेतली होती. यानंतर मात्र मनसेना (MNS) पक्षाचे धोरण बदलून पक्षाचा झेंडा देखील बदलला. तर ठाकरे हे लवकरच आयोध्याला देखील जाणार आहे. या संपूर्ण घटनाक्रमावरून असे लक्षात येते की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये (Municipal elections) भारतीय जनता पक्षाबरोबर (Bharatiya Janata Party) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे. त्या हिशोबाने नियोजन देखील सुरू असल्याचे दिसत आहे.

नाशिकमध्ये (nashik) 18 जुलै 2021 रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) व मनसेना प्रमुख राज ठाकरे यांची शासकीय विश्रामगृहावर भेट झाली होती. यानंतर पासून आगामी महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षाची युती होणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती, मध्यंतरी मुंबईत (mumbai) राज ठाकरे यांनी नवीन घरात प्रवेश केला. पूर्वीच्या कृष्णकुंज’ च्या शेजारी हा नवीन शिवतीर्थ’ बंगला (Shivteerth’s bungalow) तयार करण्यात आला आहे. या बंगल्यात विविध राजकीय पक्षांचे (Political parties) नेते सतत हजेरी लावत आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते देखील दिसत आहे.

आगामी नाशिक महापालिकेसह राज्यातील सुमारे बावीस महापालिकांच्या निवडणुका नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे तर शिवसेना (shiv sena) व भारतीय जनता पक्षाची जुनी युती सध्या नाही. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी युतीत निवडणूक (election) लढवली, मात्र नंतर मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) व काँग्रेस (Congress) यांनी घरोबा करून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली व महाराष्ट्राची (maharashtra) सत्ता काबीज केली.

यामुळे अत्यंत जुनी असलेली युती तुटली. सध्या भारतीय जनता पक्षाला एका साथीची गरज असल्यामुळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जवळची वाटत असल्यामुळे हे दोन्ही पक्ष नजीकच्या काळात जवळ घेऊन सोबत निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर मागील एका वर्षात राज ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांच्या बैठका, भेटीगाठी देखील झाले आहे. नाशिक मध्ये 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळाली होती तर त्यापूर्वी 2012 साली झालेल्या निवडणुकीत चाळीस नगरसेवकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर (Mayor) पाच वर्षे महापालिकेत होता.

या काळात झालेल्या विकास कामांच्या जोरावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2022 च्या निवडणुकीची तयारी करीत आहे. यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे तसेच युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी सतत नाशिक दौरे करीत आहे. 40 वरून 2017 साली थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पीछेहाट होऊन पाच नगरसेवक निवडून आले आहे. यामुळे त्यांनाही आपली संख्या वाढविण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे,तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाबरोबर आता शिवसेना नाही. त्यामुळे आता दोन्ही पक्ष बरोबर येऊन नाशिकसह राज्यातील इतर महापालिका निवडणूक लढणार आहे, असे चित्र दिसत आहे.

अडचणीचा मुद्दा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष प्रादेशिक आहे तर भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी परप्रांतीयांनी विरुद्ध केलेले आंदोलनामुळे हिंदी भाषिक भागात राज ठाकरे यांची प्रतिमा तसे चांगली नाही. यामुळे त्यांनी याबाबत धोरण स्पष्ट केल्यास भारतीय जनता पक्षाबरोबर युती शक्य असल्याचे संकेत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक वेळा दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या