भिवतासः निसर्गाचे वरदान

भिवतासः निसर्गाचे वरदान

ठाणगाव । नामदेव पाडवी | Thangaon

सुरगाणा (surgana) हा तालुका सह्याद्रीच्या (Sahyadri) कुशीत वसलेला आहे. या तालुक्याला निसर्गाची कृपा लाभलेली आहे. उंबरठाण (umberthan) सारखा परिसर मिनी हिमाचल (Mini Himachal) नावाने ओळखला जातो.

तर केम पर्वत बघण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असते. या नैसर्गिक वरदानापैकीच एक वरदान म्हणजे ‘भिवतास धबधबा’ (bhivtas waterfall) सुरगाणा तालुक्याच्या (surgana taluka) सीमेवर असणार्‍या कळवण या गावाजवळ हा आकर्षक धबधबा तुम्हाला बघायला मिळेल. भिवतास धबधबा बघण्यासाठी नाशिकहुन ननाशी (nanashi) मार्गे बार्‍हे ते केळवण असा प्रवास करावा लागेल.

किंवा सुरगाणा मार्गे सुध्दा येता येईल. या परिसरात पूर्णतः आदिवासी लोक (tribal community) राहतात. जैवविविधतेने नटलेला हा भाग वनसंपत्तीने भरलेला आहे. हिरवेगार घनदाट जंगल (Dense forest), डोंगर रांगा (Mountain ranges), आदिवासी जीवनशैली अनुभवायला मिळते. भिवतास धबधबा हा 500 मीटर वरून खाली कोसळतो. चार पायर्‍यामध्ये कोसळणारा हा धबधबा खुपचं मनमोहक वाटतो.

या ठिकाणी सनसेट पॉईंट (Sunset Point) सुद्धा आहेत. येथून दूरवर पसरलेले जंगल व सूर्यास्त बघण्यात मजाच वेगळी असते.जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते.गुजरातसह जिल्ह्याबाहेरून मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourist) येत असतात. भिवतास जवळील परिसरात विविध औषधी वनस्पती आढळतात.

या वनऔषधींचा वापर केल्यास गुणकारी परिणाम मिळतो.परिसरात खैर व सागवणाचे जंगल बघण्यासारखे आहे. परंतू जंगलतोडीमुळे काही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या भागात चांगल्या प्रकारे जैवविविधता आढळते. तरस, कोल्हे ,मोर, ससे यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच सरपटणारे प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.अनेक प्रकारचे पक्षी दिसतात.

या भागात पुर्वी बिबट्या खूप होते. परंतु जंगल तोडीमुळे जंगल हळूहळू कमी होत चालले आहे.जंगलतोड वाढली आहे. शेजारी गुजरात राज्यात वनकायद्यांची कडक अंमलबजावणी होत आहे. तशीच अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली पाहिजे अशी हळहळ पर्यटक करत आहेत. भिवतास धबधब्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा अशी आशा येथील आदिवासी जनता बाळगुन आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com