भविष्यवेध : पाण्याचा या ग्रहाशी आहे संबंध

jalgaon-digital
2 Min Read

जीवनाच्या निर्माणासाठी पाच तत्त्वांची गरज असते. त्यापैकी एक महत्त्वाचं जल तत्त्व आहे. जल मूर्त वस्तूंमध्ये सर्वाधिक मौल्यवान आणि चमत्कारी आहे. जल जीवन आहे ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे; परंतु त्यासोबतच व्यक्तीचं जीवन, त्याची भावना, क्षमता आणि आध्यात्मिकता देखील पाण्यामुळे निर्धारित होते.

पाण्याचा वापर करताना कोणते नियम आणि सावधगिरी बाळगायला हवी हे जाणून घ्या पाण्याचा अधिकाधिक वापर आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करेल.दिवसा अधिक प्रमाणात तर रात्री कमी प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.उभे राहून एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये.सामान्य तापमानाचे पाणी औषधी प्रमाणे कार्य करतं. पाण्याची रक्षा आणि संरक्षण केल्याने चंद्र आणि मन दोन्ही मजबूत होतात.पाणी वाया घालवल्याने आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं.ज्या लोकांच्या घरात पाणी वाया जात असतं त्यांना मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागतं.पाणी आणि ज्योतिष यांच्यात काय संबंध आहे ते जल मुख्य रूपाने चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे.

काही प्रमाणात याचा संबंध मंगळ ग्रहाशी देखील आहे. पाण्याचा योग्य वापर चंद्र आणि शुक्र मजबूत करतं.
चंद्र मजबूत करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी कशा प्रकारे पाणी वापरावं हे नियम आम्ही आपल्याला सांगत आहोत -घरात फुलांचे झाडं लावावे.नियमित त्यांना पाणी घालावे.पावसाळ्यात पाणी भरलेली एक काचेची बाटली आपल्या शयनकक्षात ठेवावी.चांदीच्या ग्लासात पाणी पिण्याने चंद्र मजबूत होतं.चंद्र मजबूत करण्यासाठी अंघोळ करताना सर्वात आधी नाभीत पाणी घालून मग अंघोळ करावी.शुक्र मजबूत करण्यासाठी पाण्याचा वापर या प्रकारे करा शक्यतो दोन्ही वेळेस अंघोळ करावी.नियमित रूपाने सुवासिक पाण्याने अंघोळ करावी.काचेच्या ग्लासने पाणी प्यावे.शुक्र खराब असल्या कोणाला पाण्याचे भांडं भेट म्हणून देऊ नये.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *