हळदीच्या दूधाचे फायदे

हळदीच्या दूधाचे फायदे

दूधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे दूध पिण्याचा सल्ला नेहमी दिला जातो तर सर्दी-खोकला झाल्यास अथवा डोके दुखल्यास हळदीचे दूध आवर्जून पिले जाते. तुम्हाला थकवा जाणवत, असेल अथवा अशक्तपणा आला असेल तर, अशा वेळी हळदीचे दूध पिल्याने चांगला फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊयात हळदीच्या दूधाचे फायदे...

शारिरीक दुखणं : शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने फायदा होतो.

सुंदर त्वचा : दूध प्यायल्याने त्वचेत एक चमक निर्माण होते. दुधासोबत हळदी सेवन केल्याने त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. खाज, इंफेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते.

सर्दी : सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.

मजबूत हाडे : दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.

झोप न येणे : झोप न येणे ही अनेकांची समस्या असते. पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.

पचन : हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.

श्‍वास घेण्यास त्रास : श्‍वास घेण्याबाबात ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होती. फेफडा, कफ यावर तत्काळ आराम पडतो.

वजन कमी करणे : हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.

याशिवाय

जखम : जर तुम्हाला एखाद्या कारणामुळे जखम झाली तर त्याठिकाणी हळद हे अँटीबॅक्टेरिअल म्हणून काम करतं. हळद बॅक्टेरिया मारण्यासाठी मदत करतं

ब्लड शुगर : आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना कृष्णा किर्वे यांनी ही माहिती दिली आहे.

क्वोरा (Quora) वर विनोद दातार यांनी दिलेली माहिती

हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे.

हळद चुर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदयविकार, मधुमेह,कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो. पचनक्रिया सुधारते.

दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते.

जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com