छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

मोरवाडी (Morwadi) येथील 17 एकर जागेत असलेल्या व न्यारयालयीन वादात अडकलेल्या पेलीकन पार्कचा (Pelican Park) तिढा तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुटून या ठिकाणी सिंगापूरच्या (Singapore) धर्तीवर सेंट्रल पार्कची (Central Park) उभारणी करण्यात आली असून पहिल्या टप्प्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे.

त्याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (Chhatrapati Shivaji Maharaj Udyan) करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही काळात उद्यानाच्या नामफलकाचे उदघाटन झाले मात्र उद्यानाचे उद्घाटन न झाल्याने नवीन नाशकात (navin nashik) नाराजीचा सूर आहे.

नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) खासगीकरणातून पुणा अम्युझमेंटली (Amusementally) या कंपनीला पेलीकन पार्क चालवायला दिले होते. त्या कंपनीने एमएसएफसी वित्तीय संस्थेकडून (MSFC Financial Institution) कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांनी ताबा घेतला होता. हा वाद न्यायायलयात गेल्याने तब्बल 12 वर्ष रेंगाळत राहिला. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी वेळोवेळी संघर्ष व पाठपुरावा करीत हा प्रश्न सोडवला. 12 जानेवारी 2015 ला हा दावा संपुष्टात आला. 31 जानेवारी 2018 ला मनपावर प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला महासभेने मंजुरी देत या ठिकाणी सेंट्रल पार्कचा (Central Park) मार्ग मोकळा झाला.

सिंगापूरच्या (Singapore) धर्तीवर देशातील सुंदर व आकर्षक पार्क पैकी हा एक होणार असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. नवीन नाशिककरांनाच नव्हे तर समस्त नाशिककरांना ह्या उद्यानाचा आनंद घेता येणार, अशा सुविधा येथे देण्यात आल्या आहेत. गेली दोन वर्षे लॉकडाऊनमुळे येथील काम संथ गतीने सुरु होते मात्र आता सर्व काही सुरळीत झाल्याने येथील काम पूर्णत्वास आणून नाशिक करांना या उद्यानाचा उपभोग घेऊ द्या, अशी मागणी नाशिककरांत जोर धरू लागली आहे.

सेंट्रल पार्कमध्ये

ट्रेन ट्रॅक, मिनी ट्रेन, मनोरंजक खेळणी, राईड्स, अँम्पी थिएटर, आकर्षक फवारे, ट्री पॉड

नामकरण व राजकारण

या उद्यानाला पेलीकन पार्क नाव देण्यात आले. त्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी पाठपुरावा करीत नमो उद्यान साकारणार असल्याचे सांगितले. मनपाने विकासासाठी निधी दिल्यावर त्याचे सेंट्रल पार्क नाव ठेवण्यात आले. सामजिक कार्यकर्ते विशाल डोखे यांनी ऐन शिवजयंतीच्या दिवशी येथे फलक लावून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नामकरण केले. यावेळी झालेला वाद छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या आजोळच्या घराण्यातील सुरगाणा संस्थानाच्या स्नुषा सोनलीराजे पवार यांनी मध्यस्थी करीत मिटवला. व त्यानंतर नगरसेवकांच्या माध्यमातून येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या नावावर शिक्कामोर्तब झाला.

अपेक्षित खर्च

1) एकूण 34 कोटी 12 लाख खर्च अपेक्षित

2) पहिल्या टप्प्यात 15 कोटी खर्च

पहिला टप्पा -

सुरुवात ऑक्टोबर 2019

समाप्ती मार्च 2022

3) खर्चाची तरतूद - राज्य सरकार मूलभूत सोई सुविधा अंतर्गत.

पर्यटन विकास कार्यक्रम.

नाशिक महानगरपालिका.

Related Stories

No stories found.