Friday, April 26, 2024
HomeUncategorizedबारव संवर्धनाच्या प्रतीक्षेत

बारव संवर्धनाच्या प्रतीक्षेत

जातेगाव । बाबासाहेब काळे | Jategaon

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ महाराष्ट्रगीतात (maharashtra songs) गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला ‘दगडांचा देश’ असे संबोधले आहे. कारण प्राचीन लेणी (Ancient Caves), मंदिरे (temples), गड (forts), दुर्ग, वास्तूंसह विहीर (Well), बारव, तलाव (Lake) आदी ऐतिहासिक संपन्नता येथे दिसून येते. हे सर्व केवळ ‘दगड’ (stone) नसून आपला वैभवशाली वारसा आहे. संशोधक (Researcher), शिक्षक (teadher), विद्यार्थी (students), इतिहासप्रेमी आदींसाठी पूरातन वास्तू म्हणजे ऐतिहासिक वारसा होय.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) नांदगाव तालुक्यात (nandgaon taluka) घाटमाथ्यावरील जातेगांवला (jategaon) सामाजिक (social), धार्मिक(Religious), देशसेवेची पार्श्वभूमी आहे. या गावास ऐतिहासिक ओळखही असून प्राचीन मूर्ती, वेस, वाडे, विहीरी, वीरगळ आदी मात्र दुर्लक्षितच झाले आहेत. येथे काही पुरातन बारव आहेत. पिनाकेश्वर महादेव रस्त्याजवळ आकर्षित करणारी एक मुख्य पुरातन विहीर असून ती होळकरकालिन बारव म्हणून ओळखली जाते. मात्र ही विहीर खूप वर्षांपासून दुर्लक्षित झाली आहे. भविष्यात तिचे अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते.

एकेकाळी नागरीक पिण्याचे पाणी (drinking water) याच बारवेतून वापरत असत. ही बारव सुमारे तीनशे वर्षे पुरातन व आयताकृती बांधणीची असून पाण्याचा साठा असलेला मुख्य भाग चौकोनी आहे .थेट विहीरीत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. त्यात उतरुन थेट पाणी पिता येईल, अशी आकर्षक मजबूत बांधणीची विशाल-पुरातन बारव दक्षिणोत्तर आहे. सद्यस्थितीत अस्वच्छता व दुर्गंधीमुळे तिचे वैभव धोक्यात आले आहे.

बारव परिसरातील कचरा (Garbage), प्लॅस्टिक (plastic), अशुद्ध पाण्याचा साठा आदींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. एकेकाळी गावकर्‍यांची तहान भागविणारी ही विहीर आज मात्र कचरा डेपो बनली आहे. ही विहीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) यांनी बांधली असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. स्थानिकांच्या मताचा विचार केल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या विहिरीच्या उभारणीसाठी केलेल्या मदतीचा निश्चित पुरावा प्राप्त नसला तरी त्यांनी भारतभूमीत निर्माण केलेल्या असंख्य मंदिरे, घाट, पाणवठे, बारव, विहिरी आदी उभारणीचाच एक भाग म्हणून या विहिरीकडे पाहणे योग्य ठरेल.

ही बारव जातेगावचे ऐतिहासिक वैभव असून आकर्षक चिरेबंदी दगडाची विहिर जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना आहे. परिसरातील दोन ते तीन बारव जमिनदोस्त झालेल्या आहेत, अशीही माहिती मिळते. या विहीरीची ग्रामप्रशासन तसेच सामाजिक संस्थांनी दखल घेत स्वच्छता मोहीम हाती घेऊन विहीरीतील दूषित पाणी, कचरा, प्लॅस्टिक, गाळ व परिसरातील उकिरडे काढून विहीर परिसरास कुंपण व सुशोभिकरण केल्यास परिसर उजळून निघेल. सदर पुरातन विहीरीचे पुनरुज्जीवन करणे ही काळाची गरज आहे.

राज्यस्तरावर महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत रोहन काळे यांनी महाराष्ट्रातील स्टेपवेल्सचे वेबसाईटच्या माध्यमातून 1500 हून अधिक बारवांची ठिकाणे नकाशाच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहेत, हे विशेष. महाराष्ट्रात पुरातन दुर्लक्षित असलेल्या वास्तू पूनर्जीवित करुन त्यांचे संवर्धन करणारे असे समूह देखिल कौतुकास पात्र आहेत.

राज्यात असंख्य अज्ञात व अपरिचित वास्तू आजही संरक्षणाची प्रतिक्षा करीत आहेत. त्यासाठी शासनाने धोरण निश्चित करुन संवर्धन मोहीम हाती घेतल्यास अनेक अज्ञात इतिहासिक बाबी उजेडात येतील. ऐतिहासिक प्राचीन वारसा जोपासणे तसेच पुरातन ऐतिहासिक वस्तू व वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे घटनात्मक कर्तव्य आहे. या कर्तव्यांना जाणून स्थानिक प्रशासनानेही प्रयत्न केल्यास हा वैभवशाली वारसा जोपासल्याचे सार्थक होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या