Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकृत्रिम पाणवठे वन्यजीवांना दिलासा

कृत्रिम पाणवठे वन्यजीवांना दिलासा

मालेगाव । वाल्मिक पगारे | Malegaon

उन्हाची तीव्रता (summer heat) दिवसेंदिवस वाढत असल्याने वन्यजीवांनाही (Wildlife) पाणीटंचाईच्या (Water scarcity) झळा जाणवू लागल्या आहेत. सद्यस्थितीत वनक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत (Natural resources) काही प्रमाणात जिवंत असले तरी काही भागात मात्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वनविभागातर्फे (Forest Department) विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

- Advertisement -

मालेगाव उपविभागीय वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (Malegaon Sub-Divisional Forest Range Office) कक्षेत मालेगाव, सटाणा (satana) व ताहाराबाद (taharabad) परिसरातील वनक्षेत्राचा समावेश आहे. त्यात मालेगाव 33 हजार 724, सटाणा 21 हजार 154.158 तर ताहाराबाद 26 हजार 539.203 हेक्टर वनक्षेत्र असून बिबटे 30, मोर 188, ससे 58, वानर 30, माकड 30, चिंकारा 35, कोल्हे 20, लांडगे 20 अशी वन्यप्राण्यांची संख्या आहे.

मार्च महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून तापमान वाढू लागल्याने मालेगावसह सटाणा, ताहाराबाद वनपरिक्षेत्रात अन्न-पाण्यासाठी वन्यजीव मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यांचा अधिवास वनक्षेत्रात सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मालेगाव वनक्षेत्रात 20 कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले असून वनविभाग व वन समित्यांच्या सहभागातून तात्पुरत्या पाण्याच्या कुंड्या तयार करण्यात आल्या आहेत.

वनक्षेत्रात काही प्रमाणात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत (Natural water source) उपलब्ध असून काही ठिकाणी मात्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. झाडी वनक्षेत्रात नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे तेथे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून त्यात टँकरने पाणी भरून वन्यजीवांची तहान भागवली जात आहे. निंबायती वनक्षेत्रात दोन सिमेंट बंधारे बांधण्यात आले असून इतर ठिकाणी माती बंधारे बांधण्यात आले आहेत. या माध्यमातून वन्यजीवांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे. याशिवाय आवश्यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पाण्याच्या कुंड्या ठेवून वनजीवांची तहान भागवली जाणार आहे.

मालेगाव तालुक्यातील झाडी वनक्षेत्रातील पाणवठे सध्या टँकरने (water tanker) भरले जात आहेत. वन समितीच्या सहकार्याने जंगल परिसरात ठिकठिकाणी तात्पुरत्या पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. निंबायती येथे दोन सिमेंट बंधारे बांधले आहेत. तसेच 20 कृत्रिम पाणवठेदेखील तयार करून वनक्षेत्रात वन्यजीवांची तहान भागवली जात आहे, अशी माहिती मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या