कोरोना व्हायरस- प्रकृतीचा शाप की आपलीच उपज
फिचर्स

कोरोना व्हायरस- प्रकृतीचा शाप की आपलीच उपज

Balvant Gaikwad

रतनलाल सी. बाफणा

सध्या जगात एक अघोषित युद्ध सुरु आहे. हे युद्ध दोन देशांमध्ये होणारे सैन्य युद्ध नसून संपूर्ण मानव सभ्यतेच्या अस्तित्वाला आव्हान देणारे युद्ध आहे. जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना नावाच्या या शत्रूने आतापर्यंत हजारो बळी घेतला असून 39 हजारपेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली असल्याची आकडेवारी समोर येत आहे.

या विषाणुला रोखण्याकरिता अद्याप कोणतेही औषध सापडले नसल्याने रुग्णांना वाचवण्यात अपयश येत आहे, त्यामुळे या विषाणुच्या संपर्कात आणखी कोणी येऊ नये, हा विषाणू अधिक पसरू नये यासाठी चिनी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

चीन, जपान, फिलिपाईन्स, भारतातसह एकूण 30 देशांमध्ये या विषाणुचे रुग्ण आढळल्याने प्रत्येक देशात खबरदारीचा उपाय घेतला जात आहे. मात्र हा विषाणू वेगाने पसरत असल्याने यावर नियंत्रण ठेवणे सध्या कठीण बनले आहे, शिवाय या रोगावर उपचारही सापडत नसल्याने चिनी प्रशासनासोबत जगभरातील वैद्य हैराण झाले आहेत. शिवाय ज्या डॉक्टराने या रोगाविषयी माहिती सांगितली त्यांचाही याच रोगामुळे मृत्यू झाल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.

काय आहे कोरोना वायरस ?

कोरोना हा विषाणूंचा एक मोठा समूह आहे जो प्राण्यांमध्ये आढळून येतो. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (सीडीएस)च्या मते, कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. नवीन चिनी कोरोनो व्हायरस सारस विषाणूसारखा आहे. या संसर्गामुळे ताप, सर्दी, श्वास लागणे, नाक वाहणे, घसा खोकला यासारख्या समस्या उद्भवतात. कोरोना व्हायरसचा धोका जगभर पसरत आहे. दरम्यान, दक्षिण चीनमधील संशोधकाने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.दक्षिण चीन कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी धोकादायक कोरोना व्हायरस पसरण्यामागील एक नवीन अहवाल तयार केला आहे.

कोरोना व्हायरस हा कोणता प्राण्यामुळे सर्वाधिक वेगाने पसरत आहे याचा शोध या संशोधकांनी लावला आहे. सुमारे 1000 नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते या निष्कर्षावर पोहोचले आहेत. संशोधकांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की. खवले मांजर (पॅन्गोलिन) नावाचा प्राणी हा विषाणूचा प्रमुख वाहक आहे. याच्यामुळेच कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. आण्विक जैविक शोध तंत्रज्ञानाच्या मदतीने, संशोधकांना असे आढळले आहे की 70% कोरोना व्हायरस हे खवल्या मांजरीत आढळले आहेत.

दरम्यान त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, खवले मांजर हा काही कोरोना व्हायरसचा एकमेव वाहक असू शकत नाहीत. परंतु ते कोरोना व्हायरसच्या पसरविण्यातील तो एक प्रमुख घटक असू शकतो.त्यांनी याबाबत असंही म्हंटलं की, लवकरच आपला संशोधन अहवाल देखील ते प्रसिद्ध करणार आहेत. याचवेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लोकांना सल्ला दिला की, वन्य प्राण्यांपासून दूर राहिलं पाहिजे.याचाच अर्थ असा की मांसाहारापासून कोरोना या भयंकर आजाराची लागण होत आहे.

प्राण्यांपासून माणसांमध्ये प्रवेश करणारा विषाणू प्रवर्गाशी संबंधित व्हायरस आहे.जागतिक आरोग्य संघटनेनुसार या व्हायरसचा संबंध सी-फूड व मांसाहाराशी येतो.मनुष्याने आता तरी जागे व्हायला हवे. रोगमुक्त,निर्मळ,निरोगी जीवनाचा एकमेव पर्याय म्हणजे शाकाहार आहे. शाकाहार स्वीकारून आपले आरोग्य जपण्याचा व सात्विक जीवन जगण्याचा संकल्प आपण करायला हवा.

Deshdoot
www.deshdoot.com