‘एपिक’ महाकाव्याची अनुभूती
फिचर्स

‘एपिक’ महाकाव्याची अनुभूती

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

काही कलावंतांना जन्मजात कलेची देणगी लाभलेली असते. पण ‘एपिक’ प्रदर्शन पाहताना जाणवले की, ‘एपिक’ या नावातच खूप वेगळेपण आहे. प्रदर्शनाच्या नावातच वैविध्य आहे आणि वेगवेगळ्या 58 कलावंतांनी म्हणण्यापेक्षा कलेविषयी आदर असलेल्यांची साकारलेली ही कलाकृती आहे. एपिक म्हणजे महाकाव्य. रामायण -महाभारत ही जगद्विख्यात महाकाव्ये म्हणजे एपिक आहेत.

प्रज्ञा अतुल नांदेडकर, जळगाव

दयाला भिडणारी सुंदर, सजीव निर्जीव दृश्येअंतरात जाऊन भिडतात. कारण सजीव सृष्टी म्हणजे साक्षात निसर्गाची करामतच असते. जगाच्या पाठीवर खूप सुंदर फुले असतील; पण ती माळरानावर, उंच डोंगरावर, कडेकपारीत कुठे फुललेली असतील. आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकणारी, औषधी फुले, झाडे आपल्या गावीही नसतील; कारण आपल्यापैकी कोणीही तिथपर्यंत पोहोचलेले नसतील. पण असलीच काही दृश्ये, चित्रे, देखावे, आपल्या मनाला आनंद देतातच, पण वातावरणच आनंदी आणि प्रफुल्लित करून टाकतात. मनाबरोबरच शरीरात नवचैतन्य निर्माण करणारी उत्साहाची वलये निर्माण करणारी ही छायाचित्रे संग्रही असावी असे वाटते. खरंतर आजच्या स्मार्ट फोनच्या युगात अशा प्रकारची आवड जोपासणे काहीही कठीण नाही. कारण मोबाइलजवळ नाही, अशी व्यक्ती पाहणे तसे दुर्मिळच झालेय.

काही कॅमेरे तर 48 पेक्षाही जास्त मेगा पिक्सेलची आहेत. प्रवासात, बगिचात, शेतात आपण जाऊ तिथे पाठीराखा असणारा अगदी ऑफिसातसुद्धा आणि मन मोहून टाकणारी दृश्ये निसटून जाण्याआधी हा क्षण कॅमेर्‍यात बंदिस्त करण्याचा मोह आवारता येत नाही. अपूर्णतेचा गोडवा देणारी निसटताना ओंजळ भरून टाकण्याचं काम हे कॅमेर्‍यातील क्षण करतात. मोबाइलला बघताना पुन्हा जुन्या विश्वातही रममाण करण्याचं काम हे दृश्य करतात. सृजनशील व्यक्तिमत्त्वाची अनेक व्यक्तिमत्त्व आपण पाहत असतो. नवनिर्मिती, सृजनशीलता असेल तर वेगळ्या वाटेवरचे उपक्रम साकारले जातात. पण मोबाइल छायाचित्रांची प्रदर्शने असू शकतात आणि ती आपल्याला मोहून टाकू शकतात; हा अनुभव आणि कलावंत नसलेल्या रसिकांनी मोबाइलने काढलेल्या चित्रांचे आणि तेही अगदी साधे, सरळ विषय पण ते क्लिक करताना असलेली सौंदर्यदृष्टी यामुळे वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचतात. मोबाइल फोनवर आपण बर्‍याचदा टीका करतो; पण मोबाइलचा दृश्यकलेच्या माध्यमातून असाही उपयोग होऊ शकतो आणि प्रदर्शन पाहताना 58 छायाचित्रांमधून पाच चित्रे निवडणे ते ही प्रेक्षकांनी हा खूप वेगळा अनुभव होता. कारण चित्रे निवडत असताना एक उत्साह मनात होता. आपल्याला मत व्यक्त करून योग्य चित्रे निवडायची आहेत. जी बेस्ट असणार आहेत; त्यामुळे खूप चांगला अनुभव घेता आला.

जळगावात नुकतेच ‘एपिक’ प्रदर्शन पाहण्याचा योग आला. ‘जैन उद्योग समूहातर्फे’ कलेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. जेव्हा आपण कलावंतांची कलाकृती पाहतो चित्रकाराची चित्रे पाहतो. असीम, अद्भुत शिल्पकला पाहतो, तेव्हा त्या तेजाने आपण स्तब्ध होतो. कला ही प्रेरणा होते. कलेशिवाय जीवनाला अर्थ नाही. कलावंत जेव्हा त्याच्या चित्रांची, कलेची प्रदर्शने भरवतो. तेव्हा त्या कलेपुढे आपण नतमस्तक होतो. पण आपल्याही मनात क्षणभर येते की, अशी एखादी कला आपल्यालाही अवगत असावी. आपल्याही चित्रांचे प्रदर्शन भरवावे; पण कलेसाठी साधना आवश्यक असते. काही कलावंत कलेसाठी आपले जीवन वाहून घेतात. काही कलावंतांना जन्मजात कलेची देणगी लाभलेली असते. पण ‘एपिक’ प्रदर्शन पाहताना जाणवले की, ‘एपिक’ या नावातच खूप वेगळेपण आहे. प्रदर्शनाच्या नावातच वैविध्य आहे आणि वेगवेगळ्या 58 कलावंतांनी म्हणण्यापेक्षा कलेविषयी आदर असलेल्यांची साकारलेली ही कलाकृती आहे.

एपिक म्हणजे महाकाव्य. रामायण -महाभारत ही जगद्विख्यात महाकाव्ये म्हणजे एपिक आहेत. जी व्यासमुनी, वाल्मीकी ऋषी यांसारख्या महान प्रतिभावंतांच्या लेखणीतून साकारली आहेत. ‘एपिक’मधून मात्र जाणवले की, आपल्यासारख्या सामान्यातही केवढी असामान्य प्रतिभा असते, जी आजच्या लेखणीतून क्षणोक्षणी महाकाव्य निर्माण करीत असते. ही लेखणी म्हणजे सदोदित आपल्या खिशात, हातात विराजमान असणारा मोबाइल फोन, जो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

सोबत काही नसेल तरीही मोबाइल फोनने आपला एक हात आणि अवघे जीवनच व्यापून टाकलेय. ‘एपिक’ (म्हणजे खर तर ‘एपिक’) म्हणजे ते वापरून तुम्ही आम्ही सर्वजण कळत-नकळत निर्माण करीत असलेली महाकाव्ये होय. महाकाव्ये आणि ही वाक्ये तेव्हा खरी वाटली, जेव्हा आपल्या सततसोबत असणार्‍या फोनमधून निर्माण झालेली साध्या सोप्या विषयावर आधारित पण खूप गहन अर्थ निर्माण करणारी 58 वेगवेगळी छायाचित्रे पाहून ही साधेपणातून साकारलेली पण सुंदर छायाचित्रे आपल्याला अंतर्मुख करून टाकतात. आयोजकांचा जीवनाकडे कलेकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असेल तर सामान्य व्यक्तीसुद्धा कलावंत असण्याची काही क्षण का असेना अनुभूती घेऊ शकतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com