जैन संप्रदायचे अचलगच्छाधिपती आचार्य भगवंतश्री परमपूज्य श्री. गुणोदयसागर सूरीश्वरजीश्री महाराज यांचे महाप्रयाण
फिचर्स

जैन संप्रदायचे अचलगच्छाधिपती आचार्य भगवंतश्री परमपूज्य श्री. गुणोदयसागर सूरीश्वरजीश्री महाराज यांचे महाप्रयाण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जैन धर्मातील सुधर्मा स्वामीच्या पाटपरंपरेतील 77 वी पाटावरील श्री. राष्ट्रसंत जिनशासन शिरोमणी,धर्मवात्सल्य, कच्छकेशरी, श्री अचलगच्छाधिपती आचार्य भगवंतश्री प. पू. गुणसागर सूरीश्वरजीश्री महाराजा साहेबांचे प्रमुख पट्टाधिकारी प्रशिष्य तसेच 5454 वर्षीतपाचे महान आराधक तपचक्रवर्ती, जिनशासन चिंतामणी, शासनप्रभावक श्री. अचलगच्छ संप्रदायाचे प्रमुखअधिपती आचार्य भगवंतश्री प. पू. गुणोदयसागर सूरीश्वरजीश्री महाराजा साहेब यांनी विक्रम संवत: 2077 ची श्रावण सुदसप्तमी दि. 26 जुलै 2020 रविवारच्या भल्या पहाटे 1.15 वाजता श्री नवकार महामंत्राचे स्मरणरटण करीत समाधिसहशातापूर्वक जीवनाची प्राणज्योत मावऴून महाप्रयाणाला आगेकूच केली.

त्यांच्या अश्या प्रकारे अचानक देहत्यागामुऴे संपूर्ण भारतातील जैनधर्मीय भाविकवर्ग अंतरशून्यमग्न झालेला आहे. त्यांच्या देवलोक प्रयाणाने श्री. अचलगच्छ जैन श्रीसंघात बरीच मोठी पोकऴी निर्माण झाली आहे. त्यांच्या अश्यातर्हेने अचानकपणे निघून गेल्याने देशातील... शहरशहरात, गावागावातील भाविकवर्ग हतोत्साहीत झाला आहे.

डोऴे पाण्याने भारावलेले असून विरहाची ओढ वाढतच चालली आहे. त्यामुऴे श्री. अचलगच्छ जैन श्रीसंघाची अतोनात हानी झाली आहे. प. पू. श्री. गुरूदेवाचे जन्म वि.स. 1988च्या भाद्रपदपौर्णिमेला गुजरात राज्यातील कच्छ जिल्हामधील कोटडा (रोहा) गावचे कोहीनूररूपी रत्न माता सुंदरबाईच्या कुशीभवनातून आणि पिता गणशीभाईच्या लाडावलेल्या हातात मुलाच आगमन ह्या भूतलावर झालं होतं. त्यांना श्री. खीमजीभाई, स्व. श्री. वीरजीभाई, स्व. श्री. शिवजीभाई, श्री. दामजीभाई, स्व. श्री. लखमशीभाई अशी पाच भावंड आणि कुंवरबाई म्हणून एक बहीण होती. जन्म नाव गोविंदजी असं होत तर व्यवहारीक अभ्यास इयत्ता 7 वी पर्यंतच होतं. परंतु ह्या गोविंदजीच मन काही करूनही संसारात रमेना! त्याला कायम ओढ मात्र संयम जीवनाची सतत असायची! शर्तेशेवटी ती पावन घटिका आली.

जेव्हा मुंबईतील लालवाडी येथे वि.स 2014 मार्गशिर्ष सुद 10 रोजी दीक्षाग्रहणचा मुहूर्त पावला आणि अचलगच्छाधिपती आचार्य भगवंतश्री प.पू. गुणसागर सूरीश्वरजीश्री महाराजा साहेबाच्या वरदहस्ते मुनिराज म्हणूनी पद ग्रहण केलेत.

तद्पश्चात् वडीदीक्षाचे (मोठी दीक्षा) मंगलकार्यक्रम सुद्धा मुंबईतील लालवाडी येथेच वि. स. 2014 पौष वदी 11 ला पार पडलेत.त्यांना गुरूबंधु म्हणून आ. कलाप्रभ सागर सूरीश्वरजी म. सा., गणिश्री कविन्द्रसागरजी म. सा., गणिश्री महोदयसागरजी म. सा., मुनिश्री महाभद्रसागरजी म. सा., मुनिश्री सर्वोदयसागरजी म. सा., मुनिश्री उदयरत्नसागरजी म. सा., मुनिश्री महारत्नसागरजी म. सा. लाभलेत. त्यानंतर वि. सं.: 2032 महा वद3 ला कच्छ मधील भूज शहरात उपाध्यायची पदवीने सम्मानीत झालेत.

लागलीच एका वर्षाच्या अंतराने वि. सं.: 2033 वैशाख सुदी 3 अक्षयतृतियेच्या शुभ मुर्हूतावर कच्छ मधील मकडा गावी आचार्यश्रीची महान उपाधिने अचलगच्छ जैन श्रीसंघचा हा संत ध्रुवतारा सारखा चमकू लागला.

त्यानंतर तब्बल 11 वर्षा नंतर अचलगच्छ जैन संघाचे सूकानीपद वि. सं.: 2044 अश्विन सुद 2 ला कच्छमधील 72 जिनालय तीर्थक्षेत्री मिऴालेत.

तद् सहा वर्षानंतर वि. सं: 2050 वैशाख सुद3 रोजी अखात्रीजच्या शुभ मुर्हूतावर कच्छतील 72जिनालय तीर्थक्षेत्रा मध्ये अचलगच्छाधिपती पद ग्रहण करून जिनशासनचे सर्वेसर्वा नायक म्हणून प्रकाशज्योतात आलेत आणि त्याच दिवशी त्यांचे 25वे वर्षीतपची साँगता म्हणून... अखात्रीजच्या निमित्ताने वर्षीतपपारणाची उजवणीपर्व साजरा झालेत...! त्यांचे प्रथम शिष्य... प. पू. गणिवर्यश्री वीरभद्रसागरजी म. सा. होते तर प्रथम प्रशिष्य प.पू. गणिवर्यश्री राजरत्नसागरजी म. सा. होते. त्यांच्या शिष्य आणि प्रशिष्यांच्या नामावलीत प. पू. गणिवर्यश्री वीरभद्रसागरजी म. सा., प.पू. मुनिराज प्रेमसागरजी म. सा., प.पू.मुनिराज हरिभद्रसागरजी म.सा.,प.पू.मुनिराज राजरत्नसागरजी म.सा., प.पू.मुनिराज प्रियंकरसागरजी म. सा., प.पू. मुनिराज शशाँकसागरजी म. सा. प्रामुख्याने होत. त्यांचे प्रथम चातुर्मास मुँबईतील पालागली येथे झाले होते. संपूर्ण सँयम जीवनकाऴात त्यांच्या वरदहस्ते 350 पेक्षा जास्त दीक्षार्थीना स्वहस्ते दीक्षीत करून त्यांचे जीवनउध्धार केलेत. संपूर्ण संयम काऴात विहारभूमि तसेच चातुर्मासचे क्षेत्र महाराष्ट्र, गुजरातकच्छ, राजस्थान राहीलेत. तपस्वीरत्न, अचलगच्छाधिपती आणि तपचक्रवर्ती सारख्या विशेषणाने नाव अलँकृत झालेले होते.

तर गुरूपारतँत्र्य, विनय, तप, सँयमशुद्धि, त्याग तितिक्षा, क्षमा, ज्ञान, वैराग्य, प्रभुभक्ति, शुद्धक्रिया, ब्रह्मचर्य, श्रमण घडतर सारखे विशिष्ट गुणांनी अलँकृत जीवन होते.

पँचप्रतिक्रमण, तीनप्रकरण, चारभाष्य, सहाकर्मग्रँथ, तत्वार्थ सूत्र, दशवैकालिक सूत्र, वैराग्य शतक, सँस्कृत दोन पुस्तिका, अनेक सूत्रे तथा महापुरूषाच्या जीवनचरित्राचे सँस्कृतप्राकृत मध्ये वांचन, व्याकरण, महापुरूषोकृत चोविशी, सज्झाय, चोढाणीया, छढाणीया, अढीत्रण हजार, श्लोक प्रमाण गाथाओ, ज्ञानभँडार, पुस्तक प्रमार्जनाद्वारा ज्ञानभक्ति आदि ज्ञानोपासना जोपासली. जिनाज्ञा, गुर्वाज्ञाचे आदर अविहडराग, अद्वितीयपालन, अँजनशलाकाप्रतिष्ठा, पूर्वाचार्योकृत पूजाची ढाण द्वारा भक्तिधारा,प्रभुभक्ति निशंकताउपबृंहणादि आचाराचे पालन द्वारा दर्शनोपासना मध्ये वृध्धिंगत केली.

महाव्रतादि पालन मध्ये सजगता, अष्टप्रवचनमातेच्या कुक्षीत खेऴताना, चारित्र्योपासना बाऴगली. 5454 वर्षीतपचे आराधक, वर्धमान आयँबिल ओऴी, तिथीला उपवासछठ्ठ, अठ्ठम, अठ्ठाई अश्या अनेक तपश्चर्यांची शृँखलामाऴ, अप्रमतता, अल्पनिद्राधिनता, प्रतिक्रमण क्रियेत उपयोगिता, आजारां मध्ये पण सजगता वीर्याचाराचे पालन अत्यंत काटेकोरपणे करत.

शेत्रुँजय, गिरनार, नव्वाणुं, छफरीपालक सँघाची शृँखला, भद्रेश्वर तीर्थधामाचे तीर्थोध्धारक, अनेक तीर्थक्षेत्रांचे निर्माण, शताधिक अँजनशलाका, प्रतिष्ठाणे, आदि... जिनशासनाचे प्रमुख कार्यात स्वतः अग्रेसरपणे हजर राहून... स्वतःच्या मार्गदर्शनात विविध धार्मिक अनुष्ठानांची शृँखलाच रचलेली आहे.

प.पू. गुरूदेव... आपल्या आकसत्मिक महाप्रयाणाने... सूनी सूनी झाली रे... सृष्टि..., सूने सूने झाले रे... हे धरतीअँबर...! सूने सूने झाले रे... परिसर गच्छाचे..., सूने सूने झाले द्वार रे... नगरनगर... गावगाव... गल्लीबोऴे झालेत सूने रे...! अँतरमन होऊनी गेले सूने रे... अन् नयनात झाली शुरू अश्रुंची वर्दऴ, विरहाच्या तूफानी वार्याने...! सूकानी निघूनी गेला रे... श्री अचलगच्छ जिनशासनचा रे....!!

खान्देश क्षेत्रातील जऴगाव जिल्ह्यामधील सर्व श्री. अचलगच्छ जैन श्रीसंघासह श्री.कच्छी दशाविशा ओसवाल जैन महाजनश्री, जऴगाव, श्री. कच्छी दशा ओसवाल जैन समाज,जऴगाव..., श्री. जैन श्वेताँबर मूर्तिपुजक श्रीसँघ,जऴगाव..., श्री. सकल जैन श्रीसँघ,जऴगाव... सहीत श्री. महेश काँतीलाल मोतापरीवार (जऴगाव)... परम पूज्य गुरूदेवाच्या पावनचरणी साश्रुनयनी श्रध्धाँजली अर्पित करीत आहे.

परम पूज्य श्री गुरूदेवाचा आत्मा शिघ्रताशिघ्र मोक्षमार्गी बनो आणि परम पदाच्या परम स्थानी स्थिर होऊनी ध्रुव तारा समानी विश्वात जैनधर्माच्या नभात सदा चमकत राहो हीच परमपिता परमेश्वराच्या चरणी नम्र अभ्यर्थना करीत आहोत!

परम पूज्य श्री गुरूवर्याच्या देवलोकगमनाने जिनशासनामध्ये फार मोठी पोकऴी निर्माण झालेली आहेत! परंतु आजच्या वर्तमान काऴात कोरोनावायरस मुऴे बिघऴलेल्या परिस्थितीत तसेच सरकारी नियमाच्या आधीन राहूनी वर्तमानी संजोगवशात्... सामुहीक गुणानुवाद तसेच श्रध्धाँजलीचा धार्मिककार्यक्रम ठेवता येणे शक्य नाही.

तरी सर्व जैनबांधवाना नम्र निवेदन की आपण आपआपल्या घरीच राहूनी 12नवकार महामँत्राचे काउसग्ग पाऴूनी... जैन धर्माचार प्रमाणे यथायोग्य तपजपआराधना करीत आपले परम पूज्य श्रध्देय गुरूदेवाला... अँतिम श्रध्धाँजलिची ओंजऴी वाहूनी... परम आत्म्याच्या परम प्रवासात सुखामय निरामय आणि अव्ययाबाधरीतीने निर्विघ्नपणे पूर्णतेच्या काठी पहोचो हीच प्रभु चरणी नम्र अभ्यर्थना करतो आहेत.....!!!

महेश कांतीलाल मोता

(मो.94044 92830)

Deshdoot
www.deshdoot.com