मांसाहारापासून सावधान !

विनाशकारी – प्रलयकारी कोरोना सारख्या घटना घडत असतांना मांसाहाराचे सुख घेण्याचे प्रकार थांबविणे गरजेचे आहे. पशुंना ठार मारण्यापूर्वी त्यांच्या शरीरात असलेल्या रोगांचे योग्य परीक्षण केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात असलेले रोग मांस खाणार्‍याच्या शरीरात प्रवेश करतात व आपले कार्य सुरू करतात. कारण शरीर हे रासायनिक तत्वांनी निर्माण झालेले एक अदभुत यंत्र आहे.

रतनलाल बाफना,जळगाव

ध्या कोरोना व्हायरसने चीनमध्ये धुमाकुळ घातला असून आपल्या नागरिकांना या व्हायरसची झळ बसू नये यासाठी शास्त्रज्ञ अचूक उपचार शोधण्यासाठी संशोधन करत आहेत तर या आजाराने चीन मध्ये 2500 वर बळी घेतले असून 76 हजारांपेक्षा जास्त नागरीक यामुळे बाधित झाले आहेत.चीनसह दक्षिण कोरिया, जपान व इराणमध्येही या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येत असून कुठपर्यंत हा व्हायरस पसरेल याचे उत्तर कुणाकडे ही नाही. विनाशकारी – प्रलयकारी कोरोना सारख्या घटना घडत असतांना मांसाहाराचे सुख घेण्याचे प्रकार थांबविणे गरजेचे आहे.

पशुंना ठार मारण्यापूर्वी त्यांच्या शरीरात असलेल्या रोगांचे योग्य परीक्षण केले जात नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात असलेले रोग मांस खाणार्‍याच्या शरीरात प्रवेश करतात व आपले कार्य सुरू करतात. कारण शरीर हे रासायनिक तत्वांनी निर्माण झालेले एक अदभुत यंत्र आहे. तुम्ही शरीरात आहाराच्या रूपाने जो पदार्थ टाकाल. त्याची रासायनिक प्रक्रिया ताबडतोब सुरू होते.जर एखादा मनुष्य शरीरात मद्य (दारू) भरेल तर त्याचे शरीर ताबडतोब रासायनिक प्रक्रियेद्वारा नशेने व मूर्छेने भरून जाईल. मग तो मनुष्य कितीही शांत व सभ्य का असेना ! रासायनिक प्रक्रिया त्याच्या शरीरावर नशेचा परिणाम घडविल्याशिवाय राहाणार नाही.

मनुष्य कितीही साधू असला तरी त्याला जर विष पाजले तर त्याचा मृत्यू होणारच. हे अटळ आहे. म्हणून मनुष्य जेव्हा मांस खातो. तेव्हा मांस शरीरात जाताच शरीरातील ग्रन्थी विष स्त्रवू लागतात. तसेच ज्या त्रस्त, भयंकर, उद्वेगजनक वातावरणात पशुंची हत्या केली जाते. त्या वातावरणात उत्पन्न झालेला ताण, भय, तळतळाट, क्रोध, चीड, व्याकुळता वगैरेमुळे पशुंचे मांस पिषाक्त (विषारी) बनलेले असते. ते विषारी, रोगग्रस्त मांस मांसाहार करण्यार्‍याच्या पोटात जावून त्याला अनेक असाध्य रोगांचा शिकार बनविते.

बर्डफ्लू, मेड काऊ, कोरोना सारख्या व्हायरसची उदाहरणे आमच्या समोर आहेतच. प्रेम, करूणा, दया, क्षमा हे मानवी गुण आहेत. एखाद्याचा जीव घेवून त्याला खाणे कितपत योग्य आहे ? आश्चर्य तर हेच आहे की, आम्ही एकीकडे दयेच्या नावावर कित्येक जनावरांना संरक्षण दिले आहे. तर दुसरीकडे मांसाहारी भोजन अधिक पसंत करीत आहोत, जीवनात भोजनाचे अत्यंत महत्व आहे. भोजन (आहार ) ह्या धामधूमीच्या गजबजलेल्या संसारात आमच्या बुध्दीला तरतरीत करून आम्हांला विचार करण्याची शक्ती देते, आजच्या युगात शारीरिक शक्तीपेक्षा बौध्दिक शक्तीची अधिक जरूर आहे. शाकाहारी सात्विक भोजन बुध्दीला तरतरीत बनविते.

भांडणे, कलह, अपराध आणि क्रूरता कमी करण्यात व जीवनात शांती कायम राखण्यात मदत करते. शाकाहार सात्विक आहार आहे. सत्व गुणाचे संवर्धन करणारा आहार आहे. शाकाहाराने मनुष्यात मानवतेचा आविष्कार होतो. ज्या क्षणी मनुष्याची क्रुरता थांबेल त्या क्षणी ही पृथ्वी सुखद आणि सुसह्य होईल यात शंकाच नाही. शाकाहार आणि अहिंसा तत्व मानवी जीवन मूल्य जपण्यासाठी नक्कीच हिताचे आहेत म्हणून त्याचा अवलंब व्हावा ही कळकळीची विनंती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com