Friday, April 26, 2024
HomeUncategorizedबैरुतच्या स्फोटाने हिरोशिमाच्या जागवल्या आठवणी

बैरुतच्या स्फोटाने हिरोशिमाच्या जागवल्या आठवणी

ज्वलनशील पदार्थांमुळे लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये भीषण स्फोट झाला. लेबनॉन स्फोटास ज्वलनशील पदार्थ कारणीभूत लेबनॉनच्या बंदरालगतच्या राजधानीत मंगळवारी झालेल्या शक्तीशाली स्फोटास ज्वलनशील पदार्थ कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न होत आहे. सुरुवातीला फटाक्यांना आग लागून अमोनियम नायट्रेटने पेट घेतल्यामुळे स्फोटाची तीव्रता वाढली.

या नुकत्यात घडलेल्या स्फोटामुळे जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांमध्ये झालेल्या विध्वंसाची आठवण पुन्हा झाली. अमेरिकेने 1945 च्या ऑगस्ट महिन्यात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकले आणि दुसरं महायुद्ध संपलं. या स्फोटांमुळे झालेली मानवी हानी हादरवून टाकणारी होती. या धक्क्यामुळेच त्या अणुबाँबपेक्षाही भयानक अस्त्रे निर्माण झाली असली तरीही त्यांचा वापर न करण्यासाठी सर्वच देश पुढाकार घेताना दिसतात.

- Advertisement -

हिरोशिमा शहरासाठी 6 ऑगस्ट 1945 रोजीची सकाळ 70 हजार नागरिकांसाठी काळ बनून आली होती. सकाळी 8.15 मि. सुमारास शहरावर 600 मीटरवर लिटल बॉय अणुबाँबचा स्फोट झाला आणि यात 70 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. शहरातील 90 टक्के भाग बेचिराख झाला होता. स्फोट झाला तेव्हा मृत्यू झालेल्यांच्या संख्येत पुन्हा परिणाम म्हणून तेवढीच भर पडली. या हल्ल्यामुळे एकूण 1 लाख 40 हजार जणांचा मृत्यू झाला.

लिटल बॉयने उद्ध्वस्त केलं हिरोशिमा

लिटलबॉय या बाँबची उंची तीन मीटर इतकी होती. हा एक युरेनियम बाँब होता. याची हल्ला करण्याची क्षमता 13 ते 16 किलोटन टीएनटी इतकी होती. बाँब हल्ला करताना युरेनियमचा एक कण इतर कणांवर आदळवण्यात आला होता.

नागासाकीवर ‘फॅट मॅन’चा हल्ला अमेरिकेनं हिरोशिमानंतर नागासाकीवर 9 ऑगस्टला हल्ला केला होता. यामध्ये 74 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. 9 ऑगस्ट 1945 ला सकाळी 11:02 मिनिटांनी नागासाकीवर फॅट मॅनचा हल्ला केला. शहराच्या 500 मीटरवरून फॅट मॅनचा हल्ला झाला. यामध्ये बाँबमधील घटकाच्या बाह्य आवरणाचा दाब वाढून प्लुटोनियमच्या केंद्रकाचा स्फोट घडवून आणला होता. याची उंची 3.25 मीटर इतकी होती. याची क्षमता 19 ते 22 किलोटन टीएनटी इतकी होती.

भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट सर्बर यांनी या दोन्ही बॉम्बच्या आकारांवरून त्यांचे नामकरण केले होते. हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बला पूर्वी ‘थिन मॅन’ असे म्हटले गेले होते. डॅशिल हॅमेट यांनी लिहीलेल्या रहस्यकथेतील हे एक पात्र होते. या बॉम्बमध्येच सुधारणा करून ‘लिटील बॉय’ची निर्मिती केली गेली होती. ‘लिटील बॉय’मध्ये युरेनियम आणि ‘थिन मॅन’मध्ये प्ल्युटोनियमचा वापर केला गेला होता.

‘फॅट मॅन’हे देखील हॅमेट यांच्या 1930 च्या ‘माल्टीज फाल्कन’रहस्य कादंबरीतील एक पात्र होते. त्याच कादंबरीवर 1941 साली आलेल्या सिनेमामध्ये हे पात्र साकारणार्‍या सिडने ग्रीनस्ट्रीट सारखाच गोल गरगरीत दिसत असल्यामुळे ‘थिन मॅन’चे नाव बदलून नंतर ‘फॅट मॅन’ केले गेले होते. हिरोशिमा आणि नागासाकी अणुबाँम्ब हल्ल्याला आज 75 वर्षे पूर्ण झाली.

6 ऑगस्ट 1945 चा तो दिवस, पहिला अणूबाँम्ब जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकला गेला होता त्यात 17 नोबेल विजेत्यांच्या सहभाग होता, हा शक्तिशाली अणूुबाँम्ब ज्या प्रोजेक्ट खाली करण्यात आला तो प्रोजेक्ट म्हणजे मॅनहँटन प्रोजेक्ट

या अणुबाँम्ब हल्ल्याच्या बाबतीतले काही ऋरलीीं या लेखातून मी आपल्यासमोर मांडते आहे..जे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल…..

1) Pamphlets USÀ m­irforce जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यापूर्वी त्या शहरातील लोकांना एक सतर्कतेचा इशारा दिला होता तो leaflets द्वारे त्यांना नकळतपणे वॉर्न करण्यात आले होते. हिरोशिमावरील अणुबाँम्ब हल्ल्यापूर्वी यांनी तशी काही छापिल पत्रके जापनीज् साठि विमानातून सोडली होती. त्या छापील पत्रकांवरील मजकूर असा होता.

हे आपले जीवन किंवा नातेवाईक किंवा मित्राचे जीवन वाचवू शकते म्हणून काळजीपूर्वक वाचा. पुढील काही दिवसांत, उलट बाजूस नावे असलेली काही किंवा सर्व शहरे अमेरिकन बॉम्बने नष्ट केली जातील. या शहरांमध्ये लष्करी स्थापना आणि कार्यशाळा किंवा कारखाने आहेत ज्यात सैन्य वस्तूंचे उत्पादन होते.

हे निरुपयोगी युद्धाचे प्रदीर्घकाळ वापरण्यासाठी ते वापरत असलेल्या लष्करी वर्गातील सर्व साधने नष्ट करण्याचा आमचा निर्धार आहे. पण दुर्दैवाने, बॉम्बांना डोळे नसतात. तर, अमेरिकेच्या मानवतावादी धोरणांच्या अनुषंगाने, निरपराध लोकांना इजा करण्याचा इशारा न देणारी अमेरिकन हवाई दल आता तुम्हाला नावे असलेली शहरे रिकामे करुन आपला जीव वाचविण्याचा इशारा देते. अमेरिका जपानी लोकांशी लढत नाही तर लष्करी चळवळीशी लढत आहे ज्याने जपानी लोकांना गुलाम केले आहे. अमेरिका जी शांती आणेल ती सैन्य टोळीच्या दडपशाहीतून लोकांना मुक्त करेल.

नवीन आणि उत्तम जपानचा उदय होईल. आपण युद्ध समाप्त करणार्‍या नवीन आणि चांगल्या नेत्यांची मागणी करून शांतता पुनर्संचयित करू शकता. आम्ही फक्त आश्वासन देऊ शकत नाही की फक्त ही शहरे आक्रमण झालेल्यांपैकी असतील. परंतु काही किंवा त्यापैकी काही असतील, म्हणून या चेतावणीकडे लक्ष द्या आणि ही शहरे त्वरित रिकामी करा.

अशी छापील पत्रके सोडण्यात आली होती..

2) The Policeman हिरोशिमावर अणुबाँम्ब हल्ला झाल्यानंतर त्यापासून बचावासाठिचे तंत्र शिकवण्यासाठी एक पोलीस हा नागासाकी शहरात गेला. म्हणून नंतर नागासाकीमध्ये बाँम्ब हल्ल्यानंतर तेथील एकही पोलिसाचा मृत्य झाला नाही. ह्या अणुबाँम्बबद्दल जापानी लोकांना काहीच माहिती नसले, तरी पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना सांगितले कि प्राणघातक शॉक वेव्हनंतर काही सेकंदातच एक उज्वल प्रकाश येईल. मित्सुबिशीचे ह्यात जहाज डिझायनर त्सुतोमो यामागूची यांनीही हिरोशिमाकडून हा संदेश नागासाकि येथील त्यांच्या कंपनीकडे आणला आणि म्हणून त्यांच्या विभागातील बरेच जण उडत्या काचेमुळे जखमी होण्यापासून वाचले.

पण अणुबाँम्बच्या नवीन व अज्ञान स्वरूपामुळे अणुबाँम्बच्या उष्णतेमुळे किंवा स्फोटाच्या धोक्याबद्दल सर्वसामान्यांना इशारा देण्यात आला नव्हता. त्यामुळे या दोन्ही शहरातील लोकांचा आकाशातील ह्या चमत्कारिक फ्लॅशचा स्त्रोत शोध शोधण्यात वेळ गेला….

3)Oleander हे हिरोशिमा शहराचे अधिकृत फूल आहे आणि ऑलिंडर हे फूल अणुबाँम्बच्या स्फोटानंतर फुलणारी ही पहिली गोष्ट होती..

4) Cyanide pills एनोला गे ( ­tom B घेऊन जाणारे विमान) यामध्ये काँकपिटमध्ये सायनाइडच्या 12 गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यातील pilots ला सूचना दिल्या होत्या की ह्या मिशनच्या दरम्यान तुम्ही काहीही तडजोड केली तर ह्या गोळ्या घ्याव्यात..

5)The secrecy गोपनीयता, एलोना गे मधील 12 पैकी फक्त 3 लोकांना ह्या हिरोशिमाच्या मिशनचा उद्दिष्ट्ये माहिती होते बाकिचे यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होते..

मँनहँट्टन प्रकल्पाचा भाग म्हणून ओक रिजची संकल्पना अमेरिकेच्या सरकारने 1940 च्या सुरूवातीस युरेनियम व प्लुटोनियमच्या कामासाठी आधार म्हणून बनवली होती. आण्विक प्रयत्नांनी पुढे जात असताना शहरे वाढत गेले. 1945 पर्यंत जवळपास 75000 लोकांची घरे असलेल्या एकादाट उपनगराचे आकारमान तयार झाले. युध्दाच्या शेवटी ओक रिज हे राज्यातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर होते..

6) Ignorance 6 ऑगस्ट 1945 ला जापानी रडारांनी काही अमेरिकन विमाने त्या प्रदेशात प्रवेश केल्याचे ट्रँक केले होते पण त्यांना अडविण्यात आले नाही. कारण त्यावेळी त्यांना वाटले होते की, हे कमी संख्येने प्रवेश केलेले विमानं देशाला कोणताच धोका पोहचवणार नाही, म्हणून त्याकडे जापनीजने पूर्णपणे दुर्लक्ष केले..

7) What Just Happened नेमकं काय घडले हिरोशीमावर अणुबाँम्ब स्फोट झाला हे टोकियोला समजण्यासाठी सुमारे 3 तास लागले..

8) The Lucky One हिरोशिमाचा अणुस्फोटापासून वाचलेला सर्वात जवळचा जिवंत भूभाग हा शून्यापासून 170 मी. अंतरावर तळघरात होता.

9) Surviving Hiroshima and Nagasaki 1945 मध्ये स्तुतोमो यामागुची नावाच्या व्यक्तिने हिरोशिमा मध्ये झालेल्या अणुस्फोटातून स्वतःला काढून एका हवाई हल्ल्याच्या आश्रमस्थानाला घेरले. तेथे त्यांने रात्र काढली,सकाळी नागासाकी येथे नोकरीवर वेळेवर पोहचता यावे म्हणून तो जिवंत राहिला आणि तिथे दुसरा अणुबाँम्ब स्फोट हल्ला झाला.

10) The Flame of Peace या अणूबाँम्ब हल्ल्यात जे लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या स्मरणार्थ 1964 पासून शांतीची ज्योत पेटत आहे आणि जेव्हा फक्त हे अण्वस्त्रे होणार नाहीत व ही पृथ्वी अणू धोक्यातून मुक्त होईल तेव्हाच ती विझेल…..

आज जगभरात भारतासह डझनभर देशांकडे अणुबॉम्ब आहेत. मात्र, दुसर्‍या महायुद्धात झालेल्या प्रचंड नरसंहारानंतर इतर कोणत्याही देशाने अन्य कोणत्याही शत्रू देशावर अणूबॉम्ब टाकलेला नाही.हे पृथ्वीवरील संपूर्ण मानवजातीचे भाग्यच म्हणावे लागेल.

सौ. पौर्णिमा सोनवणी,9028527761

– गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या