Monday, April 29, 2024
HomeUncategorizedवाचक, लेखक यांना एकत्र आणणारा उपक्रम

वाचक, लेखक यांना एकत्र आणणारा उपक्रम

नाशिक । Nashik | शुभम धांडे

साधारण 22 वर्षांपूर्वी एक सरकारी अधिकारी ज्यांना कुसुमाग्रजांना (kusumagraj) भेटण्याची इच्छा होती. परंतु इतक्या मोठ्या कलाकारास लेखकाला (Author) कसे भेटता येऊ शकते. असा विचार करून त्यांनी भेटण्याचा प्रयत्नच केला नाही. परंतु वस्तुतः कुसुमाग्रज हयात असेपर्यंत प्रत्येक सर्वसामान्याच्या भेटीसाठी त्यांची दार चोवीस तास उघडे असायची. असाच संकोच करून बरेच जण आपल्याला हव्या त्या लेखकाच्या भेटी विना राहतात.

- Advertisement -

जेव्हा त्या सरकारी अधिकार्‍याची इच्छा आताचे ‘लेखक तुमच्या भेटीला’चे (lekhak tumchya bhetila) संस्थापक असलेल्या वसंत खैरनार (vasant khairnar) यांनी ऐकली. तेव्हा कुठल्याही सर्वसामान्य माणसाची, वाचकाची (Reader) चांगल्या लेखकाशी भेट घडवून आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेतूनच लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचा जन्म झाला. आणि 1 ऑगस्ट 2000 ते 31 ऑगस्ट 2000 दरम्यान पहिल्यांदा हा उपक्रम राबवण्यात आला.

त्यावेळी जवळपास 36 लेखकांची भेट रसिक वाचकांना मिळाली होती. यावेळी लेखक वसंत कानेटकर (Author Vasant Kanetkar) यांना या संकल्पनेविषयी सांगण्यात आले तेव्हा तुम्हीं सुरुवात करा. उद्घाटनाला मी स्वतः येईल अशा शब्दांत त्यांनी प्रोत्साहन दिले आणि प्रत्यक्ष उद्घाटनाला ही उपस्थित राहिले होते. या लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाचे विशेष असे की यात

लेखकाच्या परिचयानंतर पुढे लेखक आणि लोकांमध्ये प्रत्यक्ष प्रश्न उत्तर अशा पद्धतीने चालणारा हा पूर्णपणे लेखक आणि वाचक, रसिक यांच्यात मनमोकळे पणाने होणारा संवाद असतो. एकंदरीत लेखकांच्या साहित्याचा प्रवास, तो प्रवास वाचकांपर्यंत पोहचावा, वाचकांमध्ये, श्रोत्यांमध्ये वाचनाची गोडी अधिक वृधिंगत व्हावी. त्यांनी पुस्तकांकडे वळावे, हा हेतू या कार्यक्रमामागे आहे.

त्यामुळेच या मंचावर येणारा लेखक हा कवी (Poet), नाटककार (Playwright), सिनेमा, राजकारण, विज्ञान, साहित्य, पत्रकारिता, प्रवास वर्णन, आध्यामिक असे वेगवेगळ्या क्षेत्रांतील असतो. अशा लेखकांची भेट आजवर या उपक्रमाच्या माध्यमातून घडत आली आहे. यासाठी निवडण्यात येणारे लेखक हे वर्षभरात कुठली पुस्तके नवीन आली, नवीन लेखक कोण आले आहेत, जुने कोणते लेखक आहे,ज्यांची भेट रसिकांना करवून देऊ शकतो या विचारातूनच करण्यात येते.

या उपक्रमाचे आजवरचे विशेष म्हणजे आजवर काही अपवाद वगळता या 22 वर्षात कुठलाही लेखक परत परत न बोलावता प्रत्येक वेळी नवीन लेखकाची भेट वाचनप्रिय रसिकांना देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. साधारण 250-245 लेखक मंचावर आजवर वाचकांच्या भेटीला येवून गेले आहेत. दरवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान होणार्‍या या उपक्रमाचे यंदा 22 वे वर्ष होते. कोरोना महामारी (Corona epidemic) मुळे सभागृहात कार्यक्रम घेणे शक्य नसतांनाही कुठलाही खंड पडू न देता, ऑनलाईन (online) माध्यमातुन यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांतील नऊ लेखकांची भेट घडवून आणली.

ज्यात लोकं माझे सांगाती हे राजकीय आत्मचरित्र लिहिणारे शरद पवार (sharad pawar), शास्त्र: अर्थपूर्ण जगण्याचे सांगणारे अर्थशास्त्रज्ञ लेखक डॉ. आशितोष रारावीकर (Economist writer Dr. Ashitosh Raravikar), आजच्या मनोरंजनाचे बदलेते विश्व या विषयावर मालिका अभिनेता, लेखक चिन्मय आणि अभिनेत्री अनिता दाते, तर दीपोत्सव (dipotsav) या दिवाळी अंकांच्या (diwali) लाखाची गोष्ट मध्ये अंकाच्या यशस्वी घोडदौडचे पैलू फीचर्स संपादक अपर्णा वेलणकर,

आपल्या पहिल्यावहिल्या नात्यांचं सर्व्हिसिंग या पुस्तकाच्या निमित्ताने नवोदित लेखक विश्वास ठाकूर (vishwas thakur), जगण्याच्या अद्भूत इतिहासाचा वेध ज्येष्ठ इतिहास अभ्यासक लेखक म्हणून सुनील पोतनीस (sunil potnis), हिंदी चित्रपटसृष्टीतील गाण्यांचा, संगीताचा (Music) मनोरंजक आढावा चित्रपट अभ्यासक व लेखक कैलास कमोद (kailas kamod) त्यांनी तर पेट्रोल डिझेलची (Petrol -diesel) दरवाढच्या जवलंत विषयाला अनुसरून इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) काळाची गरज यावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी (omprakash kulkarni) यांनी संवाद साधताना इलेक्ट्रिक वाहनाकडे वळण्याचा सल्ला दिला.

तर या वर्षीच्या सगळ्यात शेवटच्या सदरात वाचकांचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी श्यामच्या आईपासून नरसिंहरावांच्या इनसाईडर पर्यंत सगळ्याचा मागोवा घेतला. सर्वसामान्य माणसाला दैंनदिन जीवन आनंदी कस करावा, यासाठी पुस्तकांचं वाचन किती महत्वाचं आहे हे त्यांनी प्रामुख्याने सांगितले.एकंदरीत वाचक आणि लेखक यांना एकत्र आणणारा, त्यांच्यात सुसंवाद घडवून आणणारा लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम कौतुकस्पद म्हणावा लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या