शंभर निरपराधी सुटले तरी…

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

दरबारात प्रधान अतिशय गंभीर मुद्रेत बसले होते. इतक्यात सेवक आला; त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता दालनात प्रवेश केला आणि प्रधानची घात झाला. शहरावर संकट यायला लागले असे सांगितले. प्रधानाने किंचित भुवई वर करत बोटानेच थांबण्याचा इशारा केला. प्रधानाच्या या वागणुकीवर सेवकही चक्रावला. नगरात एवढं संकट येऊ घातले आहे आणि प्रधान हातात पेन घेऊन कागदावर काहीतरी लिहित बसला आहे.

सेवक वाट बघत बसला; प्रहर दीड प्रहर होऊन गेला तरीही प्रधान आपल्याला बोलावत नाही म्हणून नाराज झाला. एवढ्यात एक उपप्रधान झपझप पावले टाकत प्रधानाच्या दालनात शिरला. उपप्रधान थोडा वैतागलेला होता. त्याला नगरातील दवंडीवीरांनी खूप प्रश्न केले होते, त्यातले काही प्रश्नांची उत्तरे देण्यास तो समर्थ ठरला होता मात्र काही प्रश्नांची उत्तरे फक्त प्रधानच देऊ शकत होता. उपप्रधानाला बघटाच प्रधानाने विस्मयकारक हास्य चेहर्‍यावर आणले आणि त्याच हास्यात बोलला. हो गया उपप्रधान साहेब हमारा बहुत बडा काम हो गया.. यासाठी मला तुम्हा सर्वांची खूप मदत होणार आहे. आपले नगर महानगरात क्रमांक एकचे नगर होणार आहे. सर्वच नागरिक आता शिरस्त्राण (Helmet) परिधान करणार आहे.

उपप्रधानही हास्यात बोलला. प्रधानजी एक संकट आले आहे शहरावर.. चार दिवसात वेगवेगळया ठिकाणी नागरिकांच्या हत्या (Murder) झाल्या आहेत. नगरवासीय घाबरले आहेत. नगरातील दवंडीवीर काही केल्या पाठ सोडत नाही. त्यांना प्रधानाने काहीतरी करून हे हत्यासत्र (Assassination session) थांबवावे असे वाटत आहे. प्रधानजी आपल्याला रात्रीचे पहारे आणखी घट्ट करावे लागणार आहे. हे करत असताना कोणी असे करत असेल तर त्याला सजा करावी लागणार आहे.

प्रधानाने गंभीर मुद्रा करत.. आठवला.. मला मगाच पासून काहीतरी आठवत नव्हते ते आठवला. असे वाक्य बोलताच उपप्रधानाला वाटले आपल्या बोलण्याचा काहीतरी फायदा झाला असून आता काहीतरी ठोस नियोजन होईल. आणि नगरातील हे संकट आपण परतवून लावू. पण झाले वेगळेच.. प्रधानाने मोठा श्वास घेत.. आपण शिरस्त्राण मोहिमेत समुपदेशन (Counseling) करतोय.. समुपदेशन झाल्यावर त्यांची परीक्षा घेणार आहोत. त्यासाठी प्रश्नपत्रिका बनवतोय. नऊ प्रश्न झाले आता दहावा काय घ्यावा हे मला सुचत नव्हते. तुम्ही सांगत होतात तेव्हा मला सुचले.. आपण मराठी म्हण घेतोय शंभर निरपराधी सुटले तरी चालतील पण एक …. सुटला नाही पाहिजे. असा प्रश्न आपण घेऊ.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *