मद्यधुंद रोडरोमिओंचा सुळसुळाट

मद्यधुंद रोडरोमिओंचा सुळसुळाट

धामोरी । दत्ता घुले | Dhamori

खेडोपाडी आता नागरीकरणाचा वेग वाढल्याने कुठलीही नवी बाब ही शहराबरोबरच किंबहुना अगोदरच गावांमध्ये लवकर अनुकरणशील ठरते. त्यात सोशलमीडियाचा (social media) वापर गावातील तरुणाईत मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यात वेगळे काही दाखवण्यासाठी काहीही करायला तरुणतुर्क धजावतात.

पण गंभीर बाब म्हणजे वयात येतानाच खेडोपाडी युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यातून मद्यपान (Alcoholism) आणि नशेच्या धुंदीत काहीही करण्याची ऊर्मी युवकांमध्ये घातक ठरत आहे. लहान-लहान गावात मद्यपान केलेले युवक शैक्षणिक ठिकाणे (Educational places), बाजारतळे, बसस्थानक (Bus station), रिक्षा स्टॅन्ड (Rickshaw stand) किंवा गर्दीच्या ठिकाणी महिला, युवतींची छेड (Teasing of women and girls) काढण्याचे प्रकार करीत असल्याने ही समस्या सामाजिक स्वरूप धारण करीत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर रोडरोमिओंचा सुळसुळाट अजूनच वाढत जाईल.

धामोरी (dhamori) हे गाव आकारमानाने व लोकसंंख्या मानानें जादा असल्याने तसेच आसपासचे ही सात ते आठ गावांंचा संपर्क साधला जाणारे खेडे आहे.अशा ह्या धामोरी गावात विद्यालयात शिक्षण (education) घेण्यासाठी विद्यार्थ्यांची (students) संख्याही भरपूर आहेत. विद्यालय ते बसस्टॅण्ड परिसरात असून तेथेच या मद्यपान रोडरोमिओंचा सुळसुळाट पहावयास मिळतो. त्याच परिसरातील व्यावसायिक, दुकानदार अक्षरश: मेटाकुटीस आले आहे.

मद्यपान केलेल्या या रोडरोमिओंची तक्रार दाखल करण्यासाठी सर्वसाधारण माणूस तयार होत नाही उगाचच कोर्ट कचेरी नको असे म्हणून दुर्लक्ष करतात आणि त्याचाच फायदा हे मद्यपान केलेले रोडरोमिओं घेतात तरी संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक, पुढारी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत विकास अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी या मद्यपान रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी व्यावसायिक, दुकानदार, महिला बचतगट महिला व त्रास होणार्‍या धामोरी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय होत आहे.

Related Stories

No stories found.