Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedकांदा खाण्याचे फायदे आणि तोटे

कांदा खाण्याचे फायदे आणि तोटे

स्वयंपाकघरातला कांदा आरोग्यासाठी तसंच सौंदर्यासाठी खजिना असल्याचं मानलं जातं. जेवणात नेहमीच कांद्याचा वापर केला जातो. पण जेवणात शिजवलेला कांदा खाण्याहून कच्चा कांदा खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. कच्च्या कांद्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होऊ शकतो.

कच्चा कांदा खाण्याचे फायदे भरपूर आहेत. कच्च्या कांद्यामध्ये सल्फर आणि इतर आवश्यक विटामिन्स असतात. जे शरीरास अनेक आजारा पासून दूर ठेवतात. कच्चा कांदा तुम्ही सेंडविच, सलाड आणि चॅट इत्यादी मध्ये टाकून खाऊ शकता.

- Advertisement -

ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यासाठी अनेक गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात कच्च्या कांद्याचाही समावेश आहे. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्यांना, रोज एक कच्चा कांदा खाणं फायदेशीर ठरु शकतं. यामुळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होऊ शकते. कच्च्या कांदा रोजच्या जेवणात सलाड म्हणूनही सेवन करु शकता.

कांद्या मध्ये फास्फोरिक एसिड असते जे आपल्या रक्तास शुध्द करण्याचे कार्य करते. कांद्याची पेस्ट तयार करून त्याचा लेप आपल्या पायाच्या तळव्यांना लावून झोपून जावे यामुळे फास्फोरिक एसिड आपल्या धमनी मध्ये प्रवेश करून अशुध्दता दूर करेल.

कांद्यामध्ये असे काही तत्व असतात जे कॅन्सरशी लढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे कॅन्सरग्रस्त व्यक्तीने दररोज कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने, कॅन्सरशी लढण्यात मदत होऊ शकते.

कांदा, मध आणि खडीसाखर एकत्र मिक्स करून खाण्यामुळे पोटाशी संबंधित रोग बरे होतात आणि शरीर शक्तिशाली होते.

कांदा खाण्याचे नुकसान –

पोटाविषयी समस्या

कांद्यामध्ये नॅचरल फ्रुकटोज जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गॅस समस्या उत्पन्न होते. त्यामुळे जास्त प्रमाणात कांदा सेवन करू नये.

तोंडाचा वास येणे

कच्च्या कांद्याचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास तोंडाचा वास येतो.

पोटदुखीचे कारण

जास्त प्रमाणात कांदा सेवन केला तर पोटदुखीचे समस्या उद्भवते. कारण जास्त कांदा खाल्ल्याने शरीरात फायबरची मात्रा वाढते. त्यामुळे पोटदुखीचे समस्या निर्माण होते.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना संकेत यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या