Monday, April 29, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१२

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१२

लसीकरणाचे महत्त्व

लसीकरण हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून वेगवेगळ्या आजारांपासून आपले संरक्षण करते. म्हणूनच लहान मुलांमध्ये लसीकरणाचे वेळापत्रक शासनाने आखून दिले आहे. किशोरवयीन काल म्हणजे त्रिशंकू अवस्था – ना धड बालपण, ना धड मोठेपण. हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यामध्ये जबाबदारीने वर्तन करणे महत्त्वाचे असते. या कालावधीत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे असते. लसीकरण हे फक्त लहान मुलांमध्ये द्यायचे नसते , तर किशोरवयीन कालावधीमध्ये सुद्धा त्याचे महत्त्व आहे.

- Advertisement -

किशोरवयीन कालावधीचे लसीकरण पत्रक नसले , तरीही तो एक महत्त्वाचा विषय आहे. या कालावधीमध्ये लसीकरण हे आधी दिलेल्या लसींचा इम्युन रिस्पॉन्स, म्हणजेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, तसेच ज्या आजारांचा इन्सिडन्स या कालावधीत जास्त आहे त्या विरुद्ध दिले जाते. तसेच ज्या आजारांची मॉरबीडीटी अथवा कॉम्प्लिकेशन्स जास्त आहेत, त्या आजारांविरुद्धही लसीकरण केले जाते.

किशोरवयीन कालावधीतील लसीकरण हे तीन प्रकारचे असते.

१) अनिवार्य ( HPV , Tdap)

२) कॅचप (MMR, Varicella, Typhoid, Hepatitis A & B)

३) विशेष परिस्थितीजन्य ( Influenza, Japanese Encephalitis, Rabies)

उपलब्ध असलेले लसीकरण

१) HPV vaccine: ग्रीवेच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण व त्यामुळे वाढणारा मृत्युदर रोखण्यासाठी ही लस ९

वर्षानंतरच्या मुलींना दिली जाते. पंधरा वर्षाखाली २ डोस व त्यानंतर ३ डोस द्यावे लागतात.

किशोरवयीन मुलांमधील सध्या वाढत असलेल्या कर्करोगाचे प्रमाण आणि आजारांमुळे, किशोरवयीन मुलांमध्ये दिली

जाते.

२) Tdap vaccine:

जेव्हा परट्यूसिस ( डांग्या खोकला) आजाराचा उद्रेक असेल किंवा उद्रेक होण्याची संभावना असेल, तेव्हा ही लस देणे

योग्य ठरते. कारण त्याची परिणामकारकता काही कालावधीनंतर कमी होण्यास सुरुवात होते.

३) Mumps / MMR vaccine:

Mumps ( गालगुंड) हा आजार पाच वर्षानंतर, किशोरवयीन कालावधीमध्ये जास्त दिसून येत आहे. याचे कारण

म्हणजे पहिला डोस हा एक वर्षाखालील मुलांमध्ये दिल्यानंतर त्याची परिणामकारकता हळूहळू कमी होऊ लागते.

म्हणून या कालावधीत एक बुस्टर डोस देणे गरजेचे असते.

४) Hepatitis A Vaccine:

सध्या हिपॅटीटीस ए इन्फेक्शन बऱ्यापैकी वाढले आहे. याचे कारण म्हणजे वारंवार रेस्टॉरंट ला भेट आणि घराबाहेर

खाणे. त्यामुळे ही लस देणेदेखील गरजेचे असते.

५) Typhoid Vaccine:

5-15 वर्षे वयाच्या मुलांमध्ये टायफाईड हा जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे हिपॅटिटिस ए बरोबर ही लस ही

देणे योग्य आहे.

६) Varicella Vaccine:

व्हेरीसेला आजाराचे कॉम्प्लिकेशन्स किशोरवयीन वयात व मोठ्या लोकांमध्ये जास्त दिसून येतात. त्यामुळे ही लस

दिली गेली पाहिजे.

७) Hepatitis B Vaccine:

भारतामध्ये हिपॅटिस बी चे इन्फेक्शन हे क्षैतिज प्रसारण, तसेच जन्मजात प्रसारण म्हणजेच आईकडून होणाऱ्या गर्भाला होऊ शकते. आज-काल किशोरवयीन मुला-मुलींमध्ये वाढलेल्या लैंगिक क्रियाकलापांमुळे हे इन्फेक्शन जास्त दिसून येते. म्हणून ही लस देणे अनिवार्य असते.

किशोरवयीन मुलांमधील सध्या वाढत असलेल्या आजारांमुळे आणि नवीन उपलब्ध असलेल्या वॅक्सिन्स अर्थात लसीकरण जसे (HPV Vaccine) शोधामुळे , या वयातील लसीकरणाचे ही योग्य वेळापत्रक आखणे गरजेचे ठरेल. लहान मुलांमधील लसीकरणाबरोबर या वयातील मुलांमध्येही लसीकरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसे केल्याने या मुलांचे आरोग्य देखील व्यवस्थित राहण्यासाठी मदत होईल.

डॉ. चेतना दहीवलकर

स्त्रीरोग तज्ञ

- Advertisment -

ताज्या बातम्या