Monday, April 29, 2024
HomeUncategorized#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१५

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१५

पोगंडा अवस्थेतील भावनिक समस्या

मुला मुलींचे बालपण ते संपूर्ण तारुण्य सुरू होईपर्यंतच्या संक्रमण कालावधीला पोगंडावस्था असे म्हणतात. बालपण व तारुण्य या दोघांच्या मधील काळ.

- Advertisement -

अंतर मनातील वादळ

पूर्वीसारखा हट्ट करावा तर, आई-बाबा म्हणतात तू आता मोठी झालीस. बर आता आपल मत मांडाव तर म्हणतात बोलू नकोस तू लहान आहेस. खरं मी मोठी की लहान?

एका वेळी वेगाने होणारे शारीरिक, मानसिक बदल, त्यामुळे मन अनेक प्रश्नांचा फेऱ्यात, अन मनात काहूर.

टीव्ही इंटरनेटच्या मायाजालात सापडतील का उत्तर ?

कुतूहल, अज्ञान यातून पडणार चुकीचे पाऊल!

किशोरवयीन मुलांमध्ये प्रेरणा कमी असते आणि ते सहसा कंटाळलेले किंवा उदासीन दिसतात.

तरुण पोगंडावस्थेतील मुलांवर अनेकदा लहान मुलांपेक्षा जास्त नकारात्मक प्रभाव पडतो.

पोगंडावस्थेतील मुलांना अनेक प्रकारच्या भावनिक समस्यांचा अनुभव येतो त्यातील काही समस्या येथे दिल्या आहेत.

अ) ओळख आणि स्वाभिमान:-

किशोरवयीन मुले त्यांच्या स्वतःच्या भावनेचा शोध घेत असतात आणि त्यांची ओळख स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर त्यांना स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचाही सामना करावा लागतो. ह्यामुळे मनात बरेच प्रश्न पडतात.

ब) समवयस्कांचा दबाव :-

किशोरवयीन मुलांना सहसा सामाजिक नियमांमध्ये बसण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी तीव्र समवयस्कांच्या दबावाचा सामना करावा लागतो.यामुळे चिंता,असुरक्षितता आणि इतरांना खुश करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते.घरचे काय म्हणतील आणि मित्र काय चिडवतील ह्या चक्व्यूहातअडकतात

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१४

क) बदलतेमूड:-

हॉर्मोनल बदललांमुळे मूड सतत बदलतात. प्रत्येक वेळी वेगळी रिएक्शन.कधी आनंद,कधी दुःख, कधी निरागस, तर कधी संताप, कधी चिडचिड,मोठ्यांशी वाद,अभ्यासात दुर्लक्ष, त्यातच मुलांविषयी आकर्षण आणि साहजिकच सुरू होतात भावनांचा कल्लोळ. हे बदलते मूड किशोरवयीन आणि त्यांचा सभोवतालच्या लोकांसाठी आव्हानात्मक असू शकतात .

ख) तणाव आणि चिंता :-

किशोरवयीन मुलांना शैक्षणिक दबाव, सामाजिक अपेक्षा आणि भविष्यातील अनिश्चितता यांचा सामना करावा लागतो.

ग) नैराश्य :-

किशोरअवस्था हा नैराश्याचा प्रारंभाचा असुरक्षित काळ आहे.सतत दुःख, निराशा, स्वतःची हानी किंवा आत्महत्येचे विचार येऊ शकतात.

घ) शरीराच्या प्रतिमेच्या समस्या :-

या काळात किशोरवयीन मुले त्यांच्या शारीरिक स्वरूपाबद्दल अधिक जागृत होतात. मी जाड की बारीक ? बारीक म्हणजे सुदृढ नव्हे. सुदृढ असणे गरजेचे.

च) पदार्थाचे दुरुपयोग :-

काही किशोरवयीन मुले त्यांच्या भावनिक संघर्षांना तोंड देण्यासाठी ड्रग्स,अल्कोहोल किंवा इतर पदार्थांकडे वळू शकतात .

#hERHealth किशोरवयीन आरोग्य :भाग-१३

छ) शारीरिक आकर्षण :-

शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे.या वयातील शारीरिक आकर्षण भावनिक आहे,मुलांना देखील मुलींविषयी असेच आकर्षण वाटते ते क्षणिक आहे. भांबावून जाऊ नका,हे सारे हार्मोन्स मुळे होते.कोणी नकार दिला तर समोरच्या व्यक्तीच्या भावनिक बाजू समजून घ्या. नाहीतर आयुष्यभर पदरी दुःख व निराशा येईल ! प्रेम वाटणे साहाजिक असले तरी प्रेमात पडायाचे हे वय नाही – ते प्रयत्नपूर्वक टाळा.

ज)उशिरा वयात येणे:-

पोगंडावस्था उशिरा सुरू झाल्यास कमीपणाची भावना,आत्मविश्वासाचा अभाव, चिंता,नैराश्य, उदासीनता, लैंगिक वर्तनाची भीती, लैंगिक समस्या इत्यादी प्रश्न निर्माण होऊ शकतात. हे प्रश्न आणि धोके कमी होण्यासाठी लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे.

पालक आणि युवकांना सूचना

मन मोकळे करा. खात्री बाळगा आई वडील आपले मित्रच आहेत. त्याची मदत घ्या.पोगंडाअवस्थेत मुला मुलींना पालकांचा सकारात्मक आधार,उपजीविकेसाठी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेण्यासंबंधी मार्गदर्शन व त्यांच्या विविध समस्यांवर समूपदेशन मिळणे गरजेचे आहे.

#hERHealth किशोरवयीन आरोग्य : भाग-१२

अशावेळी मुला मुलींवर न रागावता त्यांच्या चुका कौशल्याने दाखवून देणे ही पालकांचे कर्तव्य आहे. चर्चेसाठी त्यांना घरातील वातावरण मोकळे ठेवणे आणि उत्तम सामाजिक व नैतिक वागणुकीच्या आदर्श स्वतःच्या वर्तनाने मुला-मुलींना घालवून देणे हे पालकांचे कर्तव्य असते.

ओळख करून घ्या स्वतःची स्वतःशी.जीवनशैली बदला. व्यायाम करा.व्यायाम व खेळाच्या माध्यमातून सर्वांशी मिळून मिसळून वागण्यास शिकविणे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा,आत्मविश्वास ठेवा चांगले मित्र जोडा. या वर्गातील मुला-मुलींचा सर्वांगीन विकास होऊन समाजाचाही विकास घडून येतो. मदतघ्या. घाबरु नका गरज पडल्यास वैदकिय सल्ला घ्या.

डॉ. सोनल गिरीश काळे

स्त्रीरोग तज्ञ

हृदयस्पर्श हॉस्पिटल

द्वारका नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या