Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedगुळाच्या चहाला ‘अच्छे दिन’!

गुळाच्या चहाला ‘अच्छे दिन’!

येवला । सुनील गायकवाड | Yeola

भारतीयांना चहाची (tea) इतकी सवय लागली की चहा जीवनातील अविभाज्य पेय (Integral drink) झाले. आणि आता साखरेच्या (Sugar) चहाचे महत्व कमी होऊन गुळाच्या (Jaggery) चहाने वेड लावले आहे. येवल्यातही (yeola) गुळ चहा (Jaggery tea) चांगलाच रुजला आहे. तालुक्यातील भारम येथील सेवानिवृत्त जवान नारायण धोकळे याने गुळाच्या चहाचे दालन सुरू करून चहा प्रेमींना आकर्षून घेतले आहे.

- Advertisement -

गेल्या 35 – 40 वषार्र्पूर्वी घरातील मंंडळींना गुळाचा तर पाहुण्यांना साखरेचा चहा दिला जायचा. त्यातही निम्मा गुळ तर निम्मी साखर असायची. साखरेचा चहा पिणे श्रीमंंतीचे लक्षण मानले जायचे. पण आता अनेक संशोधनाने साखरेचे दुष्परिणाम (Side effects of sugar) अधोरेखित केल्याने साखरेच्या चहाला लोक नाक मुरडत आहेत, तर गुळाच्या चहाला महत्व प्राप्त झाल्याने प्रत्येक शहरात व परिसरात गुळाच्या चहाची दुकाने चांगला उभी राहत आहे.

चहा पिण्यासाठी कप-बशी याचा वापर पूर्वी होत होता. दरम्यान काळात कप व बशी अडगळीला पडली होती. मात्र आजही अनेकजण कप-बशीचा वापर करतात. सध्या राज्यातील शहरात नंबर वन, येवले, गुळाचा चहा, प्रेमाचा चहा अशा विविध प्रकारचा चहा मिळण्याचे हॉटेल ठिक-ठिकाणी थाटण्यात आले असून चहाची स्पर्धा सुरू झाली आहे.

चहा पिणार्‍यांची संख्या वाढली, त्यामुळे चहा विक्रेत्यांनी स्वतः हॉटेलचे (hotel) नाव ग्राहकांच्या लक्षात राहावे म्हणून चिनी मातीच्या कपावर स्वतः च्या हॉटेलचे नाव प्रसिध्द केले. या हॉटेलमध्ये चिनी मातीच्या कपाला भाव आल्यामुळे या कपाचा वापर आता हातगाड्यावर विक्री होत असलेल्या चहा विक्रेत्यांनी चिनी मातीच्या कपाचा वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे.

गुळाच्या चहाने शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते. घशाला आराम – घसा खवखवत असल्यास किंवा घसा बसल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरत, अशी प्रतिक्रिया अंगणगाव येथील चहा विके्रते नारायण ढोकळे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या