Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedकर्णधार नसलेल्या आआपाचे जहाज डुबणार की तरणार!

कर्णधार नसलेल्या आआपाचे जहाज डुबणार की तरणार!

नाशिक । वैभव कातकाडे । Nashik

गेल्या 2 महिन्यांपासून नाशिकमध्ये (nashik) आम आदमीच्या (Aam Adami Party) जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर अद्यापही नाशिकमध्ये नेतृत्वाचा चेहरा देण्यात या आदमी पक्षाला यश आलेले नसल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसांवर महापालिका निवडणुका (Municipal elections) आलेल्या असताना राज्य कोयर कमिटी (State Choir Committee) नेतृत्वाबद्दल कोणताही निर्णय घेत नसल्याने आता या कॅप्टन नसलेल्या आम आदमी पक्षाचे (Aam Adami Party) जहाज डूबणार की तरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal elections) जागांवर 133 उमेदवार देण्याचे आम आदमी पार्टीने ठरविले आहे. उमेदवार देताना सर्वसामान्य माणूस असा निकष त्यांनी लावलेला आहे. यामध्ये त्या उमेदवाराला सर्वतोपरी प्रयत्न, प्रचार तसेच त्याच्या प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी पोहोचणे, त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय करता येऊ शकेल याबाबत विश्वास निर्माण करून देणे हा महत्त्वाचा अजेंडा असणार आहे.

आतापर्यंत शहरात आम आदमी पार्टीने (Aam Adami Party) आपल्या 34 उमेदवारांची यादी देखील प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असल्याने उमेदवार हा सर्वसामान्य असावा हा निकष कुठेतरी ते पूर्ण करताना दिसत आहे. या यादीत दोन टेलर एक दुकानदार अशा सर्वसामान्यांचा समावेश आहे. यामध्येच सध्या प्रभाग क्रमांक 29, 16, 32, 33, 39, 40 आणि 44 मध्ये प्रत्येकी 3 उमेदवार याप्रकारे 21 उमेदवार देण्यात येत आहे.

दिल्ली डायलॉगवर आधारित असलेले आणि सर्वसामान्यांना केंद्रित केंद्रस्थानी ठेवून आगामी महापालिका निवडणूक लढविण्याचे आम आदमी पार्टीने ठरविले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर कुठला मुद्दा असेल तर तो जाहीरनामा. इतर पक्षांच्या दृष्टिकोणातून सर्व शहर असा जाहीरनामा मांडला जात आहे तर आम आदमी पार्टीतर्फे 44 प्रभागांचे 44 जाहीरनामे तिथल्या जनतेला विचारून तयार करण्यात येणार आहे आणि त्यावरच लक्ष केंद्रित करुन ही निवडणूक लढविली जाणार आहे.

नाशिक महापालिकेच्या रचनेबाबत विचार करता दिल्लीतील निवडणुकांच्या वातावरणापेक्षा महाराष्ट्रातील निवडणुकांचे (Municipal elections) गणितं, समीकरणे , येथील प्रतिस्पर्धी पक्षीय राजकारण या बरीच तफावत असते; असे असून देखील महाराष्ट्र (maharashtra) आपच्या समितीने निर्णय घेत जवळपास महानगरपालिका निवणुकीसाठी तयारीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे.

त्यातच नाशिक महानगपालिकेसाठी (Nashik Municipal Corporation) दिल्ली मॉडेल (Delhi model) वर व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. यामध्ये पक्षाकडून निवडणुकीसाठी देण्यात येणारे उमेदवार हे पक्षाची ध्येय धोरण पोहचविणारे लोकं, समाजासाठी प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते यांच्यासोबत इतर विरोधी पक्षातील तळागळातील मेहनती असुन कायम डावलेले गेलेले कार्यकर्ते यांच्यातून निवडण्यात येणार आहे .

यामध्ये प्रामुख्याने घराणे शाही मुक्त, अनाधिकृत धंदे चालवणार्‍या लोकांना टाळण्यात आलेचे पक्षाचे म्हणणे आहे. हे करतांना पक्षाकडून करप्ट, क्रिमिनल आणि कम्यूनल पार्श्वभूमी असणार्‍याना तिकीट देताना पूर्णपणे डावलण्यात येत आहे. शहरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांच्यासह काही पदाधिकार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते. याबाबत लवकरच निर्णय घेऊन आम आदमी पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

– आआप

- Advertisment -

ताज्या बातम्या