Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedस्ट्रॉबेरीतून उत्पन्नाचा स्त्रोत

स्ट्रॉबेरीतून उत्पन्नाचा स्त्रोत

मोखाडा । माधुरी आहेर | Mokhada

कृषी विभागाच्या (Department of Agriculture) प्रोत्साहनाने हिरवे येथील भगीरथ दामु भुसारा या शेतकर्‍याने (farmers) भगीरथ प्रयत्नाने स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry farming) फुलवली. त्याला मे महिन्याच्या अखेरपर्यंत अंदाजे अडीच ते पावणेतीन लाख रुपये एवढा निव्वळ होईल, असा अंदाज कृषी अधिकारी प्रेमदास राठोड (Agriculture Officer Premdas Rathod) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

आदिवासाींनी (tribal community) स्ट्रॉबेरी (Strawberry) कशी पिकवावी, याची माहिती घेण्यासाठी आदिवासी शेतकर्‍यांचे पथक आमदार सुनील भुसारा (MLA Sunil Bhusara) कृषी विभागाने आत्मा योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2020 मध्ये सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) कांजबारी येथे दौरा केला. येथील शेतकरी (farmer) देवेंद्र गायकवाड यांच्या शेतात नेली. पिकवलेल्या स्ट्रॉबेरीचा अभ्यास (study on strawberries) करण्यात आला.

मोखाड्यातील शेतकरी या सहलीतुन प्रेरणा घेऊन स्ट्रॉबेरीचे पीक (strawberries crop) स्वतः आपल्या शेतीत घेईल हा उद्देश यामागे कृषी विभागाचा (Department of Agriculture) होता. कृषी विभागाचा हा उद्देश सार्थकी लागला, असे म्हणावे लागेल. कारण हिरवे येथील भगीरथ भुसारा हा शेतकरी प्रेरित होईल त्यांनी तालुका कृषी अधिकारी सुनील पारधी (Taluka Agriculture Officer Sunil Pardhi), मंडळ कृषी अधिकारी प्रेमदास राठोड,

कृषी सहाय्यक राजेंद्र काकुळते व आत्माचे बीटीएम राहुल झोपाळे यांच्याकडे स्ट्रॉबेरी पिक घेण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच प्रत्यक्ष कृतीला सुरूवात केली. कृषी विभागाच्या अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून त्याने आपल्या शेतात स्टॉबेरीची लागवड (Cultivation of strawberries) करून मोखाडा (mokhada) तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे त्याचे कौतुक होत आहे.

त्यामुळे आज भगीरथ भुसारा यांच्या शेतात गेल्यावर महाबळेशरच्या (Mahabaleshwar) स्ट्रॉबेरी पिकाचा अनुभव येत आहे. त्यांनी सुरूवातीपासूनच कृषी विभागातील अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात पिकाला ठिबक सिंचन (Drip irrigation), तणाचा बंदोबस्त करण्यासाठी मल्चिंंग पेपरचा वापर (Mulching paper), तंत्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय व रासायनिक खतांचा (Organic and chemical fertilizers) वापर, कीड व रोग व्यवस्थापन केले.

भुसारा यांनी कष्ट घेत डोळ्यात तेल घालून स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. त्यांनी 300 किलो स्ट्रॉबेरीची विक्री केली असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे पीक अजून निघणार आहे. या शेतकर्‍यांनला स्टॉबेरी शेतीसाठी साधारण अंदाजे 70 ते 80 हजार एवढा खर्च आलेला आहे. स्ट्रॉबेरी रसाळ चकचकीत व उत्तम दर्जाची असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) व कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांच्या विकेल ते पिकेल या उपक्रमांतर्गत या स्ट्रॉबेरीची विक्री स्थानिकस्तरावर होत आहे . एवढेच नव्हे त्यांनी मोगरा लागवड देखील केली आहे. त्यांना मोगर्‍याचे दर दोन दिवसाआड वीस ते पंचवीस किलो एवढे उत्पादन होत आहे.लग्नसराईमुळे मोग-याला पाचशे ते सहाशे रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी या स्टॉबेरी शेतीकडे वळावे असे आवाहन मोखाडा तालुका कृषी विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या