फळमाशी रोखण्यास देशी जुगाड

फळमाशी रोखण्यास देशी जुगाड

कवडदरा । अमोल म्हस्के | Kavaddara

सध्या काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर (fruit crops) मोठ्या प्रमाणात फळमाशीचा प्रार्दुभाव (Fruit fly infestation) झाला आहे. त्यामुळे ही फळे सडून शेतकर्‍यांचे (farmers) मोठे नुकसान होत आहे.

यावर इगतपुरी तालुक्यातील (igatpuri taluka) भरवीर बु. येथील येथील तरुण शेतकरी सुनिल शेळके (Farmer Sunil Shelke) यांनी निरीक्षणाअंती यु-टयुबच्या (YouTube) आधारे प्रभावी उपाय शोधून काढत यशस्वी उपाययोजना केली आहे. सुनिल शेळके यांचा हा उपाय शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार असून याचा फायदा आंबा पिकालाही (Mango crop) होणार आहे. फळांवर पडणारी ही फळमाशी तयार झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणात अ‍ॅटॅक करते. यावेळी ही फळमाशी या फळातील रस शोषून घेऊन त्यात ती अळी घालते.

त्यामुळे या फळांना कीड सदृश्य लागण होऊन तयार फळे पूर्णत: बाधित होत आहेत. त्यावर गोंडाळ यांनी लूर गोळीचा वापर करत प्लास्टीक बाटल्यांच्या (Plastic bottles) आधारे सापळा बनवत यावर प्रभावी उपाय शोधला आहे. गोंडाळ हे छोट्या प्रमाणात आंबा व्यवसायही करतात. मागील हंगामात त्यांनी पाठविलेल्या आंबा पेट्यांत बहुतांशी आंबे (mango) खराब निघाल्याने त्यावर विचार करत त्यानी फळमाशीच्या प्रार्दुभावामुळे आंबा फळ खराब होत असल्याचा निष्कर्ष काढला.

मात्र, यावर काय उपाय योजना (Remedial plan) करावी याबाबत त्यानी यु-टयुबच्या आधारे काही माहिती मिळविली आणि कृषी पदवीका मिळविलेल्या गावातील तरुण सुनिल शेळके यांच्या मदतीने लूर नामक गोळीचा वापर करत सापळा बनवला. सध्या शेतकर्‍यांनी पावसाळी काकडी, पडवळ, दोडकी यांची लागवड केली आहे. मात्र, त्यावरही मोठ्या प्रमाणात या फळमाशांनी अ‍ॅटॅक केल्याचे निदर्शनास आल्यावर गोंडाळ यांनी हा उपाय करून पाहीला.

त्यात त्यांना यश आले आहे. यासाठी प्लास्टीकच्या बाटलीत छोटे छोटे होल मारुन अर्ध्यावर रंगीत पाणी भरले. त्यावर लूरची गोळी टांगली. लूरच्या वासाने आणि रंगीत पाण्याकडे माशा आकर्षित होतात आणि बाटलीत शिरतात. बाटलीमध्ये असलेल्या लूर गोळीच्या वासाने त्यांना गुंगी येते आणि आपसूक त्या खालच्या पाण्यात पडतात. अशा प्रकारे त्यांनी सापळे बनवून फळमाशीचा प्रार्दुभाव रोखला आहे .

फळमाशीचा प्रादुर्भाव (Fruit fly infestation) रोखण्यासाठी सुनील शेळके या युवा शेतकरी मित्राने शोधलेली कल्पना नामी असून ज्या शेतकर्‍यांना फळमाशीचे ट्रॅप घेणे परवडत नाही, त्यांच्यासाठी ही मोठी उपलब्धता आहे . हा ट्रॅप अत्यंत कमी खर्चात तयार करता येत असल्याने भाजीपाल्याच्या हंगामानंतर आंब्याच्या हंगामात याचा प्रभावी उपयोग होणार आहे. गतवर्षी आंबा बागायतदारांना फळमाशीचा मोठा फटका बसला असल्याने शेळके यांचा हा देशी जुगाड मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com