सौंदर्य प्रसाधनांची भूलभुलैया

सौंदर्य प्रसाधनांची भूलभुलैया

- योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक- स्तंभलेखक

सौंदर्य प्रसाधने आणि अशी अन्य उत्पादने बनविणार्‍या कंपन्या आपल्या उत्पादनांबाबत मोठमोठे दावे करतात. वय कमी भासविणे, सुरकुत्या कमी करणे, त्वचा तंग करणे, रंग गोरा करणे असे असंख्य दावे केले जातात. लोकांचा त्यावर विश्वासही बसतो. एका सर्वेक्षणानुसार, सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधील 82 टक्के दावे खोटे असतात. नॅचुरल, ऑरगॅनिक ग्रीन अशा प्रकारचे दावे करणारी उत्पादने ग्राहकांची मोठी दिशाभूल करतात.

कोरोना काळात सौंदर्य प्रसाधनांच्या व्यवसायाचा मुद्दा अचानक समोर आला. वस्तुतः अमेरिकेत अश्वेत समुदायाच्या आंदोलनामुळे वर्णभेद आणि वंशभेदाच्या विरोधात संपूर्ण जगात आंदोलन छेडण्यात आले. ज्या वस्तूचा, व्यक्तीचा किंवा ब्रँडचा संबंध वर्णभेदाशी, वंशभेदाशी दिसून येतो त्या सर्वांवर हल्ले चढविले जात आहेत. अशा स्थितीत अनेक ब्रँड्सनी वर्णभेद आणि वंशभेदाच्या बाबतीत तातडीने निरपेक्ष धोरण स्वीकारले आहे. भारतातही त्याचा परिणाम पाहावयास मिळाला. भारतातील तमाम कंपन्यांनी आतापर्यंत त्वचेचा रंग गोरा करणारी उत्पादने बाजारात विकली आहेत. आता अमेरिकेतील घटनाक्रमाचा परिणाम भारतातही दिसून आला आहे.

भारतात गोरेपणा वाढविणार्‍या क्रीम आणि लोशनची बाजारपेठ 2023 पर्यंत पाच हजार कोटींची असेल, असा अंदाज आहे. भारतीय ग्राहकांमध्ये गोरे होण्याची इच्छा किती तीव्र आहे, हे यावरून स्पष्ट होते. जॉन्सन अँड जॉन्सनने गेल्या महिन्यात अशी घोषणा केली की, गोरेपणाशी संबंधित उत्पादने आता कंपनी विकणार नाही. त्यानंतर हिंदुस्थान लिव्हरनेही घोषणा केली की, कंपनी आपल्या ‘फेअर अँड लवली’ या उत्पादनाच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द वगळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता या उत्पादनाचे नाव ‘फेअर अँड लवली’ऐवजी ‘ग्लो अँड लवली’ असे करण्यात आले आहे. लॉरियल कंपनीनेही आपल्या उत्पादनांच्या नावांतून ‘व्हाइट’, ‘फेअर’, ‘लाइट’ असे शब्द हटविण्याची घोषणा केली आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय टीकेच्या भडीमारामुळे गोरेपणा देणार्‍या उत्पादनांची नावे बदलली गेली असली, तरी अशा क्रीम, लोशन आणि अन्य वस्तूंचे उत्पादन थांबेल अशी आशा करता येत नाही.

भारतात 90 टक्के लोकांचा वर्ण गव्हाळ असतो. परंतु सामाजिक वातावरणच असे आहे की, आपल्याकडून आपल्याच नैसर्गिक रंगाकडे तुच्छतेच्या नजरेने पाहिले जाते. अशा स्थितीत ङ्गब्रँडिंगफची जादू मोठ्या प्रमाणावर चालते आणि लोक गोरा रंग होण्यासाठी वेगवेगळी उत्पादने विकत घेऊ लागतात. परंतु डॉक्टरांचे स्पष्ट म्हणणे असे आहे की, त्वचेचा रंग उजळ करणार्‍या उत्पादनांमध्ये घातक रसायने असतात आणि त्यामुळे आरोग्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो.

हायड्रोक्विनोन, मर्क्युरी, कोर्टिकोस्टेरॉइड असे पदार्थ अत्यंत गंभीर आजारांना जन्म देऊ शकतात. हायड्रोक्विनोनपासून त्वचेवर पुरळ, खाज आणि त्वचेचा रंग खराब होण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. मर्क्युरीमधील विषारीपणामुळे मज्जासंस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. गॅस्ट्रो तसेच मूत्रपिंडांचे आजार होऊ शकतात. एवढेच नव्हे तर

मेंदूच्या विकासावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा रसायनयुक्त सौंदर्य उत्पादनांवर युरोपात बंदी आहे. परंतु आशियात तयार होणार्‍या या उत्पादनांची विक्री धडाक्यात सुरू असते. चीन तर अशा वस्तूंच्या उत्पादनांमध्ये खूपच आघाडीवर आहे.

फिलिपीन्समध्ये ‘लिकास पपाया’ नावाचा साबणाचा ब्रँड अत्यंत लोकप्रिय आहे. कारण या साबणाचे ब्रँडिंग करताना असे सांगितले जाते की, या साबणामुळे त्वचेचा रंग गोरा होतो. तिथे ‘ एस्किनॉलफ नावाचे स्किन व्हाइटनिंग लोशनसुद्धा अतिशय लोकप्रिय आहे. थायलंडमध्ये त्वचेचा रंग गोरा करणार्‍या उत्पादनांची मोठी बाजारपेठ आहे. स्थानिक पातळीवर तयार होणारी तर्‍हेतर्‍हेची क्रीम आणि लोशन तेथील लोक वापरतात. 2018 मध्ये अमेरिकन सेलिब्रिटी ब्लाक शाइना हिने गोरेपणाच्या क्रीमची जाहिरात करण्यासाठी नायजेरियाचा दौरा केला होता. जपानमध्ये सौंदर्य स्पर्धांमध्ये असा नियम आहे की, प्रतिस्पर्ध्याचा रंग ङ्गसाफफ असला पाहिजे. अमेरिकेत 19 व्या शतकात वर्णभेद इतका शिगेला पोहोचला होता की, अश्वेत समुदायातील लोकांना ‘ब्राउन पेपर बॅग टेस्ट’मधून जावे लागे. या चाचणीत त्वचेच्या रंगाची तुलना ब्राउन पेपर बॅगशी केली जात असे आणि त्यानंतरच संबंधिताला एखाद्या कार्यक्रमात किंवा उपक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली जात असे.

एका संशोधनानुसार जगभरात सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ दरवर्षी 4.3 टक्क्यांच्या दराने वाढत आहे. त्यामुळे 2021 च्या अखेरीपर्यंत ती 429.80 अब्ज डॉलरची होईल, असा अंदाज आहे. अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सन ही सौंदर्य प्रसाधने तयार करणारी जगातील आघाडीची कंपनी आहे. 1886 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी दरवर्षी 81.30 अब्ज डॉलरची कमाई करते. जॉन्सन अँड जॉन्सनच्या आघाडीच्या ब्रँड्समध्ये मेन्यूट्रोजिनाचा समावेश आहे. गोरेपणा वाढविण्याचा दावा करणारेच हे उत्पादन आहे. कंपनीने आता हे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन जगातील अनेक देशांमध्ये आपल्या वेगवेगळ्या कंपन्या चालविते. अमेरिकेचीच प्रॉक्टर अँड गॅम्बल ही कंपनी या बाबतीत जगातील दुसरी कंपनी आहे. 1837 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. या कंपनीची वार्षिक कमाई 67.70 अब्ज डॉलर एवढी आहे. युनिलिव्हर ही ब्रिटनची कंपनी जगात तिसर्‍या स्थानी असून, 1895 पासून सुरू असलेल्या या कंपनीची वार्षिक कमाई 56.3अब्ज डॉलर इतकी आहे. या कंपनीचे 400 ब्रँड जगभरात विकले जातात. भारतात ही कंपनी ‘हिंदुस्थान लिव्ह’ नावाने व्यवसाय करते.

फ्रान्सची लॉरियल कंपनी 1909 पासून या व्यवसायात आहे. 89 हजारपेक्षा अधिक कर्मचारी असलेली ही कंपनी वर्षाकाठी 31.1 अब्ज डॉलरची कमाई करते. जपानची काओ कंपनी 1887 पासून बाजारात असून, 13.70 अब्ज डॉलरची कमाई करणार्‍या या कंपनीने 2018 मध्ये एकूण कमाईपैकी 41 टक्के रक्कम स्किनकेअर आणि सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीमधून केली होती.

अमेरिकेतील एस्टे लाउडर या कंपनीची स्थापना 1946 मध्ये एका हंगेरियन केमिस्टने केली होती. या कंपनीची वार्षिक कमाई 11 अब्ज डॉलरची असून, या कंपनीची स्किनकेअर आणि मेकअपची उत्पादने 135 पेक्षा अधिक देशांमध्ये विकली जातात. जगातील सर्वाधिक लोकप्रिय दहा कंपन्यांमध्ये जपानची शीसाइडो, जर्मनीची बीयर्स्डोर्फ, अमेरिकेतील कोटी आणि दक्षिण कोरियाची अमेर पॅसिफिक या कंपन्यांचा समावेश आहे.

आपली त्वचा हा आपल्या शरीराचा अविभाज्य अवयव आहे. त्वचेवर जे काही लावले जाईल ते ती शोषून घेते. त्वचेवर लावलेला पदार्थ, विशेषतः रसायनाचे शोषण केले जाऊन ते रक्तात मिसळते. स्किनकेअर किंवा ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये अशी रसायने वापरली जातात, ज्यामुळे थेटपणे संप्रेरकांमध्ये (हार्मोन) दोष, डीएनएमध्ये दोष किंवा कर्करोगासारखे विकारसुद्धा जडू शकतात. सौंदर्य प्रसाधने बनविणार्‍या कंपन्या आपल्या उत्पादनांमध्ये वापरण्यात येणार्‍या अनेक रसायनांची नावे गुप्त ठेवतात. त्यामुळे आपण जी उत्पादने वापरत आहोत, त्यात नेमके काय मिसळले गेले आहे हे ग्राहकांना समजतसुद्धा नाही. अनेक उत्पादनांमध्ये फ्रेगरन्स किंवा सुगंधाच्या नावाखाली रसायने मिसळली जातात. काही देशांनी या नुकसानदायक रसायनांच्या विरोधात कारवाईही केली आहे. उदाहरणार्थ, युरोपीय महासंघाने स्किनकेअर आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये 1400 पेक्षा जास्त रसायने वापरण्यास बंदी घातली आहे.

एका सर्वेक्षणानुसार बाजारपेठेत उपलब्ध 100 सौंदर्य प्रसाधनांमधील एकात कर्करोगाला आमंत्रण देणारे घटक असतात तर 89 टक्के घटक पदार्थांच्या (इनग्रेडिएन्ट्स) सुरक्षिततेची चाचणीच केली गेलेली नसते. जे ब्रँड नैसर्गिक, शुद्ध आणि सेंद्रिय असल्याचा दावा केलेला असतो, अशाही अनेक ब्रँड्समध्ये रसायने मिसळलेली असतात. ही क्लृप्ती ‘ग्रीनवॉशिंग’ म्हणून ओळखली जाते. शॅम्पूमध्ये साधारण 15 रसायने, हेअर स्प्रेमध्ये 11 रसायने, ब्लशरमध्ये 16 रसायने, फाउंडेशनमध्ये 24 रसायने, आय शॅडोमध्ये 26 रसायने, लिपस्टिकमध्ये 33 रसायने, नेलपॉलिशमध्ये 31 रसायने, डिओडोरेन्टमध्ये 15 रसायने, बॉडी लोशनमध्ये 32 रसायने तर परफ्यूममध्ये तब्बल 250 रसायने आढळून येतात. सौंदर्य प्रसाधने आणि अशी अन्य उत्पादने बनविणार्‍या कंपन्या आपल्या उत्पादनांबाबत मोठमोठे दावे करतात.

वय कमी भासविणे, सुरकुत्या कमी करणे, त्वचा तंग करणे, रंग गोरा करणे असे असंख्य दावे केले जातात. लोकांचा त्यावर विश्वासही बसतो. एका सर्वेक्षणानुसार, सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींमधील 82 टक्के दावे खोटे असतात. नॅचुरल, ऑरगॅनिक ग्रीन अशा प्रकारचे दावे करणारी उत्पादने ग्राहकांची दिशाभूल करतात. अनेक कंपन्यांचा असा तर्क असतो की, जर एखादा घटक पदार्थ नैसर्गिक स्रोतांमधून आलेला असेल तर त्याला ङ्गनॅचरलफच म्हटले पाहिजे. परंतु कंपन्या जी गोष्ट सांगत नाहीत ती अशी की, नैसर्गिक घटकांवर कंपन्या रासायनिक प्रक्रियाच करतात. त्याचप्रमाणे ऑरगॅनिक उत्पादनांचे प्रमाणीकरण सार्वजनिक केले जात नाही.

प्रत्येक सौंदर्य प्रसाधन किंवा पर्सनल केअर प्रॉडक्ट रसायनांपासूनच बनलेले असते. ङ्गकेमिकल-फ्री कॉस्मेटिकफ नावाची चीज अस्तित्वात नाही. पाणीसुद्धा रसायनच आहे आणि टिटेनियम डायऑक्साइडसुद्धा रसायनच आहे. नाइट क्रीम हे नाव महागडे उत्पादन विकण्याची एक क्लृप्ती आहे. त्वचेला दिवस आणि रात्रीतला फरक माहीत नसतो. क्रीमसुद्धा दिवसाची असो वा रात्रीची, त्या एकसारख्याच असतात. वय वाढण्याची प्रक्रिया कमी करणारी एकही वस्तू विज्ञानाला अद्याप सापडलेली नाही. परंतु तरीही ङ्गअँटी एजिंग प्रॉडक्टफ या नावाखाली असंख्य उत्पादने विकून कंपन्या मोठी कमाई करीत आहेत. त्वचेला पोषण देण्याचा दावा करणारी असंख्य उत्पादने बाजारात आहेत.

वस्तुस्थिती अशी आहे, की त्वचेला वरून लावलेला कोणताही त्वचेचे पोषण करू शकत नाही. त्वचेला रक्तप्रवाहातूनच पोषण मिळत असते. निरोगी त्वचा केवळ चांगले अन्न सेवन करण्याने, निरोगी जीवनशैलीने तसेच चांगली झोप, व्यायाम आणि तणावमुक्त जीवन जगण्यामुळेच मिळू शकते. त्वचेला क्रीम किंवा लोशनच्या सहाय्याने पोषण देण्याचे सर्व दावे खोटे असतात. म्हणूनच कोणत्याही सौंदर्य प्रसाधनावर डोळे झाकून कधीच विश्वास ठेवू नये.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com