Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedचक्रीवादळांचा धुमाकूळ

चक्रीवादळांचा धुमाकूळ

– सत्यजित दुर्वेकर

गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रात सातत्याने चक्रीवादळ येत आहेत. हवामान बदलामुळे चक्रीवादळाची तीव्रता वाढत चालली आहे. तौक्ते चक्रीवादळ हे याचे ताजे उदाहण आहे. समुद्रातील कमी तीव्रतेचे चक्रीवादळ हे समुद्राचे तापमान वाढताच प्रचंड वेग रुप धारण करते. हवामान खात्याच्या मते, सर्वात शक्तीशाली चक्रीवादळाची तीव्रता ही गेल्या दहा वर्षांत आठ टक्क्याने वाढली आहे.

- Advertisement -

अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळ हे अनुकुल वातावरणामुळे भयावह झाले होते. केरळ, कर्नाटक, कोकण किनारपट्टी, मुंबई आणि नंतर ते गुजरातकडे वळाले. गुजरातेत गेल्यावर त्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. तौक्ते चक्रीवादळामुळे भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर तीन-चार दिवस वेगाने वारे वाहत होते. मुसळधार पाऊसही पडला. या कारणांमुळे केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. मुंबईत तर पाचशेहून अधिक झाडे पडली.

या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सहा जणांचा मृत्यू झाला. साधारणपणे भारतात चक्रीवादळ हे मे ते ऑक्टोबर या काळात घोंगावतात. बहुतांश चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात येतात आणि त्याचा परिणाम पूर्व किनारपट्टीवर जाणवतो. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात चक्रीवादळाचे नेहमीच संकट असते. १९९९ च्या सुपर सायक्लोनशिवाय आइला, पाइलिन, हुदहुद, गज, तितली आणि ङ्गानी यासारख्या चक्रीवादळाने गेल्या वीस वर्षात हाहा:कार माजवला.

आता अरबी समुद्रात देखील सातत्याने चक्रीवादळ येत आहेत. त्यांची संख्या आणि शक्ती वाढत चालली आहे. आताचे तौक्ते चक्रीवादळ हे गेल्या दोन दशकांतील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळांपैकी एक मानले गेले आहे. विशेष म्हणजे हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून दूर होते. यापूर्वी २००७ मध्ये दोनू आणि २०१९ मध्ये क्यार नावाचे दोन चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले होते. परंतु ते दोन्ही किनारपट्टीपासून लांबच होते. याप्रमाणे २०१७ मध्ये ओखी चक्रीवादळ हे समुद्रातच होतेे.परंतु त्याच्यामुळे सुमारे २५० जणांचा मृत्यू झाला. चक्रीवादळाची तीव्रता आणि वाढण्यामागे हवामान बदल हे मोठे कारण आहे. समुद्राचे तापमान संपूर्ण जगात वाढत चालले आहे. परिणामी समुद्रातील चक्रीवादळ आणखी भयानक रुप धारण करते. उदाहरण दाखल अरबी समुद्राचे तापमान हे २८ ते २९ अंश सेल्सिअस इतके राहते. परंतु तौक्ते वादळाच्या काळात हे तापमान ३१ अंशांवर पोचले.

हवामान खात्याच्या तज्ञांनुसार, समुद्र उष्ण होत असताना कमकुवत चक्रीवादळ हे वेगाने अशक्तीशाली आणि विनाशकारी रुप धारण करतात. अम्ङ्गान, ङ्गानी आणि ओखी चक्रीवादळाने ही बाब सिद्ध झाली आहे. तौक्ते चक्रीवादळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. कमी शक्तीशाली वादळ हे समुद्रातील उष्णतेमुळे तात्काळ तुङ्गानाचे रुप धारण करतात. सर्वात शक्तीशाली चक्रीवादळाची शक्ती ही प्रत्येक दशकात सुमारे ८ टक्क्यांने वाढली आहे. आयपीसीसीशी संबंध असणारे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑङ्ग ट्रॉपिकल मेटियोरोलॉजीचे शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कॉल यांच्या मते, सलग चौथ्या वर्षी मॉन्सूनच्या अगोदर अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकत आहेत आणि ही बाब तौक्ते चक्रीवादळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे सलग तिसर्‍या वर्षी चक्रीवादळ हे पश्‍चिम किनारपट्टीच्या जवळ आले आहे.

अर्थव्यवस्थेवर संकट

चक्रीवादळाचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. जागतिक हवामान संघटनेने म्हटले की, गेल्या वर्षी मे महिन्यात भारत आणि बांगलादेश येथे आलेल्या अम्ङ्गान चक्रीवादळामुळे दोन्ही देशांतील सुमारे १३० जणांचा जीव गेला आणि ५० लाख लोक निर्वासित झाले. त्यामुळे सुमारे १४०० कोटी डॉलर म्हणजेच एक लाख कोटी रुपयांचा आर्थिक ङ्गटका बसला. केरळ, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातेतील नागरिकांचे वास्तव्य आणि व्यवसाय हा किनार्‍यावरच असतो. त्यामुळे त्यांना अशा चक्रीवादळाचा ङ्गटका सातत्याने बसत आहे. तसेच पर्यटनाशी निगडीत व्यवसायावरही चक्रीवादळाचे संकट वाढू लागले तर अर्थव्यवस्थेला मोठा ङ्गटका बसू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या