Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऐनवेळी महावितरणचा शॉक

ऐनवेळी महावितरणचा शॉक

येवला । सुनील गायकवाड | Yeola

शेतकरी (farmers) अस्मानी व सुलतानी मुळे मेटाकुटीस आलेला असतांना विजवीतरण कंपनीने (Electricity Distribution Company) शेतकर्‍यांची वीज कापणी मोहीम राबवत ऐन उन्हाळ्यात पीक जाळण्याची मोहीमच सुरू केली आहे. महावितरणने (MSEDCL) वसुलीसाठी थकबाकीदार 685 कृषी ग्राहकांचे (Agricultural consumers) वीज कनेक्शन (Power connection) तोडले आहे. त्यामुळे सरकार विरोधी वातावरण शेतकरी (farmers) वर्गात होत आहे.

- Advertisement -

तालुक्यात महावितरणचे शहर व ग्रामीण असे दोन उपविभाग आहेत. शहर उपविभागात 14 हजार 73 तर ग्रामीण उपविभागात 17 हजार 589 असे एकूण 31 हजार 662 कृषी ग्राहक आहेत. ग्रामीण उपविभागात 131 कोटी 78 लाख रूपये थकबाकी असून शहर उपविभागात 79 कोटी 64 लाख अशी एकूण 211 कोटी 42 लाख इतकी थकबाकी आहे. 31 हजार 662 कृषी ग्राहकांपैकी 1 हजार 827 ग्राहकांकडे 6 कोटी 77 लाख 57 हजार रूपये थकबाकी असून यापैकी 4 कोटी 40 लाख 26 हजार रूपयांची वसुली झाली आहे.

महाावितरणने वसुलीसाठी थकबाकीदार 685 कृषी ग्राहकांचे वीज कनेक्शन (Power connection) तोडले आहे. या आकड्यात दैनंदिन बदल होत असतो. थकबाकी भरली की वीज जोडणी पुर्ववत करून दिली जाते. मार्च अखेरपर्यंत टार्गेट पूर्ण करण्याचा महावितरणचा प्रयत्न असल्याने अधिकारी, कर्मचारी गावोगाव फिरून वसुली मोहीम राबवित आहे. थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जात असतांना शासनाच्या कृषी धोरण 2020 या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहनही केले जात आहे. परिणामी काही ग्राहकांनी प्रतीसाद देत योजनेचा लाभ घेत आपल्याकडील थकबाकीही भरली आहे.

तालुक्यात सततच्या पावसाने यंदा हंगामाचे स्वरूप बदलले आहे. परिणामी रब्बीची पिके उशीरा झाली आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांदा (summer onion), गहू (Wheat) आणि इतर पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे नेमक्या गरजेच्या वेळेस वीज खंडीत करण्याची मोहीम सुरू असल्याने शेतकरीवर्गात नाराजी आहे. येवला तालुक्याच्या (yeola taluka) वीज प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांचे सूचनेवरून मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) निरीक्षक दिलीप खैरे (dilip khaire) यांनी अधिकार्यांची संपर्क कार्यालयात बैठक घेवून चर्चा केली.

यावेळी वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडू नये, वसुली दरम्यान वाद टाळावेत अशा सूचना केल्या गेल्या. याबरोबरच शासनाच्या कृषी धोरण योजनेचा थकबाकीदारांनी लाभ घेण्याचे आवाहनही केले गेले होते. तर शेतकरी संघटनेच्या वतीने वीजप्रश्नी निवेदन, रास्तारोको आंदोलन केले आहेत. तालुक्यात 34 रोहित्र सद्यस्थितीत नादुरूस्त असून एचव्हीडीएस योजनेतील 110 रोहित्र असे एकूण 144 रोहित्र जळालेले, नादुरूस्त आहेत. जळालेले वा नादुरूस्त झालेले रोहित्र दुरूस्तीबाबतची यंत्रणा स्थानिक स्तरावर नाही.

त्यामुळे रोहित्रांबाबत विभागस्तरावर अहवाल पाठविला जातो. रोहित्र बदलून वा दुरूस्ती होवून आल्यानंतर ते बसविले जाते. तालुक्यात काही भागात चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री, काही भागात तिन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री असे आठ तासांचे भारनियमन सुरू आहे. शेतकरीवर्गाकडून सरकट दिवसा वीज देण्याची मागणी केली जात आहे. तर महावितरण विज निर्मिती संचावर अतिरिक्त भार येवू नये म्हणून वीज पुरवठ्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगते.

- Advertisment -

ताज्या बातम्या