नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात 89 गुन्हे

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात 89 गुन्हे

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

सरत्या वर्षाला निरोप देत नव्या जोशात नवीन वर्षाचे स्वागत झाले तसेच गुन्हेगारांनी (Criminal) देखील नवे वर्ष खून, महिलांवरील अत्याचार, मोटार सायकल चोरी (Motorcycle theft) या प्रकाराने केले.

नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात 89 गुन्ह्यांची नोंद (Crime record) झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडलेल्या समोर आल्या आहेत. पोलिसांची (police) कमी झालेली गस्त, फक्त हेल्मेट (helmet) समुपदेशन (Counseling) आणि त्यासोबतच पोलीसिंगच्या व्यतिरिक्त कामांचे नकारात्मक पडसाद याप्रकारे दिसून येत आहे. शहरातील पोलीस ठाण्यांमढील निरीक्षकांच्या बदल्या होऊन आता पाच महिने लोटले आहे.

तरीदेखील पोलिसांना आपल्या कार्यक्षेत्रात आपला दबदबा तयार करता आला नसल्याचे या आकडेवारीतून समोर येत आहे. शहरात एकूण झालेल्या 89 गुन्ह्यांपैकी महत्वाच्या गुन्ह्यांचा विचार करता 2 घटना महिलांवरील अत्याचाराच्या, जबरी चोरीच्या 4 घटना, हुंडाबळीची एक घटना, 5 विनयभंग, 4 मुलींचे अपहरण, एक खून तर एक खुनाचा प्रयत्न अशा प्रकारच्या घटना आहे.

सोबतच या नऊ दिवसात मोटारसायकल चोरीच्या एकूण 20 घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने मुंबई नाका (mumbai naka), भद्रकाली (bhadrakali) आणि पंचवटी पोलीस ठाण्याची (Panchavati Police Station) हद्द तसेच आडगाव, इंदिरानगर, गंगापूर, अंबड आणि सरकारवाडा पोलीस ठाणे या परिसरात गुन्हे घडलेले दिसून येत आहे. अहवालाचा विचार करता मोटारसायकल चोरट्यांनी राहत्या घराची मोकळी जागा, हॉटेल, मंगलकार्यालय यांची पार्किंग (parking), जिल्हा न्यायालयातील पार्किंग, उपनगर येथील शाळा आदी ठिकाणांहून मोटारसायकल चोरल्या आहेत असे दिसून येते.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले असले तरी नागरिकांच्या चिंतेत या बाबी भर घालणार्‍या आहेत. रस्त्यावर अथवा पार्किंगमध्ये देखील दुचाकी लावणे आता अवघड ठरत आहे. पोलिसांनी शहरात 15 ऑगस्टपासून हेल्मेटसक्ती (helmet) करण्यासाठी विविध मोहिमा सुरु केल्या आहेत. नो हेल्मेट नो पेट्रोल. विना हेल्मेट वाहनचालकांचे समुपदेशन, नो हेल्मेट नो सहकार्य त्यातच भरीस भर म्हणजे आता समुपदेशनअंती परीक्षा पास झाल्याशिवाय वाहन मिळणार नाही. पोलिसांच्या या मोहिमांचे एका बाजूला कौतुक जरी होत असले तरी शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची आकडेवारी लपवता येत नाही. ​आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com