आवास योजनेसाठी 712 कोटी खर्च

आवास योजनेसाठी 712 कोटी खर्च

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

आर्थिक दुर्बल, बेघर नागरिकांना (Economically weak, homeless citizens) स्वतःचे घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) केंद्र सरकारतर्फे (central government) राबविली जात आहे.

या योजनेत ज्यांना हक्काचे घर नाही त्यांच्यासाठी घरकुल योजना राबविण्यात येत असते. प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी (rural area) असलेल्या या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात (nashik district) 712 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक मालेगाव तालुक्यात (malegaon taluka) घरे बांधण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत ज्यांना राहण्यासाठी घर नाही अशा नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी घरकूल योजना राबविली जाते. मात्र, या योजनेचा लाभ सधन लोक घेताना दिसत आहेत. ज्यांच्याकडे घर, बंगला, गाडी आहे असे लोकही लाभार्थी असल्याने मूळ योजनेचा उद्देश बाजूला पडल्याची तक्रार केली जात असली तरी, जिल्ह्यात या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

आदिवासी तालुका (tribal taluka) असलेल्या पेठने (peth) जिल्ह्यात एक क्रमांक पटकाविला असून, 4502 घरे बांधून पूर्ण झाली आहेत. तर सर्वात खालच्या क्रमांकावर नाशिक तालुका (nashik taluka) आहे. आर्थिक मागास नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रत्येक घरामागे एक लाख 20 हजार रूपये अनुदान (subcidy) दिले जाते.

लाभार्थी

  • मालेगाव :10850

  • बागलाण : 8605

  • सुरगाणा : 7378

  • कळवण : 6691

  • दिंडोरी : 5614

  • त्र्यंबकेश्वर : 4833

  • पेठ : 4605

  • सिन्नर : 3732

  • येवला : 3111

  • इगतपुरी : 2780

  • निफाड : 2337

  • चांदवड : 2325

  • देवळा : 1888

  • नाशिक : 705

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com