Wednesday, April 24, 2024
HomeUncategorized6 हजार सुकन्या ’समृद्ध’

6 हजार सुकन्या ’समृद्ध’

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

मुलींचे शिक्षण (Girls’ education) आणि लग्न (marriage) यासाठी पैशांची बचत व्हावी म्हणून केंद्र सरकारने (central government) सुरू केलेल्या ’सुकन्या समृद्धी’ योजनेत (Sukanya Samrudhi Scheme) नाशिक जिल्ह्यात (nashik district) गेल्या वर्षी 6,737 खाती (account) उघडण्यात आली आहेत.

- Advertisement -

या योजनेच्या साहाय्याने पालक आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी (education) आणि लग्नासाठी किमान 250 रुपयांत खाते उघडून बचतीला सुरुवात करू शकतात. नाशिक टपाल खात्यात (Nashik Postal Department) या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ही योजना 22 जानेवारी, 2015 ला देशात सुरू केली.

ही योजना विशेष मुलींसाठी असून केंद्राची ही सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे. मुलींच्या लग्नावेळी किंवा उच्चशिक्षण (Higher education) घेताना ही गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. या योजनेला ’पंतप्रधान सुकन्या योजना’ (Prime Minister Sukanya Yojana) असेही म्हणतात. केंद्र आणि राज्य शासनाद्वारे बँका किंवा पोस्ट ऑफिसमार्फत गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या बर्‍याच योजना राबवल्या जातात.

त्यापैकी ’सुकन्या समृद्धी’ योजना मुलींचे लग्न, शिक्षण (education), आरोग्य (health) तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची बचत योजना आहे. या योजनेत मुलींचे आई-वडील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत (Nationalized banks) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (saving account) उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात. अशा बँक किंवा पोस्ट खात्यास ’सुकन्या समृद्धी खाते’ असेही म्हणतात.

या योजनेअंतर्गत खातेदार आपल्या मुलीच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी पैसे जमा करण्यासाठी मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. ही रक्कम मुलीचा विवाह वा उच्चशिक्षण आदीसाठी वापरली जावी, अशी या मागची कल्पना आहे. या योजनेंअंतर्गत बैंक खाते उघडल्यावर 14 वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. लाभार्थी आपल्या मुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँक, पोस्ट ऑफिस (Post Office), एसबीआय, आयसीआयसीआय, ’पीएनबी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी आदी बँकांमध्ये खाते उघडू शकतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ’सुकन्या समृद्धी’ खाती उघडण्यास 28 बँका अधिकृत केल्या आहेत. मात्र टपाल खात्याला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसते. सुकन्या समृद्धी बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी किमान रु. 250/- किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडल्यापासूनच्या तारखेपासून ते मुलीचे 21 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्यावेळी योजनेची मॅच्युरिटी होते व चांगल्या व्याजदराने ठेवी परत मिळतात.नी व संस्थाचालक यावर आत्मपरीक्षण करतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या