Thursday, April 25, 2024
HomeUncategorized200 वर्षे जुने झाड वाचले; इतर शेकडो झाडांचे काय?

200 वर्षे जुने झाड वाचले; इतर शेकडो झाडांचे काय?

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नवीन नाशिक (navin nashik) भागात महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे उड्डाणपूल (flyover) बांधला जात आहे. सुमारे अडीचशे कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे.

- Advertisement -

अगदी सुरूवातीपासून पुलावरून अनेक वाद-विवाद झाले. नागरिकांचा विरोध, वाहतूक सर्वेक्षण (Traffic Survey) न करताच उड्डाणपूल तयार केला जात असल्याचा आरोप आदी वाद पाहायला मिळाले. तर आता झाडांच्या कत्तलीवरुन (Tree felling) निर्माण झालेला वाद. असे असे असतांनाही प्रशासन मात्र पुल तयार करण्यावर ठाम आहे. 200 वर्षे जुने झाड कत्तलीपासून वाचले तरी इतर शकडो झाडांचा काय होणार, हा प्रश्न कायम आहे.

मायको सर्कल (Myko Circle) येथे उड्डाणपूल आवश्यक असला, तरी त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त होत आहे. तरी तोे मंजूर करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात होते. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत अनेक विकास कामे झाली, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वादग्रस्त काम ठरल्याचे उदाहरण दिसत नाही.

दोन्ही पूल सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडले असले तरी प्रशासन काम करण्यावर ठाम दिसत आहे. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई निर्माण झाली आहे. सर्वात पहिले या उड्डाण पुलाच्या कामासाठी एम 40 दर्जाच्या सिमेंटचा वापर करण्यात येणार होता, यानंतर त्याच्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर एम 60 सीमेंट (Cement) वापरण्याच्या चर्चा सुरू झाल्या, यामुळे कामाच्या खर्चात सुमारे 44 कोटींची वाढ होणार, असेही सांगण्यात आले. मात्र काही काळानंतर त्याच किमतीत एम 60 दर्जाच्या सिमेंटचा वापर करुन पुल तयार होणार, असे सांगण्यात येऊन प्रशासनाने काम पुढे नेण्यास सुरूवात केली.

मात्र मोठी रक्कम वाढ होऊन नंतर त्याच किमतीत काम कसे होत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. यामुळे या कामात काहीतरी गडबड आहे का अशी चर्चा देखील सुरू झाली. अशा प्रकारचे वाद-विवाद सुरू असतांनाच भारतीय जनता पक्षाचे (BJP) नगरसेवक मुकेश शहाणे (Corporator Mukesh Shahane) यांनी या उड्डाणपुलाच्या (flyover) कामाबाबतची माहिती प्रशासनाकडे मागितल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

शहाणे यांनी स्थायी समितीत याबाबतची मागणी केली होती, तर स्थायी समिती सभापती गणेश गीते (Standing Committee Chairman Ganesh Gite) यांनी देखील प्रशासनाला आदेश देत सर्व प्रकारच्या कागदपत्र नगरसेवक शहाणे यांना देण्याचे आदेश दिले होते. तरीही या संपूर्ण कामाच्या बाबतीतची सर्व प्रकारचे कागदपत्र मुकेश शहाणे यांना मिळाले नाही. यामुळे त्यांना सत्ताधारी असून सुद्धा शहर अभियंता यांच्या कार्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन करावे लागले होते.

यानंतर स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी मध्यस्थी करून दुसर्‍या दिवशी महापालिका आयुक्तांच्या दालनात आयुक्तांच्या सुचनेनुसार कागदपत्र देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन (agitation) मागे घेतले होते. तरी दुसर्या दिवशी देखील सुमारे पाच तास मुकेश शहाणे यांना प्रतिक्षा करावी लागल्यानंतर अपूर्ण कागदे मिळाली होती. यानंतर त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

अशाप्रकारे हे उड्डाणपूल वादग्रस्त झालेले असतानाच नवीन नाशिक (nashik division) भागात सुमारे दोनशे वर्षे जुना वृक्ष या कामात अडचण ठरत असल्यामुळे त्याच्यावर महापालिकेने नोटीस दिली होती. व त्याला कत्तल करण्याची कारवाई देखील होणार होती. याच दरम्यान शहरातील काही पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी यांनी पुढाकार घेत त्याला प्रखर विरोध केला.

विविध प्रकारचे वाद-विवाद थांबत असतानाच वृक्ष कत्तल (Tree felling) करण्यावरून निर्माण झालेला वाद हा चांगलाच वाढला. याच्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी लक्ष देत हा वृक्ष वाचवण्यासाठी थेट महापालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांना फोन करून त्याबाबत सूचना केले. तर दुसर्‍या दिवशी प्रशासनाने आपली भूमिका बदलत ज्या झाडावर प्रशासनाने नोटीस चिटकवली होती ती तोडण्यासाठी नाही तर फक्त फांद्या छाटणीसाठी होती, असा खुलासा केला.

नोटीसीत तीन प्रकारचे पर्याय असतात, शासकीय कामे करताना यातील एक कामावर खून करणे अपेक्षित असताना महापालिकेच्या सेवकाने तसे न केल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. दरम्यान मनपा प्रशासन डिझाईन न बदलता हे पुल बांधणारच आहे. कमीत कमी झाडे तोडण्यात येणार आहे. तर जे शक्य आहे त्या झाडांना इतर ठिकाणी लावण्यात येऊन काही नवीन झाडे लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या