Shadow of sad man hanging suicide. light and shadow
Shadow of sad man hanging suicide. light and shadow
Featured

जळगाव : अनुराग स्टेट बँक कॉलनीत तरुणाने केली आत्महत्या

Balvant Gaikwad

जळगाव | प्रतिनिधी

अनुराग स्टेट बँक कॉलनीत नीलेश सोमनाथ हिरे (वय २६) याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी राहत्या घरात साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
नीलेश याचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाले होते. सध्या तोे पत्नीसह अनुराग स्टेट बॅक कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता.  हे दांपत्य सोमवारी रात्री जेवणानंत झोपले होते. नीलेशने गळफास घेतल्याची घटना त्याच्या पत्नीच्या सकाळी लक्षात आली. या घटनेमुळे या महिलेन आक्रोश केला. हा प्रकार लक्षात येताच शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत मृताचा भाऊ मनोज हिरे याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी नीलेशला जिल्हा रुग्णालयात हलविले असता त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले.  शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.  तपास  नाईक महेंद्र पाटील करीत आहेत. मृत  नीलेश याच्या पश्ताच आई, वडील, भाऊ असा परिवार असून ते गिरणा पंपिंग रोड परिसरातील रहिवासी आहेत. लग्नानंतर आई, वडील, भावाच्या कुटुंबातून नीलेश पत्नीसह विभक्त झाला होता.

Deshdoot
www.deshdoot.com