चिंचखेड : बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला
Featured

चिंचखेड : बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण थोडक्यात बचावला

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

चिंचखेड | वार्ताहार

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याची दहशत वाढत चालली असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून चिंचखेड ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याने चिंचखेड येथील उंबरखेड शिवे लगत असणारे दत्तात्रय तुकाराम महाले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

सदर माहिती अशी की सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दत्तात्रय महाले हे घराबाहेर फोनवर बोलत असताना त्यांच्या घराच्या मागील बाजूच्या द्राक्ष बागेतून बिबट्याने महाले यांच्यावर डरकाळी फोडत धावण्याचा प्रयत्न केला, परंतु महाले वेळीच सावध झाल्याने तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी व बाजूच्या लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.त्यामुळे महाले सुखरूप बचावले.. ‘वेळ आली होती पण काळ आला नव्हता’ या वाक्याचा प्रत्यय महाले यांना आला.

काल पहाटेच्या सुमारास देखील बिबट्याने महादेव वस्ती शिवरात जर्मन शेफर्ड प्रजातीच्या श्वानावर हल्ला करून ठार केले होते. वन विभागाने या परिसरात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com