यावल : तापी नदीच्या पुलावरून उडी मारून एकाची आत्महत्या
Featured

यावल : तापी नदीच्या पुलावरून उडी मारून एकाची आत्महत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

यावल (तालुका प्रतिनिधी. )-

यावल तालुक्यातील कोळन्हावी  ( विदगाव जवळ ) गावाच्या पुढे तापी नदीच्या पुलावरून एकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता घडल्याने तापी नदी पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनी  तापी नदीच्या पाण्यात मृतावस्थेत पडलेल्या इसमाची पाहण्यासाठी  एकच गर्दी केली.

आत्महत्या करणारा इसम MH-19- 6122 या मोटर सायकल वरून तापी नदीच्या पुलावर आला आणि मोटर सायकल फुलावर लावून सरळ तापी नदीचे पात्रात उडी मारून आत्महत्या केली. सदरचा इसम कोण आणि कुठला आणि कशासाठी आत्महत्या केली. याबाबत तापी नदीच्या पुलावर गर्दी करणाऱ्या लोकांमध्ये चर्चा होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com