Thursday, April 25, 2024
Homeनाशिकइंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक तर्फे डॉक्टरांसाठी कार्यशाळा

इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक तर्फे डॉक्टरांसाठी कार्यशाळा

नाशिक | प्रतिनिधी

इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक तर्फे डॉक्टरांसाठी दि. २२ व २३ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी होणाऱ्या वार्षिक रिफ्रेशर कोर्स साठी नाशिकमधील सुमारे आठशे डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. “हेल्थ, वेल्थ अँड मेडिकोलीगल फिटनेस फॉर डॉक्टर्स” या थिम वर आधारित विविध विषयावर व्याख्यान देण्यासाठी देशभरातील विविध तज्ञ वक्ते येणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. भरत वाटवाणी व डॉ. हरीश शेट्टी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

डॉ.भरत वाटवाणी यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला असून, अनेक हरवलेल्या मानसिक रुग्णांना त्यांनी रस्त्यावरून शोधून त्यांना घरी सोडणे, उपचार करणे व त्यांना आधार देण्याचे कार्य केले आहे. तसेच डॉ. हरीश शेट्टी हे देखील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ असून अनेक ठिकाणी त्यांची व्याखेने झाली आहेत व अनेक रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ” हेल्दी डॉक्टर, हेल्दी सोसायटी” या थीम वर आधारित ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे अशी माहिती अध्यक्ष डॉ.प्रशांत देवरे व सचिव डॉ.विशाल गुंजाळ यांनी दिली. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष डॉ.हेमंत सोणानिस, खजिनदार डॉ.किरण शिंदे, डॉ. विशाल पवार, डॉ. वैभव पाटील, डॉ. मीनल रणदिवे, डॉ.कविता गाडेकर, डॉ.सागर भालेराव, डॉ. माधवी गोरे मुठाळ, डॉ.सारिका देवरे, डॉ. पंकज भट इत्यादी प्रयत्न करीत आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व डॉक्टरांनी उपस्थित राहावे असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक तर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या