राज्यातील ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे कामबंद आंदोलन सुरु; नागरिकांच्या अडचणी वाढ, मार्च अखेच्या दाखल्यांसाठी हेलपाटे
Featured

राज्यातील ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे कामबंद आंदोलन सुरु; नागरिकांच्या अडचणी वाढ, मार्च अखेच्या दाखल्यांसाठी हेलपाटे

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

वाजगाव | शुभानंद देवरे

राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन किमान वेतनाची राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कोट्यावधींचा भ्रष्टाचार व गौरप्रकार करणाऱ्या CSC-SPV या कंपनीसह तिच्या उपकंपन्यावर कार्यवाही करणे व त्या कंपनीस या प्रकल्पाच्या कामासाठी मुदतवाढ देऊ नये अन्यथा दि.१६ मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार अश्या आशयाचे निवेद महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्गत देवळा तालुका संघानक चालक यांचेकडून देवळा पंचायत समितीस देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्यातील शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञात विभागाच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. राज्यातील संगणक चालक साधारण ६ कोटी जनतेशी निगडीत सार्व प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन कामे प्रामाणिकपणे करत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ई-पंचायत मध्ये ४ वेळा देशात प्रथम आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य डिजिटल होत आहे. शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यत पोहोचविण्याचे काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे.

त्या संगणकपरिचालकांना मागील ८ वर्षापासून काम करून हक्काचे मानधन वर्ष – वर्ष मिळत नाही. या प्रकल्पात काम करणारे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्थरावरील सुमारे २३५०० संगणक चालकांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला.
सध्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजी आजाद मैदानावर सुरु असलेल्या संगणक चालकांच्या आंदोलनाला भेट देऊन राज्यातील सर्व संगणक चालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती देणे व अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करणेस या मागणीला पाठिंबा नाही तर वचनही दिले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानपरिषदेत आश्वासन देऊन प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश ९ व ११ सप्टेंबर २०१९ रोजी प्रधान सचिव माहिती तंत्रज्ञान व ग्रामविकास विभाग यांना दिले होते. त्यानुसार तीन महिन्यात नियुक्ती देण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

महाराष्ट्र आय. टी. महामंडळ असतांना दिल्लीच्या CSC-SPV या कंपनीच्या माध्यमातून राज्यात डिसेंबर २०१६ पासून राबविण्यात आला परंतु मागील ३ वर्षात या कंपनीने भ्रष्टाचार, मनमानी, गौरप्रकार केला आहे. यात आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प सुरु असतांना तत्कालीन शासनाने राज्यातील संगणक चालकयांना थेट सीएससी – एसपिव्ही या कंपनीने E-Governace Solutipns Private Limited v S2 Infotech International Limited या उपकंपन्यांना परस्पर काम देऊन एकतर्फी निर्णय व मनमानी केली.

आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प ज्या CSC –SPV या कंपनीला शासनाने चालविण्यासाठी दिला त्यावेळी ग्रामविकास विभागाच्या ११ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्रती महिना १०४५० रु. शासनाने निश्चित केलेले असुन त्यातील फक्त ६ हजार रु. हे संगणकचालकांच्या मानधनासाठी व उर्वरित ४४५० रु. पैकी २७०० रु. कंझ्यूमेबल्स म्हणजे ग्रामपंचायतीसाठी लागणारी पेपर रिम तसेच टोनर इ.साठी ठेवण्यात आले.

राज्यातील संगणकचालक प्रामाणिकपणे आपले कामे करून ६ हजार रु.मानधन कंपनी कडून वेळेवर मिळत नाही उलट काहीही कारण सांगितले जाते आणि कुठलीही पूर्व कल्पना न देता मनमानी पद्धतीने मानधन कपात करणे, मानधन न देणे इत्यादी प्रकार केले जाता.
राज्यातील सुमारे २९००० संगणक चालकांनी आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दि.१६ पासुन कामकाज बेमुदत बंद केले.
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाचा करार हा ३१ मार्च २०२० रोजी संपत असुन या कंपनीला किंवा या प्रकल्पात असलेल्या कुठल्याही कंपनीला मुदतवाढ देऊ नये तसेच नूतनीकरण करण्यात येऊ नये असे केल्या राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर राज्यध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, राज्य उपाध्यक्ष राकेश देश्मुख्य व राज्यसचिव मयूर कांबळे आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी देवळा तालुकाध्यक्ष शरदचंद्र थोरात, उपाध्यक्ष देवाजी सावंत, सचिव कृष्णा जमदाडे, वैभव बच्छाव, केदु पगार, भिमराव अहिरे, नितीन शिंदे, सचिन पवार,तेजस्वनी पवार, माधुरी पवार, शोभा बोरसे, किशोर अहिरे, गणेश सोनवणे, उमेश सोनवणे, संदीप जाधव आदि उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी संघटनेला दिलेले वचनपूर्ती आश्वासन पूर्ण करून संगणक चालक यांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्यात यावी अन्यथा कामबंद आंदोलन असेच पुढे सुरु राहणार

-देवाजी सावंत, उपाध्यक्ष संगणक परिचालक देवळा तालुका

Deshdoot
www.deshdoot.com